लेखक :   झॅक पुननं
WFTW Body: 

परिक्षांचा हेतू आपल्या विश्वासाची सत्यता सिद्ध करणे - जसे की “सोने अग्नीत पारखले जाते ”. जेव्हा पृथ्वीच्या खोलवरुन सोने काढले जाते तेव्हा ते शुद्ध नसते. ते शुद्ध करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे आगीत टाकणे. आपण साबणाने आणि पाण्याने घासून सोन्याचे शुद्धीकरण करू शकत नाही. हे फक्त घाण काढून टाकते. पण सोन्यात मिसळलेले इतर धातू काढून टाकण्यासाठी ते आगीत टाकावे लागते. मग त्यातील सर्व मिश्रधातू वितळतात आणि शुद्ध सोने बाहेर येते. आपण जात असलेल्या परीक्षा अग्निमय असू शकतात. हे वेदना देते आणि आपल्याला असे वाटते की आपण जणू आगीत आहात. आपल्या जीवनातील अपवित्र असलेल्या गोष्टींपासून मुक्त होणे हा एकच हेतू आहे. उदाहरणार्थ, ज्या देशांमध्ये ख्रिश्चनांचा छळ केला जात होता आणि त्यांची मालमत्ता हडप करण्यात आली होती, त्याचा काय परिणाम झाला? ते चांगले यात्रेकरू झाले. ते त्यांच्या मालमत्तेशी कमी जोडले गेले कारण आता त्यांच्याकडे काहीच नव्हते. परंतु जेथे छळ होत नाही तेथे उत्तम ख्रिस्ती लोकसुद्धा त्यांच्या मालमत्तेत आणि त्यांच्या मालमत्तेशी खूप जोडले जाऊ शकतात. आम्ही कल्पना करू शकतो की आपण त्यांच्याशी संलग्न नाही, परंतु आपण स्वत:ला फसवित आहोत. आणि म्हणूनच, देव आमच्या देशात एक दिवस छळ होऊ देईल आणि मग आपण शुद्ध होऊ.

मी ऐकले आहे की जेव्हा कम्युनिस्टांनी रशियावर राज्य केले ख्रिश्चन लोकांना महाविद्यालयीन शिक्षण किंवा चांगल्या नोकर्‍या मिळू शकत नाहीत. त्यांना फक्त रस्त्यावर स्वच्छता यासारख्या अल्प नोकर्‍या मिळू शकल्या. अशा परिस्थितीत आपण उच्च पदावर आणि मोठ्या नोकऱ्यांमुळे मिळणार्‍या सन्मान आणि महत्त्वाच्या भावनेपासून आपण सहजपणे वेगळे होतो. सोन्यातील सर्व अशुद्धता जळून जाते आणि आपण खरोखर शुद्ध होऊ. म्हणूनच आज छळ होत असलेल्या ठिकाणी आपल्याकडे जगातील काही सर्वोत्कृष्ट ख्रिस्ती लोक आहेत. ख्रिस्ती लोकांचा छळ होऊ नये म्हणून मी कधीही प्रार्थना करत नाही कारण अशी प्रार्थना चर्चच्या शुध्दीकरणा विरूद्ध होईल. मी छळासाठी प्रार्थना करीत नाही, परंतु मी त्या विरूद्ध ही प्रार्थना करत नाही. आपल्यासाठी केव्हाही चांगले काय आहे हे परमेश्वरालाच ठाऊक आहे. म्हणून मी ते ठरवण्यासाठी त्याच्याकडे सोडतो. दोन्हीही माझ्यासाठी सारखेच आहेत. जेव्हा आपण देवाची खरी कृपा प्राप्त करतो तेव्हा ही आपली वृत्ती असेल.

