WFTW Body: 

इब्री 4:12 मध्ये आपण वाचतो, ''कारण देवाचे वचन सजीव, सक्रीय, कोणत्याहि दुधारी तरवारीपेक्षां तीक्ष्ण असून, जीव व आत्मा, सांधे व मज्जा ह्यांना भेदून आरपार जाणारें आणि मनांतील विचार व हेतु ह्यांचें परीक्षक असें आहे''.

देवाचे वचन जीव व आत्मा ह्यांना भेदून जाते (4:12). जीव व आत्म्याचे भेदून जाणे असे प्रकट करते की सर्व लोकांना देवाचे वचन पा्र प्त होण्याकरिता आपण एकतर आपल्या जीवावर (मन आणि भावनवे र) आधारीत आहाते किंवा पवित्र आत्म्यावर आधारीत आहाते . जुन्या करारा अंतर्गत असणारे लोक जीव व आत्म्यामधील फरक स्पष्ट करू शकले नाही.

जुन्था करारातील निवासमडं पाचे 3 भाग होते - बाहेरील भाग, पवित्र स्थान व अतिपवित्र स्थान. हे मनुश्थाच्या शरीराचे, जीवाचे व आत्म्याचे चित्र होते (1 थेस्सलनी 5:23). जीव पवित्र स्थानाद्वारे प्रदशीर्त केल्या जात असे. आत्मा अतिपवित्र स्थानाद्वारे प्रदर्शीत केल्या जात असे. अतिपवित्र स्थानात देवाची उपस्थिती असे. पवित्र स्थान व अतिपवित्र स्थानामध्ये जाड पडदा होता. अतिपवित्र स्थानात कोणालाही जाण्याची परवानगी नव्हती. वर्षातून एकदा केवळ महायाजकाला तेथे जाण्याची परवानगी होती. यातून सांकेतीकपणे असे शिकविल्या जात होते की जुन्या करारा अंतर्गत मनुष्य आत्म्यात जगू शकत नाही किंवा देवाची सेवा करू शकत नाही. यामुळे जीव म्हणजे काय व आत्मा म्हणजे काय यातील फरक इस्त्राएली लोक समजू शकले नाही. आज देखील ज्या लोकांना या दोन्ही बाबीतील फरक कळत नाही ते जुन्या करारा अंतर्गत राहणारे ख्रिस्ती लोक आहेत.

देवाचे वचन तुम्हाला जीव व आत्म्यामधील फरक सांगेल. आजचे अनेक नामधारी ख्रिस्ती लोक करीत असलेले कार्य जीवाच्या संबंधीत आहेत. जीवाच्या संबंधीत कार्य हे मानवी कल्पनेंवर आधारीत असते. त्यांच्याकडे चांगल्या कल्पना असतीलही ज्या वाईट किंवा जगीक नसतील. परंतु, त्या मानवी व जीवाच्या संबंधीत आहते . 3 प्रकारचे खिस्र् ती लाके आपल्याला आढळतात. जगीक खिस्र् ती असे आहते ज्यांचा नवीन जन्म झालेला असतो, परंतु, ते पापमय सुखसोयींचा काही प्रमाणात आनंद घेतात व पैशावर प्रीती करितात, इत्यादी. जीवाच्या संबंधीत असलेले खिस्र् ती लाके असे आहते त्यांनी या सर्व गोश्टी सोड्लेल्या या असतात, परंतु, ते आपल्या बुद्धीनुसार व भावनेनुसार जीवन जगतात. आत्मिक ख्रिस्ती लोक असे आहेत जे सर्व गोष्टींमध्ये पवित्र आत्म्याचे मार्गदर्शन प्राप्त करितात व त्याप्रमाणे कार्य करितात.

