लेखक :   झॅक पुननं श्रेणी :   मंदिर
WFTW Body: 

करिंथ येथील मंडळीला पौलाने लिहिले, "तुम्ही ख्रिस्ताचे शरीर असून वैयक्तिकरीत्या त्याचे अवयव आहात."(१ करिंथ १२:२७). पौलाने इफिस येथील ख्रिस्ती लोकांना लिहिलेले पत्र विश्वासणारे ख्रिस्तात एक शरीर आहे या महान सत्याभोवती केंद्रित आहे. ख्रिस्त हा मंडळीचा मस्तक आहे आणि मंडळी ही त्याचे शरीर आहे (इफिस १:२२,२३).प्रत्येक विश्वासणारा या शरीराचा सदस्य असतो. आम्ही इफिस ४:१-२ मध्ये वाचतो "म्हणून जो मी प्रभूमध्ये बंदिवान तो मी तुम्हांला विनवून सांगतो की, तुम्हांला झालेल्या पाचारणास शोभेल असे चाला; पूर्ण नम्रता, सौम्यता व सहनशीलता दाखवून एकमेकांना प्रीतीने वागवून घ्या." देव नम्रता, सौम्यता आणि संयम शोधतो. इफिसकरांस पत्र ४:२ (लिविंग बायबल अनुवाद) म्हणते, " एकमेकांच्या चुका तुमच्या प्रीतीमुळे वागवून घ्या ". कोणत्याही मंडळीमध्ये कोणीही परिपूर्ण नाही. प्रत्येकजण चुका करतो. त्यामुळे मंडळीमध्ये आपल्याला एकमेकांच्या चुका सहन कराव्या लागतील. आम्हाला एकमेकांच्या चुका वागवून घ्याव्या लागतात कारण आम्ही एकमेकांवर प्रीती करतो. "जर तुम्ही चूक केली तर मी ती झाकून घेईन. जर तुम्ही एखादी गोष्ट अपूर्ण सोडली, तर मी ती पूर्ण करीन ". ख्रिस्ताच्या शरीराने असेच कार्य केले पाहिजे. आपण इफिसकरांस पत्र ४:३ मध्ये वाचतो "आत्म्याच्या द्वारे घडून आलेले ऐक्य शांतीच्या बंधनाने राखण्यास झटत जा." ऐक्य हा पौलाच्या अनेक पत्रांमधील एक छान विषय आहे. आणि प्रभूला त्याच्या मंडळीसाठी हेच ओझे आहे.ख्रिस्ताच्या शरीरात प्रत्येक सदस्य प्रथम मस्तकाशी आतून जोडलेला असतो आणि नंतर आतून आणि अविभाज्यपणे इतर सदस्यांशी जोडलेला असतो. जोपर्यंत त्यांची एकता पिता आणि पुत्राच्या एकतेसारखी होत नाही तोपर्यंत या सदस्यांनी एकतेत वाढणे आवश्यक आहे (योहान.१७:२१-२३).

इफिस ४:१६ मध्ये पौल सांगतो की "त्याच्यापासून पुरवठा करणार्‍या प्रत्येक सांध्याच्या योगे, सबंध शरीराची जुळवणूक व जमवाजमव होत असते, आणि प्रत्येक अंग आपापल्या परिमाणाने कार्य करत असता आपली रचना प्रीतीमध्ये होण्यासाठी शरीर आपली वृद्धी करून घेते ". येथील सांधे सहभागितेबद्दल सांगतात. केवळ एका हातामध्ये किती सांधे आहेत याचा विचार करा.खांद्यावर एक सांधा आहे, दुसरा कोपरावर, एक मनगटावर आणि नंतर प्रत्येक बोटात तीन - किमान १७. सांधे आहेत जे आपल्या हाताला मुक्तपणे कार्य करू देतात. जर तुमचा वरचा हात मजबूत असेल आणि खालचा हात मजबूत असेल, पण जर तुमचे कोपर ताठ असेल, तर तुम्ही त्या हाताने काय करू शकता? काहीही नाही. केवळ ताकदच आपला हात उपयुक्त बनवत नाही. सांध्यांचे कार्यदेखील महत्वाचे आहे. आता हे ख्रिस्ताच्या देहाला कसे लागू होते याचा विचार करा. येथे एक चांगला भाऊ आहे, एक मजबूत कोपराच्यावरचा हात आहे. आणि येथे आणखी एक चांगला भाऊ आहे, एक मजबूत कोपराच्याखालचा हात आहे. पण ते एकमेकांशी एकत्र सहभागिता करू शकत नाहीत. आज ख्रिस्ताच्या शरीरातील ही शोकांतिका आहे. मानवी शरीरात याला सांधेदुखी म्हणतात आणि ते खूप वेदनादायक असते. बऱ्याच स्थानिक मंडळ्यामध्ये सांधेदुखी आहे. जेव्हा आपले सांधे योग्य प्रकारे कार्य करतात, तेव्हा कोणताही आवाज होत नाही. परंतु जेव्हा शरीराला सांधेदुखी होते, तेव्हा ते करकर आवाज करते आणि प्रत्येक हालचालीमुळे एक अनारोग्यकारक आवाज निर्माण होतो.ज्याला काही विश्वासणाऱ्या लोकांमध्ये यालाच "सहभागिता" म्हणतात ते अगदी तसेच आहे. ते करकर करते. पण जेव्हा सांधे चांगले कार्य करतात, तेव्हा अजिबात आवाज होत नाही. एकमेकांशी आपली सहभागिता अशी असली पाहिजे. जर तुमची सहभागिता अशी नसेल, तर तुम्हाला सांधेदुखीसाठी काही औषध घेणे आवश्यक आहे: आपल्या "स्वजीवनाला" मरणे. मग तुम्हाला बरे केले जाईल आणि इतरांशी तुमची सहभागिता गौरवशाली असेल. ख्रिस्ताच्या शरीरात देवाची हीच इच्छा आहे.

