WFTW Body: 

‘‘त्यावेळीं व्यभिचार करीत असतांना धरिलेल्या एका स्त्रीला शास्त्री व परूशी ह्यांनीं त्याच्याकडे आणिलें, व तिला मध्यें उभें करून ते त्याला म्हणालें, गुरुजी, ही स्त्री व्यभिचार करीत असतांना धरण्यांत आलीं. मोशेनें नियमशास्त्रांत आम्हांस अशी आज्ञा दिली आहे कीं, अशांना दगडमार करावा; तर आपण हिच्याविषयीं काय म्हणतां? त्याला दोष लावावयाला आपणांस कांहींतरी मिळावें म्हणून त्याची परीक्षा पाहाण्याकरितां ते असें म्हणाले. येशू तर खालीं ओणवून बोटानें जमिनीवर लिहूं लागला’’ (योहान 8:3–6).

व्यभिचारी स्त्रीला धोंडमार करण्याबाबतच्या देवाच्या निमयामागचा हेतु परूश्यांना कळला नव्हता. देवाला वाटत नव्हते की कोणा स्त्रीला धोंडमार करून जिवे मारण्यात यावे. परंतु, देव व्यभिचाराच्या पापाला आळा घालू इच्छित होता. याठिकाणी परूशी नियमांचे पालन करण्याबाबत काळजी घेत आहे असे नाही. येशूला दोषी ठरविण्याचे ते कारण शोधीत होते. त्यांनी या पापी स्त्रीला दोषी ठरविले होते व आता ते पापारहीत देवाच्या पुत्राला देखील दोषी ठरवू पाहत होते. परूशी अशा प्रकारचे लोक होते. त्यांना देवाची भिती नव्हती. ते सर्वसामान्य लोकांना दोष देण्याप्रमाणेच अति दैवी लोकांना देखील दोष देत होते

परूश्यांना वाटले की व्यभिचारी स्त्रीची घटना आता येशूला दोषात पकडण्यामागे उत्तम संधी आहे. जर येशूने म्हटले असते, "तिला धोंडमार करा" तर परूशी लोक म्हणाले असते की येशू दयाळू व कनवाळू नाही. जर येशू म्हणाला असता, "तिला धोंडमार करू नका" तर परूश्यांनी येशूवर दोष लावला असता की येशूला मोशेच्या नियमांची पर्वा नाही. नाणे फेकून ते कोणत्याही बाजुला पडले तरी जीत आमचीच म्हणण्याप्रमाणे हे आहे. परंतु, ते जिंकले नाही. ते हारले. येशूने तात्काळ उत्तर दिले नाही. परंतु, येशू खाली बसला व देव पित्याच्या मार्गदर्शनाची त्याने वाट पाहिली. येशूने देवपित्याचे उत्तर ऐकले व त्यांना म्हटले, "तुम्हांमध्यें जो निष्पाप असेल त्यानें प्रथम तिच्यावर दगड टाकावा" (योहान 8:7). हा प्रश्न सोडविण्याकरिता स्वर्गातील पित्याचे एक वाक्य पुरे होते. जर तुम्ही पवित्र आत्म्याचे ऐकले तर अशा परिस्थितीत तुम्हाला लांबलचक संदेश देण्याची गरज पडणार नाही. तुमच्या शत्रुंचे तोंड बंद करण्याकरिता एक वाक्य पुरे आहे. आज जे परूशी नाहीत त्यांना देव असे ज्ञानाने भरलेले वचन देतो. कारण ते इतरांना दोष लावीत नाहीत. अशा लोकांकरिता देवाचे अभिवचन पुढीलप्रमाणे आहे, ‘‘कारण मी तुम्हांस अशी वाचा व बुद्धि देईन कीं तिला अडविण्यास किंवा तिच्याविरुद्ध बोलण्यास तुमचे कोणीहि विरोधक समर्थ होणार नाहींत’’ (लूक 21:15).

येशू व्यभिचाराच्या विरुद्ध होता का? होय, नक्कीच. परंतु, व्यभिचारापेक्षा तो कायदेकट्टरपंथीयांविरुद्ध अधिक होता. आपल्याला याठिकाणी स्पष्टपणे दिसते : येशूच्या एका बाजुला व्यभिचारी स्त्री होती व दुसर्‍या बाजुला कायद्याचे पुजारी परूशी लोक होते. शेवटी आपण बघतो की व्यभिचारी स्त्री येशूच्या पायाजवळ बसली आणि हे कायदेपुजारी येशूच्या मुखातून निघालेल्या शब्दांमुळे त्याच्यापासून दूर गेले. या स्त्रीच्या डोळ्यामधील मुसळ व्यभिचार होता. परंतु, परूश्यांच्या डोळ्यामध्ये कायद्याची पुजा ही मोठी कुसळ होती.

