WFTW Body: 

जुन्या करारात, नियमशास्त्रात म्हटले आहे , "डोळ्याबद्दल डोळा आणि दाताबद्दल दात." हा नियम देवाने निर्गम २१, लेवीय २४ आणि अनुवाद १९ मध्ये सुद्धा दिला आहे . देव तिथे जे म्हणत होता त्याचा अर्थ असा नाही की जर कोणी तुमचा डोळा काढला तर तुम्ही त्याचा डोळा काढावा. तो जे म्हणत होता ते असे होते की, जर त्याने तुमचा एकच डोळा काढला तर त्याचे दोन्ही डोळे काढू नका. मुद्दा असा आहे की तुम्ही तुमच्या अपरध्याला क्षमा करू शकता आणि त्याला सोडून देऊ शकता आणि त्याचा एकही डोळा काढू नका . तोच सर्वोत्तम मार्ग असेल. देव "डोळ्याबद्दल डोळा आणि दाताबद्दल दात" असे म्हणत शिक्षा मर्यादित करत होता.

पण येशूने हा नियम अधिक उंचावला आणि म्हटले, “ दुष्टाला अडवू नका ; जो कोणी तुझ्या उजव्या गालावर मारितो, त्याच्याकडे दुसरा गाल कर. जो तुझ्यावर फिर्याद करून तुझी बंडी घेऊ पाहतो त्याला तुझा अंगरखाहि दे. जो कोणी तुला वेठीस धरून एक कोस नेईल, त्याच्याबरोबर दोन कोस जा” (मत्तय ५:३९-४१). रोमन सैनिक कधीकधी त्यांचे गुलाम असलेल्या यहुदी लोकांना त्यांचे सामान आणि लष्करी उपकरणे घेऊन मैलोण मैल चालण्यास भाग पाडत असत. यहुदी गुलाम होते म्हणून त्यांना ते करावेच लागत असे. येशू आपल्याला सांगतो की अशा परिस्थितीत आपण त्या व्यक्तीबरोबर दोन मैल चालावे, त्याबद्दल त्याच्याशी भांडू नये, तुमच्याकडून मागणाऱ्याला द्यावे आणि तुमच्याकडून उसने घेऊ इच्छिणाऱ्याला नकार देऊ नये.

आपण हे शब्द ज्या आत्मिक भावनेने बोलले जातात त्या आत्मिक भावनेने घेतले पाहिजे. येशूणे जे म्हंटले आहे त्याचा नेमका अर्थ काय आहे हे आपल्याला पाहण्याची आवश्यकता आहे. तो आपल्याला दाराजवळ असलेल्या पायपुसण्यासारखे राहण्यास सांगत होता का? लोकांना जे काही हवे ते आपण त्यांना करू द्यायला हवे का ? ते होऊ शकत नाही. जेव्हा जेव्हा तुम्हाला शास्त्र नीट समजत नाही, तेव्हा स्वतः येशू ख्रिस्ताचे उदाहरण पहा - कारण तो शब्दाने बनलेला देह आहे. जुन्या करारात, नियमशास्त्रातील प्रत्येक शब्द आणि कथेचे स्पष्टीकरण देण्यासाठी शास्त्री होते. नवीन करारात, आपण जेवढे येशूकडे पाहतो तेवढे वचनांचे विश्लेषण करण्याची आता येवढी आवश्यकता नाही, कारण आपल्याकडे आता त्याचे उदाहरण आहे.

" जो कोणी तुझ्या उजव्या गालावर मारितो, त्याच्याकडे दुसरा गाल कर " येथे येशूचे काय म्हणणे होते ? आपण पाहतो की येशू स्वतः, जेव्हा वधस्तंभावर चढवण्यापूर्वी मुख्य याजकांसमोर उभा होता तेव्हा त्याला गालावर मारण्यात आले तेव्हा त्याने दुसरा गाल वळवला नाही. तो योहान १८:२३ मध्ये म्हणाला, "जर मी योग्य रीतीने बोललो असलो तर मला का मारतोस ?" त्यांनी त्याला प्रतिसाद दिला नाही (कदाचित त्यांनी त्याला पुन्हा मारले आणि त्याने प्रतिकार केला नाही). जेव्हा त्यांनी त्याला चपराक मारली, तेव्हा त्यांनी त्याच्या दुसऱ्या गालावर मारण्यासाठी त्याने त्याचा दूसरा गाल त्यांच्या समोर केला नाही.. म्हणून, ख्रिस्त जे म्हणत आहे त्याचा आत्मा समजून घेण्यासाठी आपण काळजी घेतली पाहिजे, अन्यथा आपल्याला येशूवर त्याने जे उपदेश केला ते आचरणात न आणल्याचा आरोप त्याच्यावर करावा लागेल.

येथे तत्व असे आहे: मला सूड घ्यायचा नाही; माझ्यासोबत जे काही झाले त्याबद्दल मी कोणावरही उलट आरोप करू इच्छित नाही. जर कोणी मला सैतान म्हटले तर मी त्या व्यक्तीला सैतान म्हणणार नाही. जर मला कोणी चपराक मारली गेली तर मीही मारणार नाही. मी शांत राहून देवावर विश्वास ठेवेन की तो इतरांना माझा गैरफायदा घेण्यापासून माझे रक्षण करेल .

