WFTW Body: 

मोशे हातात दगडाच्या दोन पाट्या घेऊन सीनाय पर्वतावरून खाली आला. एकावर, पहिल्या चार आज्ञा लिहिल्या होत्या ज्या मनुष्याच्या देवासोबतच्या नातेसंबंधाशी संबंधित होत्या. दुसऱ्यावर इतर सहा आज्ञा लिहिल्या होत्या ज्यात मनुष्याच्या त्याच्या इतर मनुष्यांबरोबर असलेल्या नातेसंबंधाशी संबंधित होत्या.

प्रभु येशूने सांगितले की या दोन पाट्या दोन आज्ञांमध्ये एकत्रित केल्या जाऊ शकतात. पहिली आज्ञा, "तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जिवाने व पूर्ण मनाने प्रीती कर." आणि दुसरी आज्ञा, "तू आपल्या शेजार्‍यावर स्वतःसारखी प्रीती कर." (मत्तय 22:37-39).

येशूने शिकवलेल्या प्रार्थनेत या दोनीही आज्ञांवर जोर दिला. प्रार्थानेतील पहिले तीन विनंत्या पहिल्या आज्ञेशी संबंधित आहेत. आणि पुढील तीन विनंत्या दुसऱ्या आज्ञेशी संबंधित आहेत, जसे की येशूने आपल्या शिष्यांना दिलेल्या नवीन आज्ञेमध्ये विस्तारित केले आहे, जेव्हा त्याने म्हटले, "जशी मी तुमच्यावर प्रीती केली तशी तुम्हीही एकमेकांवर प्रीती करावी" (योहान 13:34).

येशूचा खरा शिष्य त्याच्या सचेत आणी असचेत अवस्थेत त्याच्या प्रत्येक इच्छेसह, पूर्णपणे देवाशी सुसंगतपणे देवामध्ये पूर्णपणे केंद्रित होण्याचा प्रयत्न करतो; आणि त्याच्या प्रत्येक इच्छामधे किंवा त्याची महत्वाकांक्षा देवाच्या इच्छे बरोबर जुळून येते आणी त्याच बरोबर जसे येशूने त्याच्यावर प्रेम केले तसे तो आपल्या बांधवांवर पूर्णपणे प्रेम करण्याच्या संधी शोधतो.

तथापि, त्याची वृत्ती या दोन दिशांमध्ये जितकी असावी तितकी परिपूर्ण नाही याची त्याला सतत जाणीव असते. पण त्या ध्येयासाठी तो सतत प्रयत्नशील राहतो, तिथे पोहोचण्यासाठी कोणतीही किंमत मोजायला तयार असतो.

आपल्या भावावर प्रेम करणे म्हणजे त्यांची काळजी घेणे होय. आपण जगातील प्रत्येकाची काळजी करू शकत नाही. ती क्षमता फक्त देवाकडेच आहे. पण आपल्या क्षमतेनुसार आपल्याला आपल्या सह-विश्वासूंची काळजी असली पाहिजे; आणि ती क्षमता वाढत गेली पाहिजे.

आम्ही अशी सुरुवात करत नाही. पहिली पायरी म्हणजे जसे येशूने आपल्यावर प्रेम केले तसे प्रेम कुटुंबातील सदस्यांवर करणे. पण आपण तिथेच थांबत नाही. येशूने जसे आपल्यावर प्रेम केले तसेच प्रेम देवाच्या कुटुंबातील आपल्या बंधुभगिनींवरही करण्याचा प्रयत्न करत आपण पुढे जात आहोत.

सिद्धता हे एक ध्येय आहे ज्याच्या दिशेने पुढे जाणे आहे ,पण आपण ते गाठण्याचा निर्धार केला पाहिजे. पौल ह्याच दिशेने जात होता तेंव्हा तो म्हणाला, "मागील गोष्टींकडे दुर्लक्ष करून व पुढील गोष्टींकडे लक्ष लावून, ख्रिस्त येशूच्या ठायी देवाचे जे वरील पाचारण त्यासंबंधीचे बक्षीस मिळवण्यासाठी मर्यादेवरील खुणेकडे मी धावतो; हेच एक माझे काम." (फिलिप्पै. 3:13,14). देवाचा ऊर्ध्वगामी पाचारण म्हणजे पूर्णपणे देवामध्ये केंद्रित होणे, देवावर सर्वोच्च प्रेम करणे आणि येशूने आपल्यावर जसे प्रेम केले तसेच आपल्या सह-विशासणाऱ्यांवर प्रेम करणे आणि आपल्या शेजाऱ्यांवर स्वतःसारखे प्रेम करणे.