आता तुम्ही स्वतःविषयी विचार करा की व्यभिचाराइतके घोर पाप न केलेल्या तुमच्या चांगल्या भाऊबहिणींना तुम्ही किती वेळा दोषी ठरविले आहे. त्यांच्या पाठीमागे तुम्ही त्यांच्या विरुद्ध जे बोलला त्याची आठवण करा. ज्या ज्या वेळी तुम्ही कोणावर दोषारोप केले त्या त्या वेळी तुमच्या डोळ्यामध्ये कठोर, न्यायाचे व टीकात्मक वृत्तीचे कुसळ होते व ते मोठ मोठे होत गेले व त्यामुळे तुम्ही आत्मिकरित्या आंधळे झाला. खरेतर तुम्ही कोणाला इजा केली आहे? इतरांपेक्षा स्वतःलाच.

तुम्हाला वाटते का की डोळ्यात कुसळ असलेली व्यक्ती नेत्रतज्ञ असून इतरांच्या डोळ्यातील मुसळ काढू शकते? हे प्रभुचे वचन तुमच्यासाठी आहे, "तुमच्या भावाबहिणींना स्वतःचा विचार करू द्या. त्यांच्या डोळ्यात तर थोडे मुसळ आहे परंतु, तुमच्या डोळ्यातील कुसळ अधिक घातक आहे."

दोष देण्याच्या आत्म्याविरुद्ध येशू इतका कठारे का बाले ला? कारण जेव्हा तो स्वर्गात होता तेव्हा सैतान लोकांना दोष देतांना त्याने एके ले होते. सैतान हा रात्रंदिवस सतत बंधुना दोष देत राहतो (प्रकटी 12:10). जेव्हा येशू पृथ्वीवर आला व त्याने सैतानामधील दोष देण्याचा आत्मा लोकांमध्ये पाहिला तेव्हा त्याला सैतानाची आठवण झाली. येशूला स्वर्गात असतांना दोषा देण्याच्या आत्म्याचा वीट होता व तो आजही आहे. जेव्हा हा तुम्ही इतरांना दोष देता तेव्हा तुम्ही येशूला सैतानाची आठवण करून देता. अनके विश्वासणायांना हे कळत नाही - कारण त्यांच्या डोळ्चातील मुसळीमुळे ते आंधळे झाले आहत.

हाच संदेश मी 30 वर्षांपासून देत आहे. जर तुम्हाला आत्मिक उन्नती हवी असेल तर इतरांचा न्याय करणे थांबवा व स्वतःचा न्याय करा. तुमचा मायक्रोस्कोप स्वतःकरिता वापरा, इतरांकरिता नव्हे. तुम्ही स्वतःचा न्याय केल्यावर तुम्ही काय करावे मी तुम्हाला सांगतो. स्वतःचा आणखी न्याय करा. तुम्ही स्वतःचा न्याय कधी थांबवावा? जेव्हा तुम्ही येशू ख्रिस्तासमान व्हाल. प्रेषित पौलाने त्याच्या जीवनाच्या शेवटी विश्वासणार्‍यांना सांगितले, "...तरी तो प्रगट होईल तेव्हां आपण त्याच्यासारखे होऊं हें आपल्याला माहीत आहे, कारण जसा तो आहे तसाच तो आपल्याला दिसेल. जो कोणी त्यासंबंधानें ही आशा बाळगितो तो, जसा तो शुद्ध आहे, तसें आपणाला शुद्ध करितो" (1 योहान 3:2–3)

तर मग मंडळीतील चुकलेल्या व्यक्तीला मंडळीतील पुढार्‍याने कसे ताळ्यावर आणावे? दयेने. प्रभुने दया दाखविली तशी विपुल दया दाखवून. येशूने त्या स्त्रीच्या व्यभिचाराच्या पापाकडे दुर्लक्ष केले नाही. मुळीच नाही. पहिले त्याने मोठ्या करुणेने म्हटले, "मी तुला दोष देत नाही." मग येशूने तिला ताकीद दिली, "यापुढे हे पाप करू नको" (योहान 8:11). देवाची कृपा केवळ पापांची क्षमाच करीत नाही तर पापांची क्षमा केल्यावर आपल्याला ताकीद देते की आपण यापुढे पाप करू नये. पापाविरुद्ध उभे राहण्याकरिता देवाची कृपा आपली मदत देखील करिते.

