WFTW Body: 

येशूच्या शिकवणीला जसे लिहिले आहे तसेच स्वीकारले पाहिजे कारण अनेकांनी ते सौम्य केले आहे किंवा त्याचा अर्थ जसा नाही आहे तसा दाखवला आहे. कारण ते देवाच्या दर्जानुसार जगू शकत नाहीत, अनेक शिक्षकांनी त्याच्या (देवाच्या) दर्जाला त्यांच्या पातळीपर्यंत खाली आणले आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही देवाच्या वचनात असे काही पाहता जे तुम्ही साध्य करू शकत नाही किंवा जे तुमच्या जीवनाच्या दर्जा पेक्षा जास्त दर्जाचे आहे, तेव्हा तुमच्याकडे दोन पर्याय असतात. एक पर्याय म्हणजे तुम्ही असे म्हणता, "बरं, देवाच्या वचनाचा अर्थ खरोखर असा नाही. त्याचा अर्थ सामान्य अर्थाने काहीतरी वेगळा आहे पण अगदी तसा नाही." उदाहरणार्थ, "मला माहित आहे की फिलिप्पैकरास पत्र ४:४ मध्ये, 'प्रभूमध्ये नेहमी आनंद करा,' असे म्हंटले आहे, परंतु त्याचा अर्थ खरोखरच 'नेहमी आनंद करा ' असा नाही. याचा अर्थ 'सर्वसाधारणपणे' किंवा 'बहुतेक वेळा' असा आहे." अशा प्रकारे तुम्ही देवाच्या वचनाला तुमच्या दैहीक पातळीपर्यंत खाली आणण्यात यशस्वी झाला आहात आणि तुम्ही ते पाळत आहात अशी कल्पना करून स्वतःचे समाधान करत आहात. पण अध्यात्मिक वृत्तीचा ख्रिस्ती देवाचे वचन जसे आहे तसेच राहू देतो आणि म्हणतो, “मला २४/७ प्रभूमध्ये आनंद करायला हवा,” आणि तो नम्रपणे कबूल करतो की , “प्रभु, मी अजून तिथ पर्यंत (त्या दर्जापर्यंत) पोहोचलो नाही. मी काही वेळा आनंद करतो, काही वेळा कुरकुर करतो (किंवा बहुतेक वेळा), आणि अनेकदा रागावतो, पण मी सर्व परिस्थितीत आनंद करत नाही. बायबल म्हणते त्याप्रमाणे मी प्रत्येक गोष्टीसाठी आभार मानत नाही, म्हणून मी हे कबूल करतो. कृपया मला तिथे (त्या दर्जापर्यंत )घेऊन जा.”

तोच व्यक्ती देवाच्या दर्जापर्यंत पोहोचेल. दुसरा व्यक्ती, ज्याने देवाचा दर्जा त्याच्या पातळीपर्यंत खाली आणला आहे, तो कधीही ते साध्य करु शकणार नाही. एके दिवशी तो अनंतकाळात जागा होईल आणि तेव्हा त्याला कळेल की त्याने आयुष्यभर देवाची आज्ञा मोडली आहे. म्हणून, देवाचे वचन जसे आहे तसेच राहू देणे आणि हे मान्य करणे चांगले आहे की एकतर आपल्याला ते समजले नाही किंवा आपण तिथे (त्या दर्जापर्यंत) पोहोचलो नाही. मग आपण तिथे (त्या दर्जापर्यंत) पोहोचू अशी आपल्याला एक आशा आहे.

आपण हे लक्षात ठेवले पाहिजे जसे आपण मत्तय ५:२० मध्ये वाचतो : “मी तुम्हाला सांगतो, शास्त्री आणि परूशी यांच्यापेक्षा तुमचे नीतिमत्व अधिक झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणारच नाही.”

परूश्यांची नीतिमत्ता खूपच उच्च दर्जाची होती. ते दहा आज्ञा पाळत असत. श्रीमंत तरुण शासक येशूकडे आला आणि म्हणाला, “मी सर्व आज्ञा पाळल्या,” येशूने त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले नाही.(अर्थात, ते दहावी आज्ञा पाळू शकत नव्हते , परंतु दहावी आज्ञा आतील स्वभावाशी निगडीत असल्यामुळे कोणीही ती पाळू शकले नाही. परंतु ते इतर नऊ आज्ञा आणि जुन्या करारातील सर्व कायदे पाळत होते, ज्यामध्ये ६०० पेक्षा जास्त आज्ञांचा समावेश होता.) परूशी बढाई मारत की ते नियमितपणे प्रार्थना करतात, किंबहुना दिवसातून तीन वेळा, आठवड्यातून दोनदा उपवास करतात आणि त्यांच्या सर्व उत्पन्नाचा दशांश देतात. तर मग जेव्हा हे वचन म्हणते की तुमची नीतिमत्ता त्यांच्यापेक्षा जास्त असली पाहिजे तेव्हा इथे त्याचा काय अर्थ होतो?

