WFTW Body: 

एज्रा आणि नहेम्या या दोन देवभीरु पुरुषांच्या प्रभावातून देवाने यहुद्यांमध्ये आणलेले प्रचंड पुनरुज्जीवन नहेम्याच्या पुस्तकात आपल्याला दाखवण्यात आले आहे. नहेम्याच्या आठव्या अध्यायामध्ये आपण देवाने एज्राच्या माध्यमातून काय केले ते वाचतो. त्याने देवाचे वचन घेतले आणि सर्व स्त्री-पुरुष आणि समजू शकत असलेल्या मुलांना एकत्र केले. त्यानंतर त्याने त्यांच्यासाठी ६ तासांचा पवित्र शास्त्राचा अभ्यास घेतला! आणि तिथे असे म्हटले आहे की, "सर्व लोकांनी नियमशास्त्राचा ग्रंथ कान देऊन ऐकला." (नहेम्या८:३). देवाची स्तुतीने त्यांनी त्यांच्या सभेची सुरुवात केली (नहेम्या ८:६). आणि मग एज्राने देवाच्या शब्दातून वाचलेल्या प्रत्येक गोष्टीचा अर्थ लोकांना समजावून सांगण्यासाठी कष्ट घेतले (नहेम्या ८:८). साहजिकच एज्राने स्वत: देवाच्या या शब्दाचा अभ्यास करण्यात अनेक महिने आणि वर्षे घालवली होती जेणेकरून त्या सर्वांना हे सर्व इतक्या स्पष्टपणे समजावून सांगता आले. देवाने त्याला या वेळेसाठी गुप्तपणे तयार केले होते .

पुनरुज्जीवन आले आणि लोक आपल्या पापांसाठी रडू लागले(नहेम्या८:९). त्यानंतर देवाने त्यांना दिलेल्या चांगल्या गोष्टी इतरांबरोबर वाटून घेण्याचा बोध केला गेला. हे करताना, “परमेश्वराविषयीचा जो आनंद तोच तुमचा आश्रयदुर्ग होय"असे त्याने त्यांना सांगितले (नहेम्या ८:१०). लोक बाहेर गेले आणि त्यांनी त्या उपदेशाचे पालन केले. दुस-या दिवशी एज्राने पुढाऱ्यांसाठी पवित्र शास्त्र अभ्यास घेतला (नहेम्या ८:१३). देवाच्या वचनाने इस्राएली लोकांना सातव्या महिन्यात दरवर्षी "मंडपाचा सण" साजरा करण्याची आज्ञा दिली होती हे पाहिल्यावर त्यांनी त्याचे ताबडतोब पालन केले. सुमारे ९०० वर्षांत ही मेजवानी प्रथमच साजरी केली जात होती - कारण यहोशवाच्या काळापासून ही आज्ञा पाळली गेली नव्हती.(नहेम्या८:१४-१७) देवाच्या मनासारखा असलेला माणूस, दाविदालाही इस्राएली लोकांना या आज्ञा पाळायला सांगता आले नाही . एज्रा पुढील सात दिवस लोकांसाठी पवित्र शास्त्र अभ्यास घेत राहिला(नहेम्या ८:१८)

नहेम्याच्या अध्याय ९ मध्ये आपण नहेम्याच्या माध्यमातून देवाने काय केले ते वाचतो . या अध्यायाची सुरुवात इस्राएली लोकांच्या उपवासाने , त्यांच्या पापांच्या कबुलीने आणि स्वत:ला विदेश्यांपासून वेगळे करण्याने होते (नहेम्या ९:१,२). मग त्यांनी तीन तासांचा पवित्र शास्त्राचा अभ्यास आणि तीन तास परमेश्वराची स्तुती केली आणि आपल्या पापांची कबुली दिली. हे पुन्हा एकदा पुनरुज्जीवन होते (नहेम्या ९:३). मग लेवी उठून उभे राहिले आणि त्यांनी मोठ्या आवाजात परमेश्वराचा धावा केला (नहेम्या ९:४). नहेम्या ९:५ ते ३७ व्या वचनापर्यंत संपूर्ण पवित्र शास्त्रामधील नमूद केलेली सर्वात मोठी प्रार्थना आढळते. त्यानंतर लेवींनी अब्राहामाच्या काळापासून इस्रायलचा इतिहास पुन्हा सांगितला आणि चाळीस वर्षांच्या वाळवंटात भटकताना आणि शास्ते आणि राजांच्या काळात त्यांना अपयश आले आणि देवाने पाठविलेला प्रत्येक निर्णय न्याय्य आणि योग्य असल्याचे मान्य केले. त्यांनी पश्चात्ताप केला आणि देवासमोर एका दस्तऐवजावर स्वाक्षरी केली, ज्यावर नहेम्याने सर्वप्रथम स्वाक्षरी केली (नहेम्या १०:१).

हे सर्व एज्रा आणि नहेम्या या दोन देवभीरु माणसांच्या प्रभावातून घडले. त्यांची संयुक्त सेवा जवळजवळ दोन वडीलांच्या नेतृत्वात असलेल्या नवीन कराराच्या मंडळीसारखी कार्यरत होती. आज आपण सर्वांनी अनुकरण करावे असे हे उत्तम उदाहरण आहे.