लेखक :   झॅक पुननं श्रेणी :   Struggling
WFTW Body: 

प्रकटी 10:8-11 मध्ये असे लिहिले आहे , ''स्वर्गांतून झालेली जी वाणी मीं ऐकली होती ती माझ्याबरोबर पुन्हा बोलतांना मीं ऐकलीः ती म्हणाली, जा आणि समुद्रावर व भूमीवर उभें राहिलेल्या देवदूताच्या हातांतलें उघडलेलें पुस्तक जाऊन घे. तेव्हां मीं त्या देवदूताकडे जाऊन, 'ते लहानसें पुस्तक' मला दे असें म्हटलें. 'तो मला म्हणाला,' हे घे 'आणि खाऊन टाक;' 'तें तुझें पोट' कडू करील तरी 'तुझ्या तोंडाला' मधासारखें गोड लागले. तेव्हां मीं देवदूताच्या हातांतून 'तें लहानसें पुस्तक' घेतलें 'व खाऊन टाकिलें, तें माझ्या तोंडाला मधासारखें गोड लागलें,' तरी ते खाल्ल्यावर माझें पोट कडू झालें. तेव्हां ते मला म्हणाले, अनेक 'लोक, राष्ट्रें, निरनिराळ्या भाषा बोलणारे व राजे ह्यांच्याविषयीं तू'ं पुन्हा 'संदेश दिला पाहिजे.''

याठिकाणी आपण पाहतो की जेव्हा योहानाने पुस्तक खाल्ले तेव्हा ते त्याला मधासारखे गोड लागले. देवाच्या कृपेचे हे चित्र आहे की देवाची कृपा ही वचनाद्वारे आपल्यापर्यंत पोहंचते. परंतु, ते वचन त्याच्या पोटात कडूसुद्धा लागले. त्यावरून कळते की देवाच्या वचनामध्ये सत्य असून हे सत्य आपल्या पापाचा न्याय करिते. वचनामध्ये केवळ कृपाच नसून सत्य देखील आहे. प्रकटीकरणाच्या पुस्तकात आपण कृपेचे व न्यायाचे एकामागून एक चित्र बघतोदेवाचे वचन हे गोड आहे व त्यानंतर कडूदेखील आहे - ही सत्यता आपल्याला संपूर्ण बायबलमध्ये दिसते.

देवाच्या वचनाची भविष्यवाणी करण्याची योग्य पद्धत याठिकाणी आपल्याला दिसते. आपल्याला प्रभुपासून देवाचे वचन घ्यायचे आहे, खायचे आहे व स्वतःला आधी ते पचवायचे आहे. त्यानंतरच देव आपल्याला इतरांकरिता भविष्यवाणीचा संदेश देईल. अनेक प्रचारक संदेश तयार करून आपल्याला सांगतात त्यापेक्षा हे अगदी भिन्न आहे. हे प्रचारक केवळ पुस्तकीय अभ्यास करतात, ध्वनीफिती ऐकतात व संदेश तयार करण्याकरिता बुद्धीची कसरत करतात व संदेशाचे उत्पादन करितात.

जेव्हा आपल्याला देवाचे वचन प्राप्त होते तेव्हा आपण सहजपणे त्यातील कृपेचा गोड भाग घेऊ शकतो. तो गोड भाग आपण आपल्या तोंडात ठेवतो परंतु, देवाचे पूर्ण मार्गदर्शन आपल्या पोटापर्यंत जाऊ देत नाही. आपल्याला वचनाच्या पुढील भागाचा अनुभव घडत नाही कारण आपल्यामधील पापाचा न्याय आपल्यापुढे येतो. ''कारण देवाच्या 'घरापासून' न्यायनिवाड्यास 'आरंभ होण्याची' वेळ आली आहे; आणि तो आरंभ प्रथम आपल्यापासून झाला, तर देवाच्या सुवार्तेचा अवमान करणार्‍यांचा शेवट काय होईल?'' (1 पेत्र 4:17).

अनेक ख्रिस्ती लोक देवाच्या वचनाला चुईंगमप्रमाणे चघळत असतात. देवाचे वचन गोड असल्यामुळे ते सतत वचन चघळत राहतात आणि मग ते थुंकून देतात. ते वचन त्यांच्या अंतःकरणाच्या पचनक्रियेपर्यंत पोहंचत नाही. स्वतःचे परीक्षण करण्याकरिता ते वचनाला गांभीर्याने घेत नाहीत.

अनेक कडू अनुभवांद्वारे देवाचे वचन आपल्या पोटात पचल्या जाते. परंतु, या सर्व कडू अनुभवांमध्ये आपल्याला देवाकडून प्राप्त होणार्‍या धीराचा अनुभव देखील येतो (2 करिंथ 1:4). असे झाल्यावरच आपण आपल्या पीढीला भविष्यवाणीचा संदेश सांगू शकू.

''तूं पुन्हा 'संदेश दिला पाहिजे'' असे प्रभुने योहानाला म्हटले. कारण आता योहानाने वचन पचविले होते. देवाने सुरुवातीला जे म्हटले त्याची तुलना या आज्ञेशी करा. आता याठिकाणी सांगितले आहे की त्याने संदेश लिहू नये तर तो सांगावा. आपण इतरांना काय सांगावे व काय सांगू नये हे आपल्याला कळायला हवे.

याठिकाणी पौलाला परत तिसर्‍या स्वर्गापर्यंत उचलण्यात आले. परंतु पौलाने 14 वर्षे या गोष्टीचा उल्लेख केला नाही आणि जेव्हा त्याने या गोष्टीचा उल्लेख केला तेव्हा तो म्हणाला, ''त्याच मनुष्याविषयीं मला माहीत आहे कीं, त्या मनुष्याला सुखलोकांत उचलून नेण्यांत आलें, (सदेह किंवा विदेही हें मला ठाऊक नाहीं; देवाला ठाऊक आहें;) आणि माणसानें ज्यांचा उच्चारहि करणें उचित नाहीं अशीं वाक्ये त्यानें ऐकलीं'' (2 करिंथ 12:4).

देवाने योहानाला जे सांगितले व लोकांना जे सांगितले त्यातील फरक योहानाला स्पष्टपणे कळला होता.