पेत्र पुढे म्हणतो की या सर्व गोष्टींमुळे ख्रिस्त परत येईल तेव्हा त्याचे स्तुती, गौरव व सन्मान होईल. या परिक्षांमध्ये जरी आपण येशूला पाहत नाही तरीही आम्ही त्याच्यावर प्रेम करतो, त्याच्यावर विश्वास ठेवतो आणि मोठ्या हर्षाने आनंद करतो. पेत्राने येशूला शारीरिकदृष्ट्या पाहिले होते. पण येशू म्हणाला, “धन्य ते आहेत ज्यांनी पाहिले नाही आणि तरीही विश्वास ठेवला” (योहान २०: २९). मला माहीत नाही की तुमच्यापैकी किती जण या वचनावर विश्वास ठेवतात - ते म्हणजे ज्याने आपण येशूला शारीरिकदृष्ट्या पाहिले नाही, ते पेत्रा सारखे ज्यांनी त्याला शारीरिक दृष्ट्या पाहिले त्यापेक्षा धन्य आहेत. माझा असा मनापासून विश्वास आहे कारण येशू असे म्हणाला आहे. पेत्र पुढे म्हणत आहे की विश्वासूपणाने परीक्षांना सामोरे गेल्यामुळे, आपल्याला जीवाला तारण प्राप्त होते (१ पेत्र १:९ ). प्रेषितांनी नरकातून सुटण्यापेक्षा आपल्या जिवाच्या तारणाबद्दल अधिक सांगितले.

आपल्या जीवाला स्वार्थ आणि अभिमान आणि आदामापासून इतर अनेक वाईट गोष्टी वारशाने मिळाल्या आहेत. आपल्याला आदामाकडून मिळालेल्या सर्व वाईट गोष्टींपासून वाचवण्याची गरज आहे - जसे की भौतिक गोष्टींविषयीचे आपले प्रेम, आपले सन्मानाबद्दलचे प्रेम आणि आपली स्वार्थ केंद्रित जीवनशैली. अग्निमय परीक्षा आणि छळ आपल्याला बर्‍याच वाईट गोष्टींपासून मुक्त करण्यात मोठ्या प्रमाणात मदत करतात.

मानसिकरित्या अपंग असलेल्या मुलांच्या परिक्षेचा विचार करा. काही लोक त्यास एक मोठे दुर्दैव मानतात. आपल्यापैकी कोणीही अशी मुले असण्यासाठी प्रार्थना करणार नाही. परंतु, जर देवाने अशा एखाद्या कुटुंबात, जे त्याच्यावर प्रीति करते, अशा मुलाचा जन्म होऊ दिला तर आपण खात्री बाळगू शकतो की देव ते त्यांच्या चांगल्यासाठी करेल. इतर कुटुंबांपेक्षा अशी मुले असणाऱ्या कुटुंबांमध्ये त्यांच्या भावंडांत संवेदनशीलता, त्याग व सेवा यांचा आत्मा अधिक आहे हे माझ्या लक्षात आले आहे. बर्‍याचदा, ज्या पालकांची मुले हुशार आणि सक्षम असतात, अशांच्या अंतःकरणात नकळतपणे गर्व निर्माण होतो. गर्वाला स्वर्गात जागा नाही; त्याची जागा नरकात आहे. परंतु, दुर्दैवाने अनेक विश्वासूंच्या कुटुंबातही गर्व आढळतो.

देव आपल्या सर्व मुलांना परीक्षेमधून जाऊ देतो. त्याच्या अगम्य बुद्धीने, त्यांना परिक्षेत केव्हा पाठवायचे हे त्याला ठाऊक आहे. जेव्हा आपण परमेश्वरासमोर उभे राहू तेव्हा आपल्याला हे समजेल की देवाने आपल्यावर आलेल्या कोणत्याही परीक्षेत कधीच चूक केली नाही. त्याने आमच्या आयुष्यात ज्या प्रत्येक परीक्षेला अनुमती दिली, त्यादिवशी आम्हाला समजेल की सोन्यासारखे आमचे शुध्दीकरण करण्यासाठी होते. जर तुमचा असा विश्वास असेल तर तुम्ही सर्व प्रसंगी परमेश्वराची स्तुती कराल.