WFTW Body: 

चांगल्या मनाने पेत्राने येशूला वधस्तंभावर जाऊ नका असे सांगितले. परंतु येशूने त्या सूचवन्यात सैतानाचा आवाज असल्याचे ताबडतोब ओळखले आणि पेत्राला म्हणाला , "अरे सैताना, माझ्यापुढून निघून जा! कारण देवाच्या गोष्टींकडे तुझे लक्ष नाही, तर माणसांच्या गोष्टींकडे आहे.” (मत्तय. 16:23).

आपण इथे पाहतो की आपण देवाचा आवाज आणि सैतानाचा आवाज यातील फरक आपल्या अंत:करणात तेव्हाच ओळखू शकतो जेव्हा आपले मन देवाच्या गोष्टीवर केंद्रित असते. जर आपले मन प्रामुख्याने आपल्या हितसंबंधांवर केंद्रित असेल तर आपण सैतानाचा आवाज हा देवाचा आवाज समजू शकतो. त्यामुळे आपण जे काही करतो त्यात - अगदी आपल्या अभ्यासात, कामात आणी खेळात- स्वगीर्य दृष्टीकोन ठेवला पाहिजे. सवर्काही देवाच्या गौरवासाठी करा.

कॉलेजमध्ये चांगला अभ्यास करा आणि मैदानावर चांगले खेळा, आणि नेहमी देवाचे गौरव करा - एरिक लीडेल सारखे, ज्याला ऑलिम्पक सुवणर्पदक गमावावे लागले तरीही त्याने विश्वासाशी कधीही तडजोड केली नाही!! ख्रिस्ती या नात्याने तुमची काही मानके आहते हे इतरांना सांगण्यास कधीही लाज वाटू देऊ नका. परमेश्वर तुम्हाला असे करण्यास मदत करो.

देवाने या पृथ्वीवरील बर्‍याच गोष्टींना आकर्षक असण्याची परवानगी दिली आहे, जेणेकरुन जेव्हा आपल्याला त्यांचा मोह होतो तेव्हा आपण हे सिद्ध करू शकू की पृथ्वीवरील इतर सर्व गोष्टींपक्षा आपण देवावर अधिक प्रेम करतो. अशा प्रकारे आपण सैतानाला लाजवतो . निर्मानकर्ता त्याच्या सर्व निर्मितीपेक्षा खूप महान, कितीतरी अधिक अद्भतु आणि कितीतरी अधिक समाधान देणारा आहे .हे सत्य आहे आणि म्हणूनच आपण त्यावर विश्वास ठेवतो. आपला हा विश्वास आपल्याला जगाच्या आकर्षणांवर मात करण्यास मदत करतो. जेव्हा आपण या विश्वासाने आंधळेपणाने जगतो, तेव्हा आपल्या भावना योग्य वेळी आपला पाठपुरावा करतील. आपण आपल्या भावनांना प्रथम स्थान देऊ नये.

सैतानाविरुद्ध लढणे आपल्या आत्म्यासाठी चांगले आहे. त्यानेच आपण बलवान होऊ शकतो. ख्रिस्ताचे चांगले सैनिक व्हा. परमेश्वर तुमच्यावर अवलंबून आहे. परमेश्वराचा ध्वज उंच आिण विजयी फडकवत ठेवण्यासाठी आम्ही देखील तुमच्यावर अवलंबून आहोत - जेणेकरून परमेश्वराच्या नावाची कधीही लाज जाऊ नये!

जर सैनिक आपला देश आझाद आणी स्वतंत्र ठेवण्यासाठी इतका त्याग करू शकतात, तर आपण आपल्या सर्वस्वाचा (आपल्या जीवनाचेसुद्धा) बलिदान करण्यास कितीतरी अधिक जास्त तयार असले पाहिजे, जेणेकरून आपल्या जीवनात प्रत्येक गोष्टीतून परमेश्वराचा सन्मान होईल. आणि सैतान लज्जित होईल.