लेखक :   झॅक पुननं श्रेणी :   देवाचा ज्ञान
WFTW Body: 

1 योहान 1:7 मध्ये बायबल आपल्याला सांगते की जर आपण प्रकाशात चालत नाही तर आपली देवासोबत सहभागिता होऊ शकत नाहीजर आपण प्रकाशात चालतो तर आपण कोणतीही गोष्ट लपविणार नाही कारण प्रकाश सर्व गोष्टी उघड करितो. जो अंधारात चालतो तो जीवनात काहीतरी लपवितो. जर आपण प्रकाशात चालतो तर आपले जीवन उघड्या पुस्तकासारखे आहे. आपण प्रकाशात चालत असलो तर आपण लोकांना आपल्या खाजगी जीवनाचे परिक्षण करण्याची परवानगी देऊ, आपले बँकेचे खाते त्यांच्यापुढे ठेवू व सर्व गोष्टी उघड करू. आपल्याकडे लपविण्यासारखे काहीही नसणार. ह्याचा अर्थ असा नाही की आपण परिपूर्ण आहो; परंतु ह्याचा अर्थ असा की आपण प्रामाणिक आहोत.

सर्वप्रथम, देव आपल्याकडून प्रामाणिकपणाची अपेक्षा करितो. आपण पूर्णपणे प्रामाणिक असावे अशी त्याची इच्छा आहे. जर आपण प्रामाणिक असलो तर आपल्या इतर सर्व समस्या लवकर सुटतील. देवापुढे व लोकांपुढे आपण प्रामाणिक राहिलो तर आपल्या आत्मिक जीवनाची वाढ होत जाईल.

परंतु तुम्हाला लवकर लक्षात येईल की प्रामाणिक असण्याकरिता याविषयीचे युद्ध लढावे लागते. तुम्ही म्हणाल, ''मी या बोधाकडे गंभीरतेने लक्ष देईन व इथून पुढे प्रामाणिक राहील.'' परंतु, एकाच आठवड्यात तुम्हाला कळेल की तुम्हाला मोह होईल व तुम्ही देवाकडून शाबासकी घेण्याऐवजी लोकांची वाहवा मिळविण्याचा प्रयत्न कराल. हे युद्ध तुम्हाला लढून जिंकायचे आहे.

देवाला फार दुःख वाटते की आज ख्रिस्ती समाजामध्ये अनेक लोकांचा 20,30,40 वर्षांपूर्वी नवीन जन्म झालेला आहे परंतु त्यांची आत्मिक वाढ झालेली नाही. कारण प्रामाणिक राहण्याचे प्राथमिक तत्व त्यांना कळले नाही. जर आपल्या जीवनामध्ये ढोंग असेल किंवा कृत्रीमता असेल तर आपण प्रगती करू शकणार नाही. आपली प्रार्थना ऐकण्यात येणार नाही. ढोंगी असून आपण अहोरात्र प्रार्थना केली तरी उपयोग होणार नाही कारण ते वेळ व्यर्थ घालविण्यासारखे होईल. जोवर आपण आपल्यातील ढोंगीपणा सोडत नाही तोवर आपली प्रार्थना ऐकल्या जाणार नाही.

आपली खरी आत्मिक किंमत देवापुढे आपण कोण आहोत यावर आधारीत आहे. ती इतर कोणत्याही गोष्टींवर आधारीत नाही. आपली आत्मिक पातळी आपल्याठायी असलेल्या बायबलच्या ज्ञानावर आधारीत नाही, आपण किती प्रार्थना करतो त्यावर आधारीत नाही, किती सभेंमध्ये उपस्थित राहतो त्यावर आधारीत नाही किंवा मंडळीतील वडीलजनांचे व पुढार्यां चे आपल्याविषयी काय मत आहे त्यावर आधारीत नाही. त्याउलट स्वतःला असा प्रश्न विचारावा, ''माझ्या जीवनातील प्रत्येक क्षेत्रामध्ये पाहणार्याल देवाला माझ्याविषयी काय वाटते?'' या प्रश्नाचे उत्तर जे मिळेल तेच आपल्या आत्मिकतेचे मोजमाप आहे. या गोष्टीची आपण रोज स्वतःला आठवण करून द्यावी अन्यथा आपण अभिनय करणार्याप नटाप्रमाणे कृत्रीम जीवन जगू. नथनेलाविषयी येशूने जे शब्द उच्चारले ते मला फार आवडतात, ''पाहा, हा खराखुरा इस्त्राएली आहे, ह्याच्या ठायीं कपट नाहीं!'' (योहान 1:47). जर येशू आपल्याविषयी असे बोलला तर आपल्यासाठी हे सर्वात मोठे पारितोषिक ठरेल. नथनेल परिपूर्ण नव्हता. तो उणा होता. परंतु, तो काही विशेष असण्याचा देखावा करीत नव्हता. त्यामुळेच तो हनन्या व सप्पीरापेक्षा वेगळा होता.