याचा अर्थ असा आहे का की तुम्ही दिवसातून तीन वेळा प्रार्थना केली पाहिजे, आठवड्यातून दोनपेक्षा जास्त वेळा उपवास केला पाहिजे आणि तुमच्या उत्पन्नाच्या १० टक्क्यांपेक्षा जास्त दिले पाहिजे? त्याचा अर्थ असा नाही आहे . आपण नेहमी संख्यात्मक विचार करतो, कारण आपले मन सांसारिक आहे. आपण जितके जास्त सांसारिक आहोत तितके आपण संख्या, आकडेवारी आणि प्रमाणाच्या बाबतीत विचार करतो. आपण मंडळीचे मूल्यांकन त्या मंडळीत येणाऱ्या लोकांच्या जीवनाच्या गुणवत्तेवरून नाही तर मंडळीत येणाऱ्या लोकांच्या संख्येवरून करतो. आपल्याला असे वाटते की येशू म्हणाला, "जेव्हा तुम्ही एका मंडळीमध्ये ३०,००० लोक एकत्र जमता तेव्हा सर्व लोकांना कळेल की तुम्ही माझे शिष्य आहात." पण तो असे म्हणाला नाही. त्याने त्याच्या अकरा शिष्यांना सांगितले, "जेव्हा तुम्ही अकराजन एकमेकांवर प्रेम कराल तेव्हा सर्व लोकांना कळेल की तुम्ही माझे शिष्य आहात." लोकांची संख्या महत्त्वाची नाही. एकमेकांवर प्रेम करणे हे खऱ्या स्थानिक मंडळीच्या शिष्यांचे प्राथमिक लक्षण आहे.

येशूने नेहमीच गुणवत्तेवर भर दिला. आजचा ख्रिस्तीधर्म, जसे की मिशन संस्था आणि मोठ्या मंडळी, संख्येवर भर देतात. आपल्या मंडळीमध्ये किती लोक आहेत? तुम्ही किती ठिकाणी पोहचले आहात ? आपले वार्षिक अर्पण किती आहे ? या गोष्टींचा ते आतून अभिमान बाळगतात. किंवा प्रचारक सांगतील की : मी किती देशांमध्ये प्रवास केला आहे? मी किती उपदेश केले आहेत? मी किती पुस्तके लिहिली आहेत? मी किती टीव्हीवरील कार्यक्रमांमध्ये बोलतो ? या अशा गोष्टी आहेत ज्यांचा दैहिक लोक अभिमान बाळगतात.

येशूने नेहमीच गुणवत्तेवर भर दिला: दर्जेदार मीठ आणि दर्जेदार प्रकाश. त्याच्या आयुष्याच्या शेवटी त्याचे फक्त अकरा शिष्य होते. ती मोठी संख्या नाही, परंतु त्यांच्या जीवनाची गुणवत्ता पहा. त्या अकरा शिष्यांनी जगाची उलथापालथ केली . तुम्हाला असे शिष्य कुठे सापडतील, ज्यांनी सर्व काही सोडून दिले आहे, ज्यांना पैशात आणि अशा गोष्टीत रस नाही ? आज जगात असा एकही उपदेशक सापडणे खूप दुर्मिळ आहे.

आणि ही अशी गुणवत्ता आहे ज्यावर येशू जोर देत होता जेव्हा तो म्हणाला, "तुमचे नीतीमत्व परुश्यांच्या नितीमत्वापेक्षा जास्त असले पाहिजे." गुणवत्ता म्हणजे , तुम्ही किती उपक्रमाणंमध्ये भाग घेता हे नाही. त्याचा पैशाशी काहीही संबंध नाही. त्याचा प्रार्थनेशी काहीही संबंध नाही. त्याचा उपवासाशी काहीही संबंध नाही. त्याचा जीवनाच्या गुणवत्तेशी संबंध आहे.

येशू उर्वरित वचनांमध्ये (खरं तर, डोंगरावरील प्रवचनाच्या जवळजवळ शेवटपर्यंत) या एका वचनाचे स्पष्टीकरण देत पुढे जातो. आपण असे म्हणू शकतो की डोंगरावरील प्रवचनाचा बहुतांश भागाचे स्पष्टीकरण मत्तय ५:२० देत आहे. तुम्हाला स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करायचा आहे का? मग तुमची नीतिमत्ता शास्त्री आणि परुशी यांच्या नीतिमत्तेपेक्षा जास्त असली पाहिजे. आपण देवाचा दर्जा कमी करू नये.