लेखक :   झॅक पुननं श्रेणी :   मंदिर नेता
WFTW Body: 

1 योहान 2:6 मध्ये म्हटले आहे, 'ट्टी त्याच्या ठायीं राहतों, असें म्हणणार्यानें तो जसा चालला तसें स्वतःही चाललें पाहिजे.'' येशूकसा चालला?तो कधीकधी विजयीझाला कीअधिकवेळा विजयीझाला कीसर्ववेळेसतो विजयीझाला? उत्तरआपल्याला माहीत आहे. आपल्यासारखीच त्याची पण प्रत्येक क्षणाला परीक्षा झाली, परंतु त्याने कधीही पाप केले नाही.

''कारण आपल्यासवर्ांच्या दुर्बलतेविषयींज्याला सहानुभूतिवाटत नाहीं,असा आपलाप्रमुख याजकनाहीं, तरतो सर्वप्रकारें आपल्याप्रमाणें पारखलेला होता; तरी निष्पाप राहिला'' (इब्री 4:15).

आता आपल्याला सांगण्यातआले आहे की तोजसा चालला तसे आपणही चालले पाहिजे.या पृथ्वीवर हे शक्य आहे का? जे आपल्याला करणे शक्य होणार नाही हे देवाला ठाऊक असताना देखील देव आपल्याला असे करण्यास सांगेल का? नाही. हे कल्पनेबाहेरचे आहे. कारण जगिक पिताही आपल्या लेकरांकडून अशक्य गोष्टींची मागणी करीत नाही. मग देव का करेल?

मत्तय 13:58 मध्ये काही दुःखदायक शब्द लिहिले आहे, ''तेथें त्यांच्या अविश्वासामुळें त्यानें फारशीं अद्भुत कृत्यें केली नाहींत.''

ह्याच्याशी साम्य असलेल वचन मार्क 6:5 मध्ये आढळते, ''ह्याशिवाय दुसरें कोणतेंहि महत्कृत्ये त्याला तेथें करतां आलें नाहीं.''

तो त्याच्या गावातील लोकांकरिता मोठ्या गोष्टी करू इच्छित होता. त्यांच्या अविश्वासामुळे त्याला तेथे काही करता आले नाही. अविश्वासामुळे सर्वसामर्थी देवाचे हात बांधल्या जातात त्यामुळे तो ज्या गोष्टीआपणाकरिता करू इच्छितो त्या गोष्टी त्याला करता येत नाहीत. मलाआश्चर्यवाटतेकी देवाकडेचमत्कार आहेतव तोआपल्याकरिता चमत्कारकरू इच्छितोपरंतुकेवळआपल्या अविश्वासामुळे तो चमत्कार करीत नाही. ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर आपल्यापैकी काही लोक असे शब्द ऐकतील, ''केवळ तुझ्या अविश्वासामुळे तुझ्याकरिता व तुझ्याद्वारे मला जे करावेसे वाटत होते ते मी करू शकलो नाही.'' जगातील आपल्या जीवनाच्या शेवटी जर आपल्याला हे आढळून आले तर आपल्या अंतःकरणात आपल्याला किती खेद वाटेल! म्हणून यावर आताच विचार करणे चांगले आहे.

पापावर मात करून विजयी जीवनात प्रवेश करताना देखील हेच तत्व लागू होते. आपण उपास व प्रार्थना करू शकतो परंतु आपली तहान तोपर्यंत भागणार नाही जोपर्यंत आपला असा विश्वास असणार नाही की देवाची इच्छा आपल्याला अशा विजयी जीवनात नेऊ शकते.

सैतानाला माहीत आहे की विश्वास असण्याशिवाय तुम्हाला देवाकडून काहीच मिळू शकत नाही. तर मग तुम्ही कल्पना करू शकता की तो तुमचे हृदय अविश्वासाने भरण्याचा आटोकाट प्रयत्न करेल. खोटे बोलणे किंवा व्यभिचारापेक्षाही अविश्वास घातक आहे. या गोष्टी नंतर समजून येतात की त्या पाप आहेत परंतु अविश्वास पाप आहे हे समजून येत नाही.

इब्री 3:12 म्हणते, ''बंधुजनहो, जिवंत देवाला सोडून देण्याइतकें अविश्वासाचें दुष्ट मन तुम्हातील कोणाचेंहि असूं नये म्हणून जपा.''

अविश्वासाचे दुष्ट मन देवापासून दूर जाण्याचे कारण ठरू शकते. इतर सर्व पापांचे मूळ कारण अविश्वास आहे.

रोम 6:14 मध्ये म्हटले आहे, ''तुम्ही नियमशास्त्राधीन नाहीं, तर कृपेच्या अधीन आहां, म्हणून पाप तुमच्यावर सत्ता चालविणार नाहीं.''

याठिकाणी पवित्र आत्मा अगदी सरळपणे सांगतो की जर आपण कृपेच्या अधीन आहोत तर पाप आपल्यावर सत्ता चालविणार नाही. हे इतके सरळ सरळ लिहिले आहे की लहान लेकरालाही ह्याचा अर्थ कळेल.तरी देखील पापावर मात करून जीवन जगण्याच्या शक्यतेवर अनेक विश्वासणारे विश्वास ठेवीत नाहीत.

देवाची इच्छा आहे की तुम्ही विजयी जीवन जगावे. मग तुमचे विचार-जीवन कितीही वाईट असो किंवा रागाने तुम्हाला कितीही काळ पराभूत केलेले असो. प्रभुतुम्हाला पूर्णपणे मुक्त करून तुम्हाला शुद्ध हृदय देऊ शकतो. परंतुजोपर्यंत तुम्ही विश्वास ठेवीत नाही तोपर्यंत तो असे करू शकत नाही.

बायबल सांगते की आपण अंतःकरणात जो विश्वास ठेवला आहे तो आपण आपल्या मुखाने कबूल करावा.

रोम 10:10 मध्ये म्हटले आहे, ''कारण जो अंतःकरणानें विश्वास ठेवितो तो नीतिमान् ठरतो व जो मुखानें कबूल करितो त्याचें तारण होते.''

हे महत्वाचेतत्व आहेकारण हेआपल्या मुखानेकबूल केल्यानेहोते व त्यामुळे आपलाविश्वास प्रकटहोतो. याद्वारे सैतानाच्या शक्तींपासून आपली मुक्तता होते. आणि म्हणून सैतानाला आपली साक्ष सांगताना पुढील शब्द अवश्य म्हणावे, 'ट्टाझा विश्वास आहे की पापावर मात करून देव मला विजयी जीवनात नेत आहे.'' अशाप्रकारे आपण सैतानावर विजय प्राप्त करू शकतो.

''त्याला त्यांनीं कोंकर्याच्यारक्तामुळें वआपल्या साक्षीच्या वचनामुळें जिंकलें; आणि त्यांच्यावरमरावयाची पाळीआली तरीत्यांनीं आपल्या जिवावर प्रीति केली नाही'' (प्रकटी 12:11).

तुम्ही पडत असला तरी जोपर्यंत तुम्ही विजयी होत नाही तोपर्यंत हे कबूल करीत राहा. ते त्वरीत झाले नसले तरी तुम्ही निराश होऊ नका. तुमच्या मुखाद्वारे कबूल केलेल्या गोष्टीचा देव नक्कीच आदर करील.