लेखक :   झॅक पुननं
WFTW Body: 

थेस्सलनीकाकरांस पहिले पत्र ४:१३-१८ मध्ये, ख्रिस्त परत येईल तेव्हा कसे असेल याबद्दल पौल बोलत आहे. "बंधुजनहो, झोपी गेलेल्या लोकांविषयी तुम्ही अजाण नसावे अशी आमची इच्छा आहे." जे ख्रिस्तामध्ये मरण पावले आहेत हे त्यांच्या संदर्भात आहे. येशू मेला आणि पुन्हा उठला; आणि जे ख्रिस्तात मेलेले आहेत तेही पुन्हा उठतील. जेव्हा येशू परत येईल, तेव्हा जे आपण जिवंत आहोत ते आपल्या आधी ख्रिस्तामध्ये मेलेल्यांच्या आधी नेले जाणार नाही. ते थडग्यातून उठतील. हे पहिले पुनरुत्थान असेल. आणि प्रभूला भेटायला त्यांच्याबरोबर आपण एकत्र वर घेतले जाऊ. विश्वास न ठेवणारे आणखी एक हजार वर्षे उठणार नाहीत. ते दुसऱ्या पुनरुत्थानाच्या वेळी उठतील.

आपला प्रभू परत येताना, तो आज्ञाध्वनी, आद्यदिव्यदूताची वाणी व देवाच्या तुतारीचा नाद होत असता उतरेल. मग सर्व संत मेघारूढ असे प्रभुला भेटायला अंतराळात घेतले जातील. जेव्हा येशू त्याच्या शिष्यांशी आपल्या परत येण्याविषयी बोलला, तेव्हा याच गोष्टींविषयी बोलत होता. तो म्हणाला, "ह्यास्तव कोणी तुम्हांला म्हणतील, ‘पाहा, तो अरण्यात आहे,’ तर जाऊ नका; तुम्हांला म्हणतील, ‘पाहा, तो आतल्या खोल्यांत आहे,’ तर ते खरे मानू नका." (मत्तय २४:२६) त्याच्या म्हणण्याचा अर्थ होता की जसा आज अनेकांचा विश्वास आहे त्याप्रमाणे तो गुप्तपणे येणार नाही. जेव्हा तो येईल तेव्हा पूर्वेकडून पश्चिमेकडे चमकणाऱ्या विजेसारखा ते असेल. प्रत्येक डोळा त्याला पाहू शकेल.

ख्रिस्ताचे आगमन केव्हा होईल? येशूने याचेदेखील उत्तर दिले: "संकटांनंतर लगेचच" (मत्तय २४: २९, ३०). पुष्कळांचा असा विश्वास आहे की ख्रिस्त संकटांच्या काळापूर्वी आपल्या संतांना वर उचलून घेईल. परंतु पवित्र शास्त्रात असे एकही वचन नाही की जे शिकवते की; हा मनुष्यांचा एक धर्मसिद्धांत आहे. येशू स्वत: स्पष्टपणे म्हणाला की त्याचे आगमन संकटांच्यानंतर होईल. येथे थेस्सलनीकाकरांस पहिल्या पत्रामध्ये उल्लेखित घटना येशूने मत्तय २४:३०,३१ मध्ये सांगितल्याप्रमाणेच आहेत: येशू मेघारुढ होऊन देवदूतांसह आणि कर्ण्याच्या नादासह प्रगट होईल आणि संतांना त्याला भेटावयाला त्याच्याकडे नेण्यात येईल.

थेस्सलनीकाकरांस पहिले पत्र ५:२ मध्ये आम्ही वाचतो, “जसा रात्री चोर येतो, तसाच प्रभूचा दिवस येतो.” चोर आपल्या येण्याची घोषणा करत नाही, परंतु अनपेक्षितपणे येतो. अशा प्रकारे, प्रभू परत आल्यावर प्रत्येक विश्वास न ठेवणारा चकित होईल. मात्र आम्ही, प्रकाशाची मुले, आपल्या प्रभुच्या येण्याची अपेक्षा करीत आहोत (थेस्सलनीकाकरांस पहिले पत्र ५:४). आम्ही अंधारात जगत नाही. म्हणून आपण आध्यात्मिकरित्या न झोपता सावध राहायला हवे (थेस्सलनीकाकरांस पहिले पत्र ५:६).

आपण जागे आहोत की झोपी गेलेले आहोत हे आपल्याला कसे कळेल? जेव्हा एखादा माणूस झोपलेला असतो तेव्हा खोलीत त्याच्या आसपासच्या वस्तू अदृश्य असतात; परंतु ज्या गोष्टी अवास्तव असतात (त्याच्या स्वप्नात) वास्तविक भासतात. तशाच प्रकारे, जेव्हा एखादा विश्वासणाऱ्याला अनंतकाळच्या वास्तविक गोष्टी अवास्तव दिसतात आणि या जगाच्या अवास्तव गोष्टी त्याच्यासाठी वास्तविक दिसतात तेव्हा तो आध्यात्मिकरित्या झोपी गेलेला असतो. स्वर्ग आणि अनंत काळाच्या तुलनेत हे संपूर्ण जग एका अवास्तव स्वप्नासारखे आहे. स्वर्गातल्या गोष्टी खरोखरच्या शाश्वत गोष्टी आहेत. झोपलेल्या विश्वासणाऱ्यांसाठी, प्रभू खात्रीने रात्रीच्या वेळी चोरासारखा येईल. पौल म्हणतो की आम्ही त्या दिवसाची वाट पाहतो आणि त्याच्या येण्याची आतुरतेने वाट पाहत आहोत.

आपल्या आसपासचे लोक अशी कल्पना करत असतील की सर्व काही शांत आणि सुरक्षित आहे (थेस्सलनीकाकरांस पहिले पत्र ५:३) परंतु अचानक त्यांच्या वर नाश ओढवेल.इथे असे म्हटले आहे की हा विनाश, "ज्याप्रमाणे गरोदर स्त्रीला अचानकपणे वेदना होतात" त्याप्रमाणे होईल (थेस्सलनीकाकरांस पहिले पत्र ५:३) शेवटल्या काळाविषयी बोलताना येशूने याच शब्दांचा उपयोग केला (मत्तय२४:८मध्ये). प्रत्येक स्त्रीला हे माहित आहे की मुलाला जन्म देण्यापूर्वी प्रसूतीचा वेदनादायक काळ असतो जो बर्‍याच तासांपर्यंत टिकतो. (काही माता असे म्हणतात की ते इतके वेदनादायक होते की त्यांना त्या मरणार असे वाटत होते). यानंतरच मूल जन्माला येते. ख्रिस्ताच्या आगमनापूर्वीच्या संकटांच्या काळाचे हे चित्र आहे. प्रसूतीच्या वेदनेशिवाय कोणतेही मूल जन्माला येत नाही. आणि या वेदनादायक संकटाच्या आधी प्रभूचे आगमन होणार नाही. आम्हाला त्या काळाची भीती वाटत नाही. जर प्रभू आपल्याला येथे त्याचे साक्षीदार म्हणून राहण्याची अनुमती देईल आणि आपले जीवन सुवार्तेसाठी देऊ देईल तर आपल्यासाठी हा मोठा सन्मान असेल.