जीवाच्या संबंधीत असणारे ख्रिस्ती लोक चांगले असतात व देवाची साक्ष देण्यास व सेवा करण्यास उत्सुक असतात. परंतु, त्यांच्या कार्य करण्याच्या पद्धती मानवीय असतात. त्यांना देवाचे मार्ग समजत नाही. परमेश्वर म्हणतो, ''माझे मार्ग तुमचे मार्ग नव्हत. कारण आकाश जसे पृथ्वीहून उंच आहे तसे माझे मार्ग तुमच्या मार्गांहून आणि माझ्या कल्पना तुमच्या कल्पनांहून उंच आहे''(यशया 55:8,9). मानवी पद्धतीने आपण हरवलेल्या जिवांपर्यंत पोहंचण्याचा प्रयत्न करितो व मानवी पद्धतीने देवाची सेवा करितो. एकदा दावीदाने देवाचा कोश एका नव्या गाडीत ठेविला - ज्याप्रमाणे पलिश्ट्यांनी केले होते (2 शमवु ले 6:3; 1 शमुवले 6:11). कहाथ्यांना देवाचा कोश खांदयांवर फार लांब प्रवास करण्यापासून वाचविण्याकरिता ही कल्पना चांगली होती. परंतु, हा देवाचा मार्ग नव्हता आणि यामुळेच देवाने वाटेतच त्यांच्यावर न्याय आणला.

जेव्हा जेव्हा देवाचे कार्य करण्याकरिता ख्रिस्ती लाके मानवी मार्ग स्वीकारतात तेव्हा तेव्हा मोटा गोंधळ होते व भविष्यातही असचे होईल. त्या कार्याचे बाह्य परिणाम चांगले दिसतील, परंतु, त्याठिकाणी देवाचे गौरव राहणार नाही. देवाने मोशेला सांगितल्याप्रमाणे मोशेने अगदी तंतोतंत तसाच निवासमंडप बांधला. मिसरातील त्याच्या शैक्षणिक बुद्धीनुसार त्याने तो बांधला नाही. मिसरात मोठे व भव्य पिरॅमीड बांधण्याचे कौशल्य तो शिकला होते. देवाचे घर बांधण्याकरिता मोशोला त्याच्या मानवी समजबुध्दीचा त्याग करावा लागला. देवाने मोसोला 40 वर्षे रानात नेले हे यामागील एक कारण होते, जेणेकरून त्याने त्याच्या मानवी ज्ञानापासून दूर जावे. यामुळेच देवाने पौलाला 3 वर्षे अरबस्थानात नेले जेणेक्सुन जे शिक्षण त्याला गमलीएल बायबल स्कूलमध्ये 3 वर्षांपर्यंत मिळाले होते त्या शिक्षणापासनू त्याने दरू जावे (गलती 1:17,18). देवाचे मार्ग समजण्यापूर्वी जे जीवाच्या संबंधीत असलेले ज्ञान त्याला होते ते सर्व ज्ञान त्याला काढून टाकावे लागले.

ज्या मानवी संसाधनांवर आपण अवलंबून आहोत अशा मानवी सामर्थ्याकडे शौल निर्देश करितो. अनेकदा आपल्याला वाटते की जर आपल्याकडे अनेक तांत्रीक संसाधने व राजकीय सहायता सहयोग असेल तर आपण देवाचे कार्य फार उत्तमपणे करू शकतो. ही फसवणकू आहे. देवाचे कार्य पवित्र आत्म्याच्या सामथ्यार्न चे पूर्ण होऊ शकहे. प्राचिन प्राचिन प्रेसषितांकडे पॆसे, संसाधने. राजकीय सहायता सहयागे नव्हता. मानवी संसाधन त्यांच्याकडे नव्हतचे; परंतु, आजचे खिस्ती लाके संसाधने, पॆसे व प्रभावांचा वापर करून जेवढ्याप्रमाणात देवाचे कार्य करितात त्यापेक्षाही अधिक प्रमाणात प्राचिन ख्रिस्ती लोकांनी देवाचे कार्य पूर्ण केले. प्रेषितांकडे आत्मिक सामर्थ्य होते, जीवाच्या संबंधीत असलेले सामर्थ्य नाही.