तो जेव्हा म्हणतो की, जो तुझ्यावर फिर्याद करून तुझी बंडी घेऊ पाहतो त्याला तुझा अंगरखाहि दे, याचा अर्थ काय ? उदाहरणार्थ, जर कोणी अन्यायाने खोटे बोलले आणि तुमची स्वतःची मालमत्ता ही त्याची मालमत्ता आहे असे म्हणून तुमच्यावर खटला दाखल केला - कदाचित त्याने न्यायालयात काही खोटे कागदपत्रे सादर केली असतील आणि तुमचे घर तुमच्याकडून हिसकावून घेऊ इच्छित असेल तर तुम्ही काय करावे ? तुम्ही त्याला तुमचे घर घेऊ द्यावे आणि तुमचे अजून दुसरे घर देखील घेण्यास संमती द्यावी का? असा त्याचा अर्थ आहे का?

येशूच्या म्हणण्याचा असा अजिबात अर्थ नव्हता. पुन्हा, आपल्याला त्याचा आत्मा समजून घेण्याची आवश्यकता आहे. जो कोणी तुला वेठीस धरून एक कोस नेईल, त्याच्याबरोबर दोन कोस जा”. दुसऱ्या शब्दांत, जर कोणी तुम्हाला काहीतरी करण्यास भाग पाडले तर अधिक करा. तुम्हाला त्याचा आत्मा समजला पाहिजे. येशू आपल्याला अशीही सूचना देतो की तुमच्याकडून उसने घेऊ इच्छिणाऱ्याला नकार देऊ नये. तो असे म्हणतो का की तुमच्याकडून उसने घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तुम्ही पैसे द्यावे ? भारतात, जर तुम्ही एखाद्याला एकदा पैसे दिले आणि तुम्ही कोणालाही मुक्तपणे पैसे देत असणारी व्यक्ती म्हणून प्रसिद्ध झालात, तर तुम्ही काही क्षणातच दिवाळखोर व्हाल!

जर तुम्हाला या शब्दांचा अर्थ समजला नाही आणि जर तुम्ही ते आंधळेपणाने शब्दशः घेतले तर तुम्ही खूप अडचणीत सापडाल. येशू आपल्याला पापाबद्दल मूलगामी दृष्टिकोन ठेवण्यास शिकवत आहे, जसे त्याने आपल्याला आंधळ्यासारखे किंवा हात नसलेल्या माणसासारखे राहण्यास सांगितले होते. याच भावनेत आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी समजून घेणे आवश्यक आहे: सूड घेण्याचा प्रयत्न करू नका, तुमचा गैरफायदा घेऊ देण्यास तयार रहा आणि स्वतःसाठी मरण्यास देखील तयार रहा; परंतु याचा अर्थ असा नाही की मला कोणतेही अधिकार नाहीत.

बस ड्रायव्हर म्हणून काम करणाऱ्या एका भावाने एकदा चर्चच्या सभेत साक्ष दिली की रात्री प्रवास करत असताना तो रस्त्यावरून जात असताना, रात्री कधीकधी त्याला त्याच्या विरुद्ध दिशेने येणाऱ्या कारचे हेडलाइट्स सुरू असल्यामुळे त्याला डोळ्याला त्रास होत असे . दुसऱ्या दिशेने दुसरी कार येत असेल तर त्यांनी त्यांच्या गाडीचे हेडलाइट्स कमी केले पाहिजे , परंतु या लोकांनी तसे केले नाही. त्यांच्या हेडलाइट्समुळे त्याला समोरचे पाहायला त्रास होत असल्याने, त्याला असे वाटले की दुसऱ्या ड्रायव्हरला धडा शिकवण्यासाठी त्याच्या बसच्या हेडलाइट्सनाही त्याने जास्त चमकवावे , त्याला अचानक लक्षात आले की तो ख्रिस्ती आहे आणि त्याने सूड घेऊ नये आणि त्याने ते न करण्याचा निर्णय घेतला. त्या भावाला सूड घेण्याचा अर्थ काय आहे हे समजले: ज्या पद्धतीने त्याने त्याला दुखावले त्याच प्रकारे दुसऱ्या व्यक्तीला दुखावणे!

जर मला येशूने शिकवलेले तत्व समजले, तर रस्त्यावरून गाडी चालवतानाही जर कोणी त्याच्या गाडीचे हेडलाइट्स माझ्या डोळ्यांत चमकू देत असेल तेव्हा मला त्या तत्वाचा वापर कसा होतो हे कळेल. ही परिस्थिती शास्त्रात कुठेही लिहिलेली नसेल, पण मी तत्त्वे समजून घेईन आणी आणि माझा वेळ, माझा पैसा आणि माझी शक्ती प्रामुख्याने प्रभूची आहे हे ओळखून मी हार मानण्यास तयार असेन. मी माणसांचा गुलाम नाही आणि मी कुणालाही मला त्यांचा गुलाम करण्यासाठी मला स्वतःला कमी करू देणार नाही. मी प्रामुख्याने प्रभूचा गुलाम आहे आणि मी माणसांचा गुलाम होणार नाही.

म्हणून जर मी हे लक्षात ठेवले तर मला ही तत्त्वे समजतील : मी कधीही सूड घेऊ इच्छित नाही, मी कधीही त्या व्यक्तीशी तो माझ्याशी जसा वागतो तसा वागू इच्छित नाही आणि तो ज्या पद्धतीने माझ्याशी बोलला त्याच पद्धतीने मी त्याला उलट उत्तर देऊ इच्छित नाही. मला हार मानायची आहे, मला दयाळू व्हायचे आहे आणि मला माझे हक्क सोडायचे आहेत.