WFTW Body: 

मत्तय ११:२८ ते ३० मध्ये, येशूने विसावा घेण्याबद्दल आणि ओझे असल्याबद्दल सांगितले. तेथे येशूच्या शब्दांचा अर्थ सांगण्यासाठी, तो आपल्याला पृथ्वीवरील सर्व ओझ्यांबद्दल विश्रांती घेण्यास आणि त्याचे ओझे (जू) आपल्या अंतःकरणावर घेण्यास सांगत होता. जोपर्यंत आपण आपले सर्व पृथ्वीवरील भार त्याला देत नाही तोपर्यंत आपण प्रभूचे ओझे उचलू शकत नाही ("तुमचा भार प्रभूवर टाका - त्याला तुमची सर्व काळजी असू द्या" - स्तोत्र ५५:२२; "अन्न आणि कपड्याची काळजी करू नका. जर तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल काळजी करायची आहे, तर देवाच्या राज्याची आणि त्याच्या नीतिमत्तेची काळजी करा" - मत्तय ६:३१,३३).

जर तुमचे मन जगिक गोष्टींबद्दल अनिश्चितता आणि चिंतेने भरलेले असेल तर तुम्ही परमेश्वरासाठी कुचकामी ठराल. यात काही शंका नाही की, तुम्हाला जगिक गोष्टींचा विचार करावा लागतो , पण तुम्ही त्यांपैकी कशाचीही काळजी करता कामा नये. ज्या गोष्टींना सार्वकलिक मूल्य आहे अशा गोष्टींचीच तुमच्या अंतःकरणात काळजी असावी. अशा प्रकारे आपण या पृथ्वीवरील लोकांपेक्षा वेगळे आहोत. तुम्ही पृथ्वीवर दिलेल्या परीक्षांच्या निकालांनाही सार्वकलिक मूल्य नाही. आपण नक्कीच, आपले सर्वोत्तम प्रयत्न केले पाहिजे. परंतु तुम्ही निकालाची कधीही काळजी करू नये.

जर तुम्ही देवाचे राज्य आणि त्याचि धार्मिकता मिळवण्यासाठी १००% गुण मिळवाण्याचा प्रयत्न कराल तर तुम्ही सर्वकलिक जीवन मिळवण्यात प्रथम क्रमांकावर असाल. तेच मी स्वतःसाठी अनेक वर्षांपूर्वी निवडले होते.

सफन्या ३:१७ मधील वाक्य म्हणते, "जे काही घडते त्यामध्ये देव शांतपणे तुमच्यासाठी प्रेमाने योजना आखत आहे". आणि प्रभु आपल्याला आठवण करून देतो, "मी काय करतो, ते आता तुम्हाला समजत नाही, परंतु नंतर तुम्हाला समजेल" - (योहान १३:७).

शेवटी, मी तुम्हाला पुन्हा एकदा प्रोत्साहित करू इच्छितो (जसे मी सर्वत्र लोकांना प्रोत्साहित करतो) नम्रतेचा पाठपुरावा करण्यासाठी आणि स्वत: चा कमी विचार करण्यासाठी. याचा अर्थ असा नाही की कमी आत्मसन्मान असणे किंवा देवाचे मूल या नात्याने तुमची किंमत कमी करणे किंवा देवाने तुम्हाला दिलेले दान किंवा क्षमतांना कमी लेखणे. तुम्ही देवाची मुले आहात - आणि त्यामुळे कमी आत्मसन्मानाला जागा नाही. परंतु तुम्ही देवापुढे काहीही नाही हे तुम्ही ओळखता तेव्हाच देव तुमच्या जीवनात सर्व काही बनू शकतो. इतर जे तुम्हाला ओळखतात त्यांनी तुमच्यामध्ये जे दिसते त्याबद्दल देवाचा गौरव केला पाहिजे. यामध्ये केवळ देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी तुमच्या स्वतःच्या निवडी सोडून देणे समाविष्ट आहे. याचा अर्थ देवाने तुम्हाला जे काही दिले आहे त्यासाठी त्याला नेहमीच गौरव देणे आणि त्याने जे काही दिले आहे ते केवळ त्याच्या गौरवासाठी वापरण्याचा निर्धार करणे.

दुसऱ्यामध्ये कितीही दोष किंवा कमतरता असल्या तरीही इतरांना कमी लेखू नका किंवा कोणत्याही माणसाची चेष्टा करू नका. देव नम्र लोकांवर विपुल कृपा करतो - आणि त्यांची आत्मिक प्रगती अभूतपूर्व असेल. येशूप्रमाणे तुम्ही तुमचे सर्व दिवस नम्रतेने चालावे.