जुन्या करारामध्ये देवाच्या लोकांना, यहुद्यांना एक शरीर बनणे अशक्य होते. हे तेव्हाच शक्य झाले जेव्हा येशू स्वर्गात चढला आणि मानवांत राहण्यासाठी त्याने पवित्र आत्मा ओतला. आता, दोघे एक होऊ शकतात. जुन्या करारामध्ये इस्राएल ही धार्मिक सभा होती.राष्ट्राचा आकार वाढला, पण तरीही ती धार्मिक सभा होती. नव्या करारात मात्र मंडळी ही एक शरीर असली पाहिजे, धार्मिक सभा नव्हे. जर दोघे एक झाले नाहीत, तर तुमच्याकडे फक्त एक धार्मिक सभा आहे. ख्रिस्ताच्या शरीरातील महत्त्वाची गोष्ट आकार नसून ऐक्य हे आहे. आणि या मानकानुसार धार्मिक सभा नसलेली 'मंडळी' शोधणे कठीण होते. प्रत्येक ठिकाणी आकाराने वाढणारी - परंतु ऐक्य नसलेल्या धार्मिक सभा सापडतात.पुढारीपणाच्या स्तरावरही कलह, मत्सर आणि स्पर्धा आढळते. ख्रिस्ताच्या शरीराची अभिव्यक्ती जगभरात वेगवेगळ्या ठिकाणी असावी ही देवाची इच्छा आहे.

ख्रिस्ताच्या शरीरात प्रत्येक व्यक्तीचे महत्व असते, मग तिच्याकडे आध्यात्मिक दान नसले तरी. तो शरीराचा सदस्य असल्यामुळे त्याची किंमत आहे. किंबहुना, ज्या सदस्याकडे आध्यात्मिक दानाचा अभाव आहे त्याला देव अधिक सन्मान देतो जेणेकरून शरीरात ऐक्य निर्माण होईल (१ करिंथ १२:२४,२५). मंडळीमध्ये आपल्याला देवाचे उदाहरण पाळावे लागेल आणि ज्यांना कोणतेही आध्यात्मिक दान नाही, जर ते देवभीरु आणि नम्र असतील तर त्यांचाही सन्मान करावा लागेल. बाबेलमध्ये प्रतिभावान धर्मोपदेशक, प्रतिभावान गायक आणि धर्मांतरित अंतराळवीर यांचा सन्मान केला जातो. पण मंडळीमध्ये (देवाचा तंबू) परमेश्वराचे भय बाळगणाऱ्यांचा आपण सन्मान करतो (स्तोत्र १५:१,४). बाबेल आणि यरुशलेम यांच्यात फरक आहे. आज देव आपल्याला बाबेलमधून बाहेर येऊन यरुशलेम बांधा असे म्हणतो (प्रकटीकरण १८:४).

