WFTW Body: 

2 राजे अध्याय 2 मध्ये जेव्हा एलीयाने अलीशाची परीक्षा पाहिली तेव्हा आपण अलीशाची चिकाटी बघतो. जेव्हा एलीयाला वर उचलण्याची वेळ जवळ आली होती तेव्हा अलीशा गिलगाल येथे त्याच्यासोबत गेला होता. एलीयाने अलीशाला गिलगाल येथे थांबण्यास सांगितले, कारण तो बेथेलला जाणार होता. अलीशा म्हणाला, 'ाही, मी तुमच्यासोबत येत आहे.' बेथेल याठिकाणी देखील एलीया पुन्हा अलीशाला म्हणाला की त्याने तेथेच थांबावे, कारण तो यरीहोला जात होता. अलीशाने परत उत्तर दिले, 'ाही, मी तुमच्यासोबतच जाणार.' यरीहो येथे देखील तेच दृश्य बघायला मिळते. एलीया नंतर यार्देनला गेला. जेव्हा ते यार्देन नदीजवळ आले तेव्हा एलीयाने पाण्यावर आपल्या झग्याची वळकटी करून मारली, तेव्हा पाणी दुभंग झाले व ते कोरड्या भूमीवरून पलीकडे गेले. तेव्हा एलीयाने अलीशाला म्हटले, ''तू माझ्यामागे का येत आहेस? तुला काय पाहिजे?''

तुमच्याविषयी काय? तुम्हाला काय हवे आहे? तुम्हाला चांगली मिळकत हवी आहे काय? की कार हवी आहे की नवीन घर हवे आहे? अलीशा म्हणाला, ''आपल्या ठायी असलेल्या आत्म्याचा दुप्पट वाटा माझ्या ठायी यावा.'' त्याला या जगातील कोणतीही गोष्ट नको होती. एलीयावर आत्म्याचा जो अभिषेक होता तोच आत्म्याचा अभिषेक अलीशाला हवा होता. म्हणूनच तो एलीयाच्या मागे गेला.

आपल्याला सेवा देण्यापूर्वी देव आपली सुद्धा पारख करेल. तो आपल्याला विशेष अनुभव देईल - गिलगालजवळ आणेल आणि पाहील की आपण त्यामध्ये समाधानी झालोत का? काही ख्रिस्ती लोक संतुष्ट दिसतील, परंतु इतर म्हणतील, 'ाही, प्रभु, मी संतुष्ट झालो नाही.'' देव अशा लोकांना पुढे घेऊन जाईल व त्यांना अधिक खोलीतला अनुभव देईल - बेथेलचा. तो तुम्हाला दर्शन देईल. काही त्यातच समाधान मानतील; परंतु, इतर म्हणतील, 'ाही, प्रभु, मला तुझ्यापासून अधिक हवे आहे.'' होऊ शकते की तो तुमच्याकरवी चमत्कार घडवून आणेल. याद्वारे काही लोक समाधानी होतील. तर काही म्हणतील, '्य्रभो, जो आत्मा तुझ्यावर आला आहे तो आत्मा माझ्यावर देखील येऊ दे म्हणजे मी तुझ्यासारखा परिवर्तित होईल. त्यापेक्षा कमी जर मला काही मिळेल तर मी त्यात समाधानी राहणार नाही.'' तुम्ही अशी इच्छा बाळगता का? जर असे आहे तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की देव तुम्हाला निराश करणार नाही.

मी असे अनेक ख्रिस्ती लोक बघितले ज्यांनी देवाच्या उत्तम गेाष्टींपेक्षा स्वतःच्या सर्वसामान्य गोष्टीतच समाधान मानून घेतले. त्यांनी 25 टक्के, 50 टक्के किंवा 75 टक्क्यातच समाधान मानून घेतले. अलीशासारखे व्हा ज्याने त्याच्या पीढीमध्ये देवाच्या उत्तम गोष्टींसाठी हट्ट धरिला. त्याच्या हट्टामुळे अभिषेकाचा दुप्पट वाटा त्याला मिळाला. एलीयाने केलेल्या चमत्कारापेक्षाही दुप्पटीने त्याच्याद्वारे देवाने चमत्कार केले.

आज तुम्ही अनेक वक्त्यांकडे जाऊन असे म्हणा, 'ट्टला पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा हवा आहे.'' ते म्हणतील, ''ओह, ते सोपे आहे. मी तुमच्या डोक्यावर हात ठेवतो.'' तो तुमच्याकरिता प्रार्थना करेल व तुम्हाला त्याच्या मागे काही तर म्हणायला लावेल व नंतर तुम्हाला म्हणेल, ''तुमचा बाप्तिस्मा झाला.'' परंतु एलीया काय म्हणाला? तो अलीशाला म्हणाला, ''तुला माझ्या ठायी असलेल्या आत्म्याचा दुप्पट वाटा हवा आहे काय? ते एवढे सोपे नाही.तू फार दुर्घट गोष्ट मागितली आहे. परंतु मला तुजपासून घेऊन जातील त्या समयी मी तुला दिसलो तर तू मागतोस ते तुला प्राप्त होईल.'' एलीयाने ही समस्या देवाच्या हातात सोपविली. एलीया याठिकाणी ख्रिस्ताचे प्रतिनिधीत्व करतो आहे. आणि याठिकाणी जणू प्रभु आपल्याला म्हणत आहे, ''जर तू मला स्वर्गात पित्याच्या उजवीकडे बसलेला पाहशील ज्याने तुझ्याकरिता सर्वांना जिंकले व माझ्यावर विश्वास ठेवशील तर तुला अभिषेक प्राप्त होईल.''

अभिषेकाचा दुप्पट वाटा मिळणे कठीण गोष्ट आहे; परंतु जर मनुष्याकडे न बघता केवळ देवाकडे बघशील तर ते तुला प्राप्त होईल, असे तुला देव सांगत आहे. आज देखील येशूच पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा देतो, अन्य कोणीही मनुष्य नाही. बाप्तिस्मा करणारा योहान देखील म्हणाला, 'ट्टी तुम्हाला केवळ पाण्याने बाप्तिस्मा देतो परंतु तो तुम्हाला पवित्र आत्म्याने व अग्नीने बाप्तिस्मा देईल. कोणीही मनुष्य तुम्हाला पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा देऊ शकणार नाही. केवळ येशू ख्रिस्त बाप्तिस्मा करणारा आहे. तर मग तुम्ही थेट त्याच्याकडे जा.

जेव्हा एलीया व अलीशा बोलत होते तेव्हा एकाएकी अग्नीरथ व अग्नीवारू दृष्टीस पडले व एलीयाला वर उचलल्या गेले. अलीशाने हे बघितले, खाली पडलेला एलीयाचा झगा त्याने उचलला व त्याला त्याच्या आत्म्याच्या दुप्पट अभिषेक प्राप्त झाला. त्याठिकाणी अलीशाच्या दुप्पट अभिषेकाचा तात्काळ पुरावा होता. जेव्हा तो यार्देन नदीकाठी आला तेव्हा त्याने तो झगा पाण्यावर मारला व कोरड्या भूमीवरून तो चालत गेला. अभिषेक आपल्या जीवनात प्रकट होईल. आपल्याला ओरडून किंवा किंचाळून किंवा इतरांना आपले अनुभव सांगण्याची गरज नाही. आपले जीवन व आपली सेवा हे स्वतःच आपल्याद्वारे बोलतील. जे लोक आपली टीेका करतील त्यांच्याशी देखील बोलतील.