लेखक :   झॅक पुननं
WFTW Body: 

एखाद्या विश्वासणाऱ्यासाठी जर तो देवासमोर चालत नसेल तर त्याच्या खऱ्या आध्यात्मिक स्थितीविषयी अनभिज्ञ असणे खूप सोपे आहे. प्रकटीकरणातील सात मंडळ्यांच्या पुढाऱ्यांना देवाने जो दोष दिला त्यावरून हे स्पष्ट होते. लावदिकीया येथील मंडळीमधील दूताला (वडील) तो म्हणाला, “तू कष्टी, दीन, दरिद्री, आंधळा व उघडावाघडा आहेस, हे तुला कळत नाही.”(प्रकटीकरण ३:१७).

देव आपल्या जीवनात वेगवेगळ्या परिस्थिती उद्भवू देतो ज्यामुळे आपल्या अंत:करणात जे दडलेले आहे ते उघड होईल. वर्षानुवर्षे आम्ही वेगवेगळ्या लोकांसह अनुभवलेल्या कठीण अनुभवांमुळे आम्ही आपल्या हृदयात बर्‍याच अप्रिय आठवणी साठवलेल्या असतात. त्या आमच्या अंतःकरणाच्या तळाशी दडलेल्या असतात - आणि आम्ही समजतो की आमची अंतःकरणे स्वच्छ आहेत. मग देव काहीतरी लहानशी गोष्ट घडू देतो, जी या सर्व कुजलेल्या गोष्टींना हलवून टाकते आणि त्या सर्व आपल्या मनात आणते. हीच अशी वेळ आहे जेव्हा आपण स्वतःला शुद्ध केले पाहिजे आणि त्यामध्ये संबंधित लोकांना क्षमा केली पाहिजे आणि त्यांच्यावर प्रेम करण्याचे ठरविले पाहिजे. जर आपण अशा संधी आपली मने या गोष्टींपासून शुद्ध करण्यासाठी वापरल्या नाहीत तर, गोंधळ संपल्यानंतर त्या पुन्हा अंतःकरणाच्या तळाशी बुडतील आणि आपल्या अंत:करणात राहतील. त्यानंतर आपण असे समजतो की सर्व काही ठीक आहे. पण तसे नसते. आणखी एक छोटीशी घटना त्या सर्वांना पुन्हा आपल्या मनात आणू शकते. म्हणून प्रत्येक वेळी जेव्हा काही समोर येते तेव्हा आपण स्वत:ला शुद्ध केले पाहिजे.

उधळ्या पुत्राच्या मोठ्या भावाच्या बाबतीत आपण पाहतो की आपल्या धाकट्या भावाबद्दल त्याचा दृष्टिकोन कसा चुकीचा होता. तरीही जेव्हा हा धाकटा भाऊ परत आला आणि त्याच्यासाठी मेजवानी दिली गेली तेव्हाच हे उघड झाले. मग आपण पाहतो की त्याने आपली विधाने सत्य आहेत की नाही याची शहानिशा न करता आपल्या भावावर कल्पित आरोप केले (उदाहरणार्थ, धाकट्या भावाने “कसबिणींवर आपले पैसे वाया घालवले होते ” - लूक १५:३०). जेव्हा आपले एखाद्याशी चांगले संबंध नसतात, तेव्हा आपण त्याच्याबद्दलच्या सर्वात वाईट गोष्टींवर विश्वास ठेवतो.

वडिलांनी आपल्या मोठ्या मुलास सांगितले की "माझे जे काही आहे ते सर्व तुझेच आहे.”(लूक १५:३१). वडिलांनी त्याला जे दिलेले होते त्यात गढून जाण्याऐवजी मोठा भाऊ त्याच्या स्वत:च्या कर्तृत्वाने व्यापला गेला: "तुमची एकही आज्ञा मी कधीच मोडली नाही.मी इतकी वर्षे तुमची सेवाचाकरी करत आहे.” त्याच्या भावाच्या उणिवांतदेखील तो गढून गेला होता."ह्या तुमच्या मुलाने पैसे वाया घालवले" (लूक १५:२९-३२) त्या वडिलांप्रमाणेच, देवही आपल्याला सांगतो, "माझ्याकडे जे काही आहे ते तुझे आहे". येशूमधील प्रत्येक गोष्ट आपली आहे - त्याची सर्व शुद्धता, त्याचा सर्व चांगुलपणा, त्याचा सर्व धीर, त्याची सर्व नम्रता इत्यादि.

या कथेतून आपल्याला जो धडा शिकला पाहिजे तो म्हणजे : देवाच्या कृपेच्या समृद्धतेत नेहमीच गढून रहा - आणि आपल्या स्वतःच्या कर्तृत्वाने किंवा आपल्या सहविश्वासू बांधवांच्या अपयशाने नव्हे.

आपले ध्येय येशू ख्रिस्ताच्या कृपेमध्ये आणि त्याच्या ज्ञानात वाढणे हे असले पाहिजे. (२ पेत्र ३:१८) आपण करिंथकरांस दुसरे पत्र ८:९ मध्ये कृपेची आणखी एक व्याख्या पाहतो. "आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हांला माहीत आहे; तो धनवान असता तुमच्याकरता दरिद्री झाला, अशा हेतूने की, त्याच्या दारिद्र्याने तुम्ही धनवान व्हावे." आपल्या जीवनातदेखील कृपा ही गोष्ट करेल.जर आम्ही गरजू जगासाठी आशीर्वाद होऊ शकू तर आपण लहान, अपरिचित आणि इतकेच नव्हे तर इतरांद्वारे तिरस्कृत केले गेलेले आणि इतरांच्या दृष्टीने गरीब असण्यास तयार असू. येशू चांगले कार्य करत राहिला, कारण त्याला त्याच्या पित्याची कृपा प्राप्त होती (प्रेषितांची कृत्ये १०:३८). आपल्यासाठीसुद्धा कृपा हेच करू शकते - आपल्याला इतरांसाठी आशीर्वाद असे करू शकते.

जेव्हा येशू कठीण परिस्थितीला सामोरे जात होता, तेव्हा त्याने - 'पित्या, मला या घटकेपासून वाचव' अशी प्रार्थना केली नाही तर, "हे बापा तू आपल्या नावाचे गौरव कर" अशी केली. (योहान १२:२७,२८). तुम्हीही कठीण परिस्थितीत अशीच प्रार्थना केली पाहिजे. तुम्ही आरामदायी जीवन मिळविण्याचा प्रयत्न न करता जिथे देवाचे गौरव होते त्या जीवनाचा शोध घ्या त्यासाठी तुम्हांला कितीही किंमत मोजावी लागली तरीही. देवाने तुम्हांला जिथे ठेवले आहे ती कठीण माणसे किंवा परिस्थिती बदलायला देवाला सांगू नका. अशा परिस्थितीत तुम्हाला बदलायला सांगा. जे अशी प्रार्थना करत राहतात ते कृपेत वाढतील – खरे संत होण्यासाठी ,भूतकाळात अपयशी झाले असले तरीही . "माझी कृपा तुला पुरेशी आहे" (करिन्थकरांस दुसरे पत्र १२:९) या अभिवचनाचा विचार करा. तुम्हाला कराव्या लागणार्‍या प्रत्येक कामासाठी देवाची कृपा पुरेशी आहे आणि तुम्हाला केव्हाही तोंड द्यावे लागणार्‍या प्रत्येक परिक्षेसाठी व समस्येसाठी पुरेशी आहे.