लेखक :   झॅक पुननं
WFTW Body: 

'अनुवाद' म्हणजे 'दुसरा नियम'. कारण नियमशास्त्राच्या अनेक महत्त्वाच्या बाबींची येथे पुनरावृत्ती आहे. मोशेच्या आधीच्या पुस्तकांमध्ये आधीच लिहिलेल्या अनेक गोष्टींची पुनरावृत्तीही येथे करण्यात आली आहे.

पुनरावृत्तीमुळे आपण अस्वस्थ होऊ नये. सत्याची आपल्यावर पकड बसण्यासाठी पुनरावृत्ती आवश्यक आहे. म्हणूनच देवाने त्याच्या वचनात अनेक गोष्टींची पुनरावृत्ती केली आहे

यहूदाच्या राजांच्या इतिहासाचा दोनदा उल्लेख करण्यात आला आहे- प्रथम राजेंच्या दोन पुस्तकांमध्ये आणि पुन्हा इतिहासाच्या दोन पुस्तकांमध्ये.

नवा करार केवळ एकच नव्हे तर ख्रिस्ताच्या चार चरित्रांनी का उघडतो? चार शुभवर्तमानांमध्ये भरपूर पुनरावृत्ती आहे. चार शुभवर्तमानांमध्ये काही बाबींचा चार वेळा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामागे एक अतिशय चांगले कारण असले पाहिजे.

इफिसकरांस पत्रामध्ये आधीच उल्लेख करण्यात आलेल्या अनेक गोष्टींची पुनरावृत्ती कलस्सैकरांना लिहिलेल्या पत्रात करण्यात आली आहे. यावरून आपण हे शिकू शकतो की प्रेषितांना पुनरावृत्ती करण्याची लाज वाटली नाही.

काही उपदेशक एकाच विषयावरील उपदेशाची पुनरावृत्ती करण्यास घाबरतात, ह्या भीतीने की ते लोकांसमोर आपली प्रतिष्ठा गमावून बसतील. त्या लोकांच्या गरजेपेक्षा लोक त्यांच्याबद्दल काय विचार करतात याची त्यांना जास्त काळजी वाटते.

एका गावात सात दिवसांच्या सभा घेणाऱ्या एका सुवार्तिकाबद्दल मी ऐकले जो दररोज एकच उपदेश सांगत होता: "तुमचा नव्याने जन्म झाला पाहिजे." एक परिवर्तन न झालेला मनुष्य जो सातही दिवस सर्व सभांना हजर होता त्याने त्यांना विचारले की "तुमचा नव्याने जन्म झाला पाहिजे." यावरच तुम्ही का उपदेश देता? सुवार्तिकाने उत्तर दिले, "कारण तुमचा नव्याने जन्म झाला पाहिजे." तेच उत्तर आहे. त्या मनुष्याचा नव्याने जन्म होईपर्यंत त्या संदेशाची पुनरावृत्ती करणे गरजेचे होते. याखेरीज त्याला दुसरं काही ऐकायची गरज नाही. रुग्णाला बरे होईपर्यंत तेच प्रतिजैविक (अँटीबायोटिक ) घ्यावे लागते!

आता जर तुम्ही मला विचारले की मी तुम्हांला असे सारखे का सांगत असतो, "तुम्ही पापावर विजय मिळवला पाहिजे." मला आशा आहे की याचे उत्तर तुम्हाला माहीत असेल: "कारण तुम्हांला पापावर विजय मिळवला पाहिजे."

जुन्या कराराच्या संदेष्ट्यांनी पुन्हा पुन्हा तोच संदेश दिला कारण देव काय म्हणत आहे हे इस्राएलाला स्पष्टपणे ऐकण्याची गरज होती. यिर्मयाने ४० वर्षांहून अधिक काळ अप्रत्यक्षपणे एकाच संदेशाचा प्रचार केला जोपर्यंत तोच संदेश देऊन तो जवळजवळ थकून गेला. पण अनेकदा सत्य लोकांमध्ये रुजण्यासाठी त्यांना ते दहा वेळेस ऐकणे आवश्यक असते. त्यामुळे आपण एकाच विषयावर वारंवार त्याच श्रोत्यांना उपदेश करण्याची लाज बाळगू नये. जर आपण अभिषिक्त असलो तर प्रत्येक वेळी तोच संदेश सांगताना त्यात ताजेपणा असेल.

जर आपण लोकांकडून सन्मानाची अपेक्षा धरू, तर आपण उपदेशाची पुनरावृत्ती करणार नाही. पण जर आपण त्यांचे भले करण्यास पाहू तर आपण त्यांना ते समजेपर्यंत त्याची पुनरावृत्ती करू.