"तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात" (मत्तय ५:१३). येशूने हे लोकसमुदयाला उद्देशून म्हंटले नाही. लक्षात ठेवा की डोंगरावरील प्रवचन प्रामुख्याने त्याच्या शिष्यांसाठी आहे आणि इतर लोक ऐकत बसले होते. लोकसमुदाय निश्चितच पृथ्वीचे मीठ नाहीत - त्यांच्याकडे मीठ नाही. परंतु शिष्य पृथ्वीचे मीठ होतील . येशू शब्दचित्रे वापरण्यात माहिर होता आणि जशी पवित्र आत्म्याची प्रेरणा आणि प्रकटीकरणाचा शोध घेत असताना त्यांच्यामागील अर्थ समजून घेणे त्याने आपल्यावर सोडले. "तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात, पण जर मीठाचा खारटपणांच गेला तर तर तो खारटपणा त्याला कशाने आणता येईल? पुढे ते बाहेर फेकले जाऊन माणसांच्या पायांखाली तुडविले जाण्यापलीकडे त्याचा कसलाच उपयोग नाही."
तो हे चित्र आपल्याला हे दाखवण्यासाठी वापरत आहे की त्याचे शिष्य नेहमीच संख्येने कमी असतील. जर तुमच्याकडे भात आणि रस्याची प्लेट असेल, तर तुम्ही भात आणि त्या रस्याच्या संपूर्ण प्लेटमध्ये किती मीठ घालाल ? तुम्ही अर्धा चमचाही घालणार नाही. संपूर्ण प्लेटची चव चांगली येण्यासाठी तुम्हाला खूप कमी मीठ लागेल. पण जर मीठाला खारटपणांच नसेल, तर तुम्ही त्यात २० चमचे मीठ घातलं तरी चवीत काही फरक पडणार नाही. म्हणून मुद्दा संख्येचा नाही तर गुणवत्तेचा आहे. जेव्हा येशू म्हणतो, " पण जर मीठाचा खारटपणांच गेला तर " (मत्तय ५:१३), तेव्हा तो मिठाच्या प्रमाणाबद्दल अजिबात बोलत नाहीये.
अन्नाच्या तुलनेत मिठाचे प्रमाण हे जगाच्या लोकसंख्येच्या (आणि कधीकधी मंडळीमधील लोकांच्या संख्येच्या!) तुलनेत पृथ्वीवरील खऱ्या शिष्यांच्या प्रमाणाइतकेच आहे. खरे शिष्य खूप कमी आहेत.
पण फक्त त्याच खऱ्या शिष्याना पृथ्वीचे मीठ म्हटले जाते. त्यांच्यामुळेच पृथ्वी न्यायापासून वाचली आहे. अब्राहामाने एकदा देवाकडे सदोम या दुष्ट शहरासाठी प्रार्थना केली होती, ज्याबद्दल परमेश्वराने सांगितले होते की तो ते शहर नष्ट करेल. त्याने प्रभूला विचारले (तो अजूनही ते शहर नष्ट करेल का याबद्दल), "समजा प्रभू, तुम्हाला सदोममध्ये फक्त दहाच नीतिमान लोक आढळले तर ?" (उत्पत्ति १८:३२), परमेश्वर म्हणाला, “जर त्या शहरात दहा नीतिमान लोक असतील तर मी सदोमचा नाश करणार नाही.” शहराचा नाश होण्यापासून वाचवण्यासाठी दहा लोक पुरेसे होते, परंतु तेथे दहाही नीतिमान नव्हते, म्हणून ते शहर नष्ट झाले.