परूशी लोक का निघून गेले? त्याने भग्नहृदयी होऊन म्हणायला हवे होते, "प्रभु, आमची क्षमा कर. मी स्वतःचे पाप बघितले नाही. माझी कठोर वृत्ती मी बघितली नाही. आता मला कळाले आहे की या स्त्रीपेक्षा मी अधिक वाईट आहे. माझ्यावर दया कर." परंतु, त्यांच्यापैकी कोणीही प्रभुकडे येऊन तसे म्हणाला नाही.

तुम्ही अनेक लोकांच्या अनेक चुका शोधता, त्याविषयी काय? आज तुम्ही प्रभुपुढे भग्न हृदयाचे होणार का?

जेव्हा काही लोक माझ्याकडे येऊन माझी क्षमा मागतात तेव्हा काही वेळा मला जाणवते की ते भग्नहृदयी झाले नाहीत. त्यावरून सिद्ध होते की त्यांना पापाबद्दल पश्चात्ताप झालेला नाही. विवेक शुद्ध राखण्याकरिता केवळ ते नियमांचे पालन करीत होते. मी तात्काळ त्यांची क्षमा करितो परंतु, ते परत त्या पापात पडतील अशी माझी खात्री असते कारण ते कायदा पुजारी असतात. त्यांनी तांत्रिकरित्या कबूल केलेले असते की त्यांनी नियम मोडला आहे. ते म्हणतात त्यांनी 347 क्रमांकाचा नियम मोडला आहे - आपल्या भावाच्या पाठीमागे त्याची चुगली करू नको व केल्यास त्याची क्षमा माग. म्हणून ते तांत्रिक रीतीने क्षमा मागण्याकरिता येतात जेणेकरून 9 क्रमांकाचा नियम ते पाळतील - कोणाविरुद्ध काही केल्यास त्याची क्षमा माग!! परंतु, त्यांच्यामध्ये खरे परिवर्तन घडून येत नाही. त्यांचे जीवन पूर्वीसारखेच अस्ते.

जेव्हा देव आपल्या पापांवर प्रकाश टाकतो तेव्हा आपण त्या प्रकाशामुळे इतके अंध होतो की आपण येशूच्या चरणावर मृत झाल्यासारखे पडतो (प्रकटी 1:17). आपण स्वतःला जगातील सर्वात मोठे पापी समजतो (1 तीमथ्य 1:15). तुम्हाला कधी असे वाटले का? की तुम्हाला वाटले तुम्ही सुटला आहात? मग तुम्ही परूशी आहा. डोळ्यामध्ये मुसळ असलेल्या गरीब लोकांना धोंडमार करण्याचा विचार तुमच्या मनामध्ये आला व त्याबद्दल तुम्हाला पश्चात्ताप झाला नाही तर परूश्यांसारखे अस्वस्थ होऊन निसटाल. परमेश्वराने तुमच्या हट्टी हृदयाला भग्न करावे.

याकोब 2:13 मध्ये आपल्याला आठवण करून देण्यात आली आहे, "कारण ज्यानें दया केली नाहीं त्याचा न्याय दयेवांचून होईल; दया न्यायावर विजय मिळविते." याबाबतीत मंडळीतील पुढारी पहिल्या क्रमांकाचे गुन्हेगार आहेत. आईवडिलांनी सुद्धा लेकरांना शिस्त लावतांना याबाबतीत काळजी बाळगावी व दयाळू असाव

व्यभिचारात सापडलेला चर्चचा पुढारी मंडळीचा नाश करू शकत नाही कारण प्रत्येक विश्वासणार्‍यांना माहीत असते की व्यभिचार पाप आहे. अशा पुढार्‍याला त्याच्या पदावरून तात्काळ काढून टाकण्यात यावे. परंतु, एखादा चर्चचा पुढारी नियम पुजारी असल्यास मंडळीला मोठा धोका आहे. कारण तो तर पवित्रीकरणावर शिकवितो. ज्यांना नियमपुजेचे पाप माहीत नाही ते त्याच्या मागे जातात व ते सुद्धा नियम पुजारी बनतात. आंधळा परूशी इतरांना देखील नियमपुजेच्या खड्ड्यामध्ये पाडतो कारण तो स्वतः पडलेला असतो.

तुम्हाला कळले असेल की व्यभिचाराच्या दहा पट वाईट पाप म्हणजे नियमपुजेचे पाप. न्याय करण्याची वृत्ती अधिक वाईट आहे. मागील महिण्यामध्ये तुम्ही व्यभिचाराच्या दहापट वाईट पापात पडले असाल तर कसा पश्चात्ताप कराल? दोष देण्याच्या आत्म्याबद्दल तुम्ही अधिक पश्चात्ताप करणे गरजेचे आहे.