WFTW Body: 

२ इतिहास ३:१ मध्ये आपण वाचतो की, "शलमोन मोरिया डोंगरावर परमेश्वराचे घर बांधू लागला". मोरिया डोंगर असे ठिकाण होते जिथे अब्राहामाने आपला मुलगा इसहाक याला देवाला अर्पण केले होते (उत्पत्ति २२). तेथे त्या डोंगरावर अब्राहामाने त्यागाचा मार्ग हाच देवाचा मार्ग समजून आपणाला सादर केले. देवाने त्या ठिकाणाचे पवित्रीकरण केले आणि १००० वर्षांनंतर त्याचे घर त्याच ठिकाणी बांधले जाईल असा निर्धार केला. आणि येथेच देव आजही आपले घर (मंडळी) बांधतो - जिथे जिथे त्याला अब्राहामाची भावना आणि विश्वास असलेले लोक सापडतात. आदाम आणि हव्वा यांनी एदेनमध्ये देवाला जे सांगितले होते त्याच्या अगदी उलट मोरिया डोंगरावर अब्राहाम प्रतिकात्मकरित्या सांगत होता.

एदेनमध्ये, आदाम आणि हव्वा यांनी निषिद्ध फळ खाण्याच्या कृतीद्वारे सांगितले की त्यांना आनंद देणाऱ्या निर्मित गोष्टी त्यांच्यासाठी स्वत: निर्माणकर्त्यापेक्षा अधिक मौल्यवान होत्या. आणि आजही अब्जावधी माणसे देवाला हेच सांगत आहेत. "त्यांनी निर्माणकर्त्याऐवजी निर्मित वस्तूंची भक्ती व सेवा केली" (रोम.१:२५). पण मोरिया डोंगरावर अब्राहामाने उलट म्हटले: की त्याचा देव आणि त्याचा निर्माणकर्ता पृथ्वीवरील त्याच्या मालकीच्या सर्वांत प्रिय गोष्टीपेक्षा (इसहाक) त्याच्यासाठी अधिक मौल्यवान होता. आणि ते सिद्ध करण्यासाठी तो इसहाकाचा बळी देण्यास तयार होता. या त्यागाच्या तत्त्वाने जगणाऱ्या सर्वांचा देव सन्मान करेल. अशा मार्गाला ज्यांनी धरून ठेवले आहे त्यांच्यानेच आजही देवाचे खरे घर बांधले जाणार आहे.

कालवरीच्या टेकडीवर येशूचा मृत्यू जगाच्या पापांसाठी झाला इतकेच केवळ खरे नव्हते. तेथे येशूने त्यागाचे तत्त्व दाखवून दिले ज्याद्वारे देव आपले सर्व कार्य करतो. इतर कोणत्याही मार्गाने कोणीही परमेश्वराची सेवा करू शकत नाही. जे या जगात आरामदायक जीवन शोधतात आणि त्याच वेळी मंडळीही बांधू इच्छितात, ते केवळ स्वत:ला फसवतील. जे दोन्ही जगातील सर्वोत्तम शोधतात त्यांना सैतानाने पूर्णपणे फसवले आहे. अनेकांनी त्यागाशिवाय देवाची सेवा करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या श्रमांना मात्र अपयशापाठोपाठ अपयशाचा मुकुट मिळाला आहे!!

"ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली आणि तिच्यासाठी स्वत:ला अर्पून दिले" (इफिस ५:२५). मंडळी बांधण्यासाठी आपल्याला मंडळीवरही त्याच प्रकारे प्रीति करावी लागेल. आपले पैसे किंवा आपला वेळ देणे पुरेसे नाही. आपल्याला स्वतःला - आपल्या स्व-जीवनाला द्यावे लागेल.

जेव्हा देवाला माणसावरील आपल्या प्रीतीचे वर्णन करायचे होते, तेव्हा तो आपल्या प्रीतीची तुलना पृथ्वीवरील केवळ एकाच उदाहरणाशी करू शकत होता - आईची तिच्या नवजात बाळाबद्दल असलेली प्रीति (यशया ४९:१५ पहा). तुम्ही जर एका आईचे निरीक्षण केले तर तुम्हाला दिसेल की तिची आपल्या बाळावरील प्रीति त्यागाच्या भावनेने भरलेली आहे. पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत आणि रात्रभर आई आपल्या बाळासाठी त्याग आणि त्याग आणि त्याग करते. आणि त्या बदल्यात तिला काहीच मिळत नाही. ती आपल्या बाळासाठी वर्षानुवर्षे वेदना आणि गैरसोय सहन करते, आनंदाने, त्या बदल्यात काहीही अपेक्षा न ठेवता. आपल्या आजूबाजूचे इतर आपल्या मुलासाठी काही त्याग करत आहेत की नाही याची आईला पर्वा नसते. ती आनंदाने स्वत: प्रत्येक गोष्टीचा त्याग करते. त्याच प्रकारे मंडळीकडे स्वत:चे बाळ म्हणून पाहणाऱ्याला त्याच्या आजूबाजूचे इतर लोक मंडळीसाठी काही त्याग करत आहेत की नाही याची पर्वा असणार नाही.

देवही आपल्यावर अशीच प्रीती करतो. आणि हाच स्वभाव त्याला आपल्याला द्यायचा आहे. परंतु जगात कोठेही सहभागिता शोधणे अशक्य आहे ज्याबद्दल प्रामाणिकपणे असे म्हणता येईल की ते सर्व एकमेकांवर अशी प्रीती करतात. बहुतेक विश्वासू लोकांना त्यांच्याशी सहमत असलेल्यांवर आणि त्यांच्या गटात सामील झालेल्यांवर प्रीती कशी करावी हे माहित असते. त्यांची प्रीती मानवी आहे आणि मातांच्या त्यागपूर्ण प्रीतीपासून दूर आहे!!