जर आपण ख्रिस्ताचे शरीर पाहिले तर मत्सराला अजिबात जागा उरणार नाही. मानवी शरीरात पायाला फक्त एक पाय असण्यात काहीच अडचण नसते. त्याला कधीही पायाव्यतिरिक्त दुसरे काही बनण्याची इच्छा नसते आणि तो हात बनण्याचे स्वप्नही पाहत नाही. पाय असण्यात तो पुरेसा समाधानी असतो . देवाने त्याला पाय बनवण्यात कोणतीही चूक केलेली नाही हे त्याला ठाऊक असते. त्याला पाय असल्याचा आनंद होतो; हात काय साध्य करू शकतो हे पाहूनही तो तितकाच आनंदित होतो , जरी हे लक्षात आले की तो असे काहीही साध्य करू शकत नाही. तसेच ख्रिस्ताचे शरीर "पाहिले" असलेल्या सर्वांच्या बाबतीतही असेल.जेव्हा तुम्हाला दुसऱ्याचा हेवा वाटतो, जेव्हा दुसऱ्या सदस्याचा देवासाठी खूप वापर होताना पाहून तुम्ही मनापासून आनंद घेऊ शकत नाही, तेव्हा हे सत्य तुम्हांला मुळीच समजलेले नाही हे उघड आहे. जो कोणी सदस्य मस्तकाशी जवळीक साधतो तो, जेव्हा शरीराच्या दुसऱ्या सदस्याचा सन्मान केला जाईल तेव्हा आनंदित होईल (१ करिंथ १२:२६).

१ शमुवेल १८:१-८ मध्ये आपण योनाथनाने दाविदाबरोबर करार केला होता याबद्दल वाचतो. ख्रिस्ताच्या शरीरात कराराचे नाते कसे असावे याचे हे एक सुंदर चित्र आहे. तिथे असे म्हटले आहे की योनाथनाचा आत्मा दाविदाच्या आत्म्याशी जोडला गेला होता. ख्रिस्ताच्या शरीरातही हे आमचे पाचारण आहे - एक म्हणून एकत्र येणे, की आपल्यात कोणतेही अंतर नाही (गैरसमज, मत्सर, संशय इत्यादींचे अंतर नाही) ज्याद्वारे शत्रू येऊ शकतो आणि फूट पाडू शकतो. सतत स्वत:ला मारल्याशिवाय अशा करारामध्ये प्रवेश करणे अशक्य आहे.

ख्रिस्ताच्या शरीरात देवाने नियुक्त केलेली विविधता आहे. ख्रिस्ताचे संतुलित चित्र जगासमोर मांडण्यासाठी देव आपल्या वेगवेगळ्या स्वभावांचा आणि दानांचा वापर करतो. ख्रिस्ताच्या शरीरात तुमची एक वेगळी आणि अद्वितीय सेवा आहे जी इतर कोणीही पूर्ण करू शकत नाही. आणि ती सेवा कधीही संतुलित नसेल. ती असंतुलित होईल. शरीरात वेगवेगळी सेवा असलेल्या इतरांसोबत सहभागितेमध्ये काम करून आपल्याला आपला समतोल शोधावा लागेल. देव आपल्याला नम्र ठेवतो - आपल्याला इतरांवर अवलंबून ठेवून. परमेश्वराची स्तुती असो!

येशू आपल्या उत्पन्नाच्या केवळ १०% उत्पन्न पित्याला द्यायला आला नाही. तो एक नवीन करार स्थापन करण्यासाठी आणि नवीन कराराची मंडळी तयार करण्यासाठी आला. आणि म्हणून त्याने आपल्या वडिलांना १००% दिले. आणि आता तो आम्हाला म्हणतो, "माझे अनुसरण करा". ख्रिस्ताचे शरीर तयार करण्याची तयारी असली पाहिजे, मग ती किंमत आपल्या पैशांची असो, आपला सन्मान असो, आपली सोय असो, आपली शारीरिक ऊर्जा असो, आपली प्रतिष्ठा असो, आपली नोकरी असो किंवा इतर काही असो. परमेश्वरासाठी आपण जे अर्पण करण्यास तयार आहोत त्याला कोणतीही मर्यादा नसावी. आपण कोणत्याही गोष्टीत आपली स्वतःची सोय किंवा स्वतःचा दिलासा शोधू नये. आपण जे काही करतो त्याचा संबंध ख्रिस्ताच्या शरीराच्या उभारणीशी असला पाहिजे. आपला पृथ्वीवरील व्यवसायदेखील केवळ आपले उदरर्निर्वाहाचे साधन असले पाहिजे जेणेकरून आपल्या आर्थिक मदतीसाठी मंडळीमधील इतरांसाठी आपण ओझे बनू नये.