जर आपण खर्या रीतीने आत्मिक आहोत, तर आपण जीव व आत्मा यामध्ये भेद दाखवावा. मी अशा अनेक सभेंना गेलो ज्यामध्ये लोक असा दावा करितात की प्रार्थनेत अधिक भावना व अधिक आवाज असेल तरच पवित्र आत्मा त्याठिकाणी आहे. परंतु, मी मूर्ख नाही. मला हे स्पष्टपणे दिसते की त्याठिकाणी केवळ मानवी जीवाचे कार्य होत असते. त्याठिकाणी पवित्र आत्म्याचे कार्य घडत नाही. ते ज्याला 'पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा' म्हणतात, तो केवळ 'त्यांच्या जीवाच्या संबंधीत असलेल्या सामर्थ्याचा बाप्तिस्मा' असतो. येशू आज देखील लोकांचा पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा करितो. त्यामुळे ख्रिस्ताची साक्ष देण्याकरिता आत्मिक सामर्थ्य प्राप्त होते (प्रेषित 1:5,8). जीवाच्या संबंधीत असलेल्या सामर्थ्याने केवळ भावनांनाच हालविल्या जाते. परंतु, अनेक ख्रिस्ती लोकांना याविषयी स्पष्टपणे दिसत नाही आणि यामुळेच ते फसविल्या जातात.

त्यात भर म्हणजे काही खिस्तीतर प्रार्थना सभेंमध्ये ते अन्य भाषेत बोलतात व त्यांच्या भावनांना उत्कट करितात व आत्मिक शांती मिळण्याचा दावा करितात. मानवी जीवाच्या संबंधीत असलेले सामर्थ्य अधिक उत्कट करण्यात अनेक धर्माचे लोक व्यस्त आहेत.

या दिवसांमध्ये जर आपण जीव व आत्मा यातील फरक स्पष्टपणे बघू शकत नाही, तर आपण पूर्णपणे फसविल्या जाऊ. आज अनेकदा थेशूच्या नावात ''आराग्े य'' मिळालेले आपण पाहतो, ते देखील मानवी जीवाच्या संबंधीत असणार्या सामर्थ्याद्वारे असते; पवित्र आत्म्याच्या खर्या दानाद्वारे ते नसते. खपू गीते गाऊन सभमें ध्ये भावनेचे वातावरण तयार केल्या जाते. ''प्रभु मी तुइयावर विश्वास ठेवितो'' अशाप्रकारचे गीत अनेक वेळा गाऊन लोकांच्या भावना अधिक तीव्र केल्या जातात. त्यानंतर लोकांना असे सांगण्यात येते की आता त्यांनी ''आपला विश्वास प्रकट करावा''. या गोष्टींचा देवासोबत काहीच संबंध नसतो. वक्ता लोकांना केवळ संमोहित करीत असतो. येशूने व प्रेषितांनी अशाप्रकारे लोकांना कधीच बरे केले नाही. गीतांचा व भावनेंचा उपयोग न करिता त्यांनी शांतपणे आजार्यांना बरे केले.

हा खोटेपणा जर तुम्हाला ओळखता आला नाही तर तुम्ही देखील तसे अनुकरण करू शकता व तुमची देखील अशी धारणा होईल की देवची सेवा करण्याचा हाच मार्ग आहे. मग तुम्ही जाऊन अशाचप्रकारे तुमच्या जीवाच्या संबंधीत असलेले सामर्थ्य इतरांपुढे प्रकट कराल व त्याद्वारे त्यांची व स्वतःची फसवणकू कराल. जीवाच्या संबंधीत असलेले काय व आत्मिक काय हे तुम्हाला दाखवून देण्याकरिता देवाच्या वचनाला तमु च्या अंतःकरणात येण्याची परवानगी द्या. जेव्हा तुम्ही याकरिता येशूकडे पाहाल तेव्हा तुम्हाला येशूमध्ये ह्या समस्येचे उत्तर सापडले . जर तुम्ही कधी आरोग्याच्या सभते गेले असाल किंवा ख्रिस्ती टी.व्ही वर आरोग्याच्या सभा बघितल्या असाल तर तुम्हा स्वतःला असा प्रश्न विचारा की काय येशूने असेच केले? तुम्हाला अगदी थेट सत्य सापडेल. परंतु, जर तुम्ही देवाच्या वचनाकडे दुर्लक्ष कराल तर तुम्ही नक्कीच फसविले जाल. देवाच्या वचनाद्वारे जीव व आत्म्यातील फरक तुम्हाला हाला कळावा. आत्मिकरित्या खरोखर सत्य काय आहे हे आपल्याला दाखविण्याकरिता देवाने आपल्याला त्याचे वचन दिले आहे त्याचप्रकारे येशूचे व प्रेषितांचे उदाहरण दिले आहे.