यिर्मयाच्या काळात, परमेश्वराने ती संख्या आणखी कमी केली. जेव्हा इस्राएलला बॅबिलोनियन राजा बंदिवासात नेणार होता(ही देवाची शिक्षा होती) तेव्हा यिर्मया भविष्यवाणी करत होता. त्याने ४० वर्षे त्यांना उपदेश केला आणि चेतावणी दिली, परंतु त्यांनी त्याचे ऐकले नाही. परमेश्वराने यिर्मयाला सांगितले, “यरुशलेमच्या रस्त्यांवरून जा आणि पाहा की तुम्हाला कोणी धर्माने वागणारा, सत्याची कास धरणारा एकही माणूस (दहा नाही, फक्त एकच माणूस) सापडतो का , सापडल्यास मी संपूर्ण शहराला क्षमा करीन” (यिर्मया ५:१). हे अद्भुत आहे, परंतु तेथे एकही नीतिमान माणूस नव्हता आणि म्हणून संपूर्ण शहर बंदिवासात गेले.
बऱ्याचदा देव असेच आजूबाजूला पाहत असतो. बॅबिलोनच्या काळात यहेज्केल देखील एक संदेष्टा होता आणि देवाने यहेज्केलद्वारे म्हटले, “मी भूमीचा नाश करू नये म्हणून तिच्यातला कोणी तट बांधील, कोणी मजसमोर देशासाठी तटाच्या खिंडीत उभा राहील की काय याची मी वाट पहिली, पण मला कोणी आढळला नाही” (यहेज्केल २२:३०). देवाने तेच शब्द बोलले: गुणवत्ता, संख्या किवा प्रमाण नाही. तो १०,००० लोक शोधत नव्हता. तो केवळ एका माणसाचा शोध घेत होता.
देव एका माणसाद्वारे जर तो पूर्ण मनाचा आणि क्रांतिकारी असेल तर काय करू शकतो हे आश्चर्यकारक आहे. मोशेचा विचार करा - जुन्या करारातील एक माणूस ज्याच्याद्वारे देव २० लाख इस्राएली लोकांना सोडवू शकला. इस्राएलमध्ये दुसरा कोणीही नेता होण्यास योग्य नव्हता. एलीयाच्या काळात, जरी ७००० लोक होते ज्यांनी बआलापुढे गुडघे टेकले नाहीत (मूर्तींची पूजा न करणाऱ्या ७००० विश्वासणाऱ्यांचे चित्र), तरी स्वर्गातून अग्नी खाली आणणारा फक्त एकच माणूस (एलीया) होता. आजही तेच प्रमाण आहे. ७००० विश्वासणाऱ्यांमध्ये तुम्हाला कदाचित एकच विश्वासणारा सापडेल जो त्यांच्या सेवेद्वारे किंवा प्रार्थनेद्वारे स्वर्गातून अग्नी खाली आणू शकतो.
७००० लोक म्हणतील, "मी हे करत नाही आणि मी ते करत नाही." त्यांची साक्ष नकारात्मक आहे! "मी चित्रपट पाहत नाही, मी मद्यपान करत नाही, मी जुगार खेळत नाही आणि मी सिगारेट ओढत नाही." ते बालची पूजा करत नाहीत, पण स्वर्गातून अग्नी कोण खाली आणू शकतो? एलियासारखा जो देवा समोर जगतो ; एलियाकडे मीठ होते.
नवीन करारातही असेच आहे. जर प्रेषित पौल अस्तित्वात नसता तर मंडळीला किती नुकसान झाले असते आणि आपलेही किती नुकसान झाले असते याची तुम्ही कल्पना करू शकता का ? किती शास्त्र गमावले असते? तो एक माणूस होता! अर्थातच देवाच्या कामात एका माणसाच्या अपयशामुळे अडथळा येत नाही (देव दुसऱ्या कोणाचा तरी वापर करू शकला असता), परंतु आपण शास्त्रात जे पाहतो ते असे आहे की देव अनेकदा १०,००० तडजोड करणाऱ्यांपेक्षा पूर्ण मनाच्या एका व्यक्तीद्वारे जास्त साध्य करतो. येशू त्याच्या शिष्यांना, “तुम्ही मिठासारखे आहात” हे सांगताना याच मुद्द्यावर भर देतो “आम्ही खूप कमी आहोत!” अशी तक्रार कधीही करू नका.