WFTW Body: 

आपल्या काळात पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा घेणे (बुडवणे) याचे महत्व कमी होण्याकडे आपण गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. आज आपल्याकडे ख्रिस्ती जगतात दोन टोके आहेत : पहिले ते जे आत्म्यात बाप्तिस्मा पूर्णपणे नाकारतात आणि ते जे कमी दर्जाच्या, भावनिक बनावटीत गौरव मानतात (ज्यामुळे त्यांना सेवेसाठी सामर्थ्य मिळाले नाही किंवा जीवनात पवित्रताही मिळाली नाही). आपण या दोन्ही टोकांपासून दूर राहिले पाहिजे आणि सामर्थ्याने खऱ्या अर्थाने देवाचा शोध घेतला पाहिजे जेणेकरून आपण जगू आणि आपल्याला जे करायला पाहिजे तशी सेवा करू शकू.

आपण स्वत: पेक्षा उंच झालेल्या मंडळीचे नेतृत्व करू शकत नाही. जर आपल्याला स्वत:ला केवळ बनावट अनुभव आला असेल, तर आपण इतरांनाही केवळ बनावट अनुभवांकडे नेऊ. आपण खऱ्या अर्थाने पवित्र आत्म्यात बुडून गेले पाहिजे. पण तेवढे पुरेसे नाही. जर आपल्याला परमेश्वरासाठी परिणामकारक बनायचे असेल, तर आपण आत्म्याच्या परिपूर्णतेत सतत जगले पाहिजे. आपण नेहमी " आत्म्याने भरलेले" असले पाहिजे (इफिस ५:१८ - शब्दशः)

आपल्या मंडळी मध्ये जर आपल्याला परिणामकारक सेवाकार्य करायचे असेल, तर मग आपल्या मंडळीमधील बंधुभगिनींच्या आध्यात्मिक प्रगतीची आपल्याला मनापासून काळजी असली पाहिजे. यामुळे आपल्याला संदेशाच्या दानासाठी देवाचा शोध घेण्यास प्रवृत्त केले जाईल, जेणेकरून आपण आपल्या सहविश्वासू बांधवांची प्रभावीपणे सेवा करू शकू. आत्म्याच्या या दानाशिवाय वचनाच्या सेवेत देवाची प्रभावीपणे सेवा करणे अशक्य आहे. म्हणून आपण आपल्या सर्व अंतःकरणाने त्याचा शोध घेतला पाहिजे. येशूने दिलेल्या दाखल्यात, मध्यरात्री आपल्या शेजाऱ्याच्या घरी आपल्या मित्रासाठी अन्न मिळवण्याकरता गेलेल्या मनुष्याविषयी सांगितले आहे जे ; आपल्या मंडळीमधील गरजू लोकांप्रती काळजी बाळगण्यास आपल्याला शिकवते. यामुळे आपण देवाचे दार ठोठावू आणि त्याचा शोध घेऊ, जोपर्यंत तो पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याची आपल्याला जितकी गरज आहे तितके आपल्याला देईल" तोपर्यंत (लूक ११:८ हे वचन लूक ११:१३ बरोबर पडताळून पाहा.).मी तुम्हांला सांगतो, तो त्याचा मित्र आहे ह्यामुळे जरी तो उठून त्याला देणार नाही तरी त्याच्या आग्रहामुळे त्याला पाहिजे तितक्या भाकरी तो उठून त्याला देईल.

नव्या करारात संदेश देणे म्हणजे पवित्र आत्म्याच्या अभिषेकाखाली देवाचे वचन सांगणे म्हणजे मंडळीला उपदेश करणे, उत्तेजन देणे आणि उभारणी करणे (१ करिंथ.१४:४, २४, २५). १ करिंथ १४ मध्ये पौल स्थानिक मंडळीच्या सभांमध्ये संदेश देण्याच्या महत्त्वावर भर देतो. अशा प्रकारच्या अभिषिक्त संदेशशिवाय जर मंडळीची उभारणी करता आली असती, तर देवाने हे दान विनाकारण मंडळीला दिले असे म्हणावे लागेल. मग , "संदेश देण्याची मनापासून इच्छा" असा बोध करणे हा एक अनावश्यक बोध असेल (१ करिंथ १४:१, ३९). पण वस्तुस्थिती अशी आहे की, हे दान मंडळीच्या उभारणीसाठी आवश्यक आहे. ज्या मंडळीमध्ये आत्म्यात संदेश देणारा एकही बंधू नाही, अशा मंडळीचा लवकरच आध्यात्मिक मृत्यू होईल.

आत्म्याच्या अभिषेकाकडे दुर्लक्ष करणे म्हणजे पेन्टेकॉस्टच्या दिवशी आत्म्याचे येणे अनावश्यक होते आणि आपण परमेश्वराच्या कार्याला त्याच्या सामर्थ्याशिवाय आपण समर्थ आहोत असे म्हणण्यासारखेच आहे! प्रभू येशूचे पृथ्वीवर येणे अनावश्यक होते आणि त्याच्याशिवाय आपण देवाच्या राज्यात प्रवेश करू शकतो, असे म्हणण्याइतकीच ही एक गंभीर चूक आहे! त्रैक्यातील तिसऱ्या व्यक्तीच्या आगमनाकडे दुर्लक्ष करणे म्हणजे पवित्र आत्म्याला कमी लेखणे हे त्रैक्याच्या दुसऱ्या व्यक्तीच्या येण्याकडे दुर्लक्ष करण्याइतकेच गंभीर पाप आहे.

फक्त काही विश्वासणाऱ्या बांधवांनी त्याचा गैरवापर केला आहे म्हणून आत्म्याच्या अभिषेकाचे आपण अवमूल्यन करू नये . जर तुमच्यात आत्म्याचे सामर्थ्य नसेल, तर परमेश्वराचे कार्य करण्यासाठी तुम्ही स्वत:च्या मानवी प्रतिभेवर आणि अनुभवावर विसंबून राहाल. आणि त्यामुळे देवाचे उद्देश कधीच पूर्ण होणार नाहीत.

आपण एकीकडे परूशीवाद आणि नियमाशास्त्राधीन असणे आणि दुसरीकडे तडजोड आणि ऐहिकतेपासून लोकांना मुक्त केले पाहिजे. अशा सेवाकार्यासाठी कोण पुरेसे आहे? केवळ तोच जो पवित्र आत्म्याने सक्षम आहे. म्हणूनच आपण पवित्र आत्म्याने मिळणाऱ्या शहाणपणासाठी आणि त्याच्या सामर्थ्यासाठी देवाचा सतत शोध घेतला पाहिजे. इफिस येथे पौल ख्रिस्ती लोकांसाठी प्रार्थना करतो तेव्हा तो प्रार्थना करतो की त्यांना पवित्र आत्म्याचे शहाणपण आणि त्याचे सामर्थ्य या दोन्ही गोष्टी कळाव्यात (इफिस.१:१७; ३:१६). याच गोष्टींसाठी आपण प्रार्थना करण्याची गरज आहे.