लेखक :   झॅक पुननं
WFTW Body: 

१. वेळेचा सदुपयोग करा :

निष्काळजीपणा आणि पापामध्ये गेलेला वेळ कधीच पुन्हा मिळवता येत नाही. देव आपल्याला वाया घालवलेल्या जीवनाबद्दल क्षमा करू शकतो आणि तरीही आपल्याला त्याच्या राज्यात नेऊ शकतो. पण देवसुद्धा आपल्याला आपली वाया गेलेली वर्षे परत देऊ शकत नाही. वाया गेलेला वेळ हा आपण कायमचा गमावतो. तो परत कधीही मिळत नाही. म्हणून तरुणपणातच प्रभूचे अनुसरण करायला सुरुवात करणे फार चांगले आहे. पृथ्वीवरील आपले जीवन अतिशय छोटे आहे. त्यामुळे तुम्ही आपल्या वेळेचा उपयोग मोहांवर मात करण्यासाठी आणि सर्वांचे भले करण्यासाठी करणे अत्यावश्यक आहे. कोणतीही किंमत मोजायला लागली तरीही नम्रता, शुद्धता आणि प्रीती यांत मुळावलेले असा. एके दिवशी येशू परत येईल आणि आपण त्याला समोरासमोर पाहू तेव्हा देवाने तुम्हांला प्रकाश दिल्यानंतर तुम्ही ज्या पद्धतीने जगत होता त्याबद्दल तुम्हांला पश्चात्ताप होता कामा नये. त्या दिवशी अनेक विश्वासणारे स्वर्गात प्रवेश करून येशूला पाहतील आणि त्याची त्यांच्यावर किती प्रीती होती हे जेव्हा त्यांना कळेल तेव्हा ते दुःखाने व पश्चात्तापाने मोडून जातील यासाठी की ते पृथ्वीवर त्याच्यासाठी किती अनुत्साही होते. अशा पश्चात्तापापासून देव तुम्हांला वाचवू शकतो. आताच याचा विचार करण्याची आणि शहाणे होण्याची वेळ आहे. एसावाप्रमाणे एक वाडगाभर वरणासाठी (दैहिक आनंद) तुमचा जन्मसिद्ध हक्क (आध्यात्मिक आशीर्वाद) कधीही विकू नका. "सर्वांबरोबर शांततेने राहण्याचा व ज्यावाचून कोणालाही प्रभूला पाहता येत नाही ते पवित्रीकरण मिळवण्याचा झटून प्रयत्न करा" (इब्री लोकांस पत्र १२:१४). "जसे जसे आम्ही त्याच्या चेहऱ्याकडे पाहू तसे तसे आम्हांला वाटेल की आम्ही त्याला आणखी दिले असते तर बरे झाले असते….."

२. तुमच्या आंतरिक माणसाचे दररोज नूतनीकरण होऊ द्या :

आपला बाह्य मनुष्य दररोज क्षय पावत असतो. ते आपोआप घडते. पण आपल्या आंतरिक मनुष्याचे दररोज नूतनीकरण केले जावे अशी देवाची इच्छा आहे (२ करिंथ ४:१६). पण ते आपोआप घडत नाही. बरेचसे विश्वासू बांधवांचे दररोज नूतनीकरण केले जात नाही, कारण येशूने म्हटलेली ती एक गोष्ट ते दररोज करत नाही - वधस्तंभ उचलून घेणे (लूक ९:२३). आंतरिक मनुष्यात नूतनीकरण करणे म्हणजे आपल्यात येशूच्या जीवनाचा अधिकाधिक सहभाग होऊ देणे. हे तेव्हाच घडू शकते जेव्हा आपण दररोज येशूचे मरण आपला शरीरात वागवतो (२ करिंथ ४:१०). प्रत्येक दिवसाला अडचणी, परीक्षा आणि प्रलोभनांचा वाटा विभागून दिलेला असतो (मत्तय ६:३४ मध्ये येशूने म्हटल्याप्रमाणे). या परीक्षांमध्येच आपण वधस्तंभ वाहतो आणि स्वतःला मरतो, यासाठी की प्रत्येक परीक्षा आपल्यासाठी गौरव प्रगट करेल.

आपण वर- आणि - खाली असे जीवन जगावे अशी देवाची इच्छा नाही. (कधीकधी डोंगराच्या शिखरावर, तर कधी डबक्यांमध्ये) आपलं आयुष्य सातत्याने वरच्या दिशेने जावं अशी त्याची इच्छा आहे - आंतरिक माणसाचं सतत नूतनीकरण होणे. म्हणून दररोज आपल्याला मिळालेल्या प्रत्येक संधीत आपण येशूच्या मरणास धरण करून आपला चेहरा दृढपणे स्थापित केला पाहिजे. सभा आणि परिषदांच्या 'उत्साहातून' आपण दैवी जीवन मिळवू शकत नाही. पुष्कळ लोक स्वतःला फसवतात असे समजून की ते आध्यात्मिक झाले कारण एखाद्या सभेत किंवा परिषदेत ते भावनिकदृष्ट्या उत्तेजित झाले होते. पण वाढ केवळ सभांना आणि परिषदांना उपस्थित राहिल्यामुळे होत नाही. रोजच्या सामान्य भरडल्याजाण्यार्‍या जीवनात विश्वासूपणे वधस्तंभ घेऊन जाण्याने आपली वाढ होते. आपण दररोज सभांना जाऊ शकत नाही. पण आपल्याला दररोज परीक्षा असल्यामुळे आपल्याला दररोज नूतनीकरण करण्याची संधी आहे.

आपण दररोज कोणतीही तक्रार न करता आणि कुरकुर न करता,विश्वासूपणाने रोजच्या परीक्षांमध्ये प्रभूसाठी जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे हे ओळखून की आपले जीवन हे आपल्या स्वत: चे नाही (आपल्याला जे आवडते ते करण्यासाठी) पण आपले जीवन प्रभूचे आहे कारण त्याने आम्हाला उत्पन्न केले आणि त्याने आम्हाला विकत घेतले. मग आपल्याला दैनंदिन नूतनीकरणाचा अनुभव येईल. पण ज्याप्रमाणे आपल्या शरीराचा ऱ्हास दररोज दिसून येत नाही पण काही काळा नंतर दिसतो, त्याप्रमाणे आपल्यातील आंतरिक मनुष्याचे नूतनीकरण काही वर्षांनंतरच दिसून येईल. पण ते नूतनीकरण दररोज होत राहील जर आपण विश्वासू असू तर (२ करिंथ ४:१६). आपण विश्वासू असलो तर दररोज नूतनीकरण केले जाईल. त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आणि मोठ्या मोठ्या गोष्टींमध्ये सुद्धा विश्वासू राहा. शेवटी तुम्हाला समजेल की आपल्या देहाला वधस्तंभावर खिळणे (गलती ५:२४), देवाला प्रथम स्थान देणे , आणि पुर्णपणे त्याच्यासाठी जगणे हे आपल्यासाठी फायदेशीर होते.