मंडळी हे ख्रिस्ताचे शरीर आहे, केवळ दर आठवड्याला एकत्र येणाऱ्या विश्वासणाऱ्यांचा मेळावा नव्हे . तेव्हा आपण हे सुनिश्चित केले पाहिजे की आपण फक्त एक "धार्मिक ख्रिस्ती गट" नाही तर ते शरीर बांधत आहोत. कोणताही माणूस धार्मिक गटाची सुरवात करू शकतो. तथापि, ख्रिस्ताचे शरीर बांधण्यासाठी देवाकडून कृपा आणि अभिषेक आवश्यक आहे - आणि यासाठी आपल्याला स्वतःला नाकारावे लागेल, दररोज मरावे लागेल आणि पवित्र आत्म्याने भरले जावे लागेल.
जुन्या कराराखालील इस्राएली लोक एक जन समूह होता (मंडळी) , शरीर नव्हते. आजकाल अनेक मोठ्या मंडळ्या एक शरीर नसून केवळ एक जनसमूह आहेत. एखादया घरात भरणाऱ्या काही लहान मंडळ्या, ह्यापेक्षा जरा बऱ्या आहेत - ते संघ आहेत पण एक शरीर नाही. पण येशू त्याचे शरीर बांधत आहे.
ख्रिस्ताचे पहिले शरीर मनुष्याने गोठ्यात (गुरांसाठीच्या चारा कुंडात) पडलेले पाहिले. त्या अपमानास्पद जन्माचा अपमान हाच मेंढपाळांनी ख्रिस्ताच्या शरीराची ओळख पटवण्याचा एक चिन्ह होता (लूक २:१२ पहा). पुन्हा एकदा, निंदेपोटी, ख्रिस्ताचे शरीर शेवटी गोलगुथा येथे एका गुन्हेगाराच्या वधस्तंभावर टांगले गेले. जन्मापासून मृत्यूपर्यंत, ख्रिस्ताच्या पहिल्या शरीराला धर्मनिरपेक्ष जगाकडून तसेच धार्मिक जगाकडूनही निंदा मिळाली.
आज ख्रिस्ताच्या शरीराच्या कोणत्याही खऱ्या अभिव्यक्तीला जगाकडून आणि बाबेलोन ख्रिस्ती धर्मजगताकडून समान निंदा सहन करावी लागेल. जर आपल्या स्थानिक मंडळीवर 'ख्रिस्ताच्या निंदेचे' असे आवरण नसेल, तर आपण तडजोड करणारे आणि "बाबेलच्या छावणीबाहेर" न गेलेले असू शकतो (इब्री १३:१३). तथापि, ख्रिस्ताची निंदा आणि आपल्या स्वतःच्या पापामुळे, मूर्खपणामुळे किंवा कोमटपणामुळे होणाऱ्या निंदेत खूप फरक आहे. आपण एकाला दुसऱ्याशी चुकून जुळवू नये.
येशूबद्दल असे लिहिले होते की, " तो अजिबात आकर्षक नव्हता .....तो तुच्छ मानला गेला आणि त्याला मान दिला गेला नाही" (यशया ५३:२, ३). त्याचे वैभव त्याच्या आंतरिक जीवनात होते - कृपा आणि सत्याने भरलेले - जे बहुतेक लोकांपासून लपलेले होते (योहान १:१४). आपल्या स्थानिक मंडळ्या देखील आकर्षक नसाव्यात - जगासाठी किंवा बॅबिलोनियन ख्रिस्ती धर्मजगतासाठी. मंडळी फक्त त्यांच्यासाठी आकर्षक असली पाहिजे जे ईश्वरीय जीवनाच्या शोधात आत येतात. निवासमंडपाच्या तंबूला आतून सुंदर पडदे होते. पण बाहेरील आवरण गडद तपकिरी मेंढ्याच्या कातड्याचे होते जे धूळ आणि मातीने झाकलेले होते. सौंदर्य सर्वस्वी तंबूच्या आतील पडद्यांमध्ये होते. ख्रिस्ताची वधू देखील "तिच्या आंतरिक जीवनात गौरवशाली" आहे (स्तोत्र ४५:१३). आणि "तिच्या आतील वैभवावर (निंदेचे) आवरण असेल" (यशया ४:५).
इथेच मंडळीच्या नेत्यांची मोठी जबाबदारी आहे. ते मंडळीला ज्या पद्धतीने पुढे नेतील त्यावरून हे ठरवले जाईल की ती मंडळी त्या येशूसारखी होईल, ज्याला मनुष्याकडून आदर मिळाला नाही, की अशी मंडळी जीची जगाकडून प्रशंसा आणि सन्मान होईल. जर आपण जगाकडून किंवा इतर दैहिक किंवा आत्मिक ख्रिस्ती लोकांकडून प्रशंसा मिळवण्याचा प्रयत्न केला तर आपण निश्चितच बॅबिलोन बांधू. जेव्हा आपण सर्वसाधारणपणे ख्रिस्ती धर्मजगतात लोकप्रिय आणि स्वीकारले जातो, तेव्हा आपण खात्री बाळगू शकतो की आपण येशूच्या पावलांवर पाऊल टाकत नाही आहोत ( येशूच्या मार्गाने नाही चालत आहोत ).
येशू म्हणाला, "माझ्यामुळे जेव्हा लोक तुमचा अपमान करतील, तुमचा छळ करतील आणि तुमच्याविरुद्ध सर्व प्रकारचे वाईट खोटे बोलतील तेव्हा तुम्ही धन्य आहात. आनंद करा उल्हास करा, कारण तुमच्यापूर्वी जे संदेष्टे होऊन गेले त्यांचा त्यांनी असाच छळ केला" (मत्तय ५:११,१२). २० व्या शतकांपूर्वी, हेरोद आणि त्याच्या सैनीकांची ख्रिस्ताच्या पहिल्या शरीराला, बाळ येशूला मारण्याची त्यांची तीव्र इच्छा होती . आणि आज अनेक ठिकाणी असे बरेच लोक आहेत जे ख्रिस्ताच्या शरीराच्या सुरुवातीच्या अवशेषांचा नाश करण्यास उत्सुक आहेत. योसेफाने देवाच्या आवाजाकडे संवेदनशील राहून आणि देवाने त्याला जे करायला सांगितले ते त्वरित पाळून त्या शरीराचे रक्षण केले (मत्तय २:१३-१५). ख्रिस्ताच्या मंडळीमध्ये जबाबदारी असलेल्या आपणही योसेफासारखे असले पाहिजे. आपण 'ऐकणारे' असले पाहिजे - पवित्र आत्मा आपल्याला जे सांगतो ते ऐकले पाहिजे आणि आपल्याला जे सांगितले जाते ते त्वरित आपण पाळले पाहिजे. जर आपण ऐकले नाही आणि आज्ञा पाळली नाही, तर आपल्या परिसरातील ख्रिस्ताच्या शरीराचे एक प्रकारे नुकसान होईल - आणि शेवटच्या दिवशी आपल्याला त्यासाठी जबाबदार धरले जाऊ शकते. या बाबतीत आपण आपली जबाबदारी गांभीर्याने घेतली पाहिजे, कारण आपल्या जबाबदारीवर सोपवलेल्या प्रत्येक आतम्यासाठी आपल्याला देवाला हिशेब द्यावा लागेल (इब्री १३:१७)