लेखक :   झॅक पुननं
WFTW Body: 

इब्री लोकांस पत्र ४:१२ मध्ये आपण वाचतो. "देवाचे वचन सजीव, सक्रिय, कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असून, जीव व आत्मा, सांधे व मज्जा ह्यांना भेदून आरपार जाणारे आणि मनातील विचार व हेतू ह्यांचे परीक्षक असे आहे."

देवाचे वचन आपल्या अंतःकरणात तरवारीप्रमाणे घुसते आणि आपले विचार आणि आपले हेतू आपल्याला प्रकट करते. नव्या करारात ( ज्यावर इब्री लोकांस पत्र भर देते ) हे "अंतःकरणाचे विचार व हेतू" अत्यंत महत्त्वाचे आहे, तर जुन्या करारानुसार दुष्ट विचार व हेतू गंभीर मानले गेले नाहीत कारण इस्राएली लोकांत पवित्र आत्मा वास करत नव्हता. नियमशास्त्र, मनुष्यात दुष्ट विचार व हेतू आहेत म्हणून त्याला उघडकीस आणू शकले नाही किंवा शिक्षा देऊ शकले नाही. जोपर्यंत माणूस बाहेरून सर्व काही करत असे तोपर्यंत नियमशास्त्र त्याची प्रशंसा करे. पण नव्या करारात तसे नाही. मनुष्य नियमशास्त्राच्या अधीन होता तेव्हा देवाच्या वचनाने, रुग्णाची बाह्यतपासणी करणाऱ्या वैद्याप्रमाणे बाहेरूनच त्याची चाचणी केली. पण नव्या करारात देवाचे वचन स्कॅन किंवा एक्स-रेप्रमाणे हृदयात आरपार जाते.

देवाला आता आपले विचार, वृत्ती, हेतू आणि उद्देश यांत अधिक रस आहे. काही वेळा बाहेर सर्व काही चांगले दिसते तेव्हा आत प्रचंड दुष्टता असू शकते, जसे बाहेरून निरोगी दिसणाऱ्या पुष्कळ लोकांना आतून कर्करोगासारखे गंभीर आजार असू शकतात. त्यामुळे आज जर तुम्ही देवाचे वचन वाचले आणि तुम्हांला तुमच्या जीवनात केवळ बाह्य पापांबद्दल अपराधी वाटले तर यावरून हे सूचित होईल की देवाला जे काही सांगायचे होते ते सर्व तुम्ही ऐकले नाही. त्यामुळे नेहमी या प्रश्नाने स्वतःची परीक्षा घ्या: "देवाच्या वचनाने माझ्या अंतःकरणाचे विचार व हेतू मला प्रकट केले आहेत का?" लक्षात घ्या की इथे भर मस्तकावर नव्हे तर हृदयावर आहे. देवाच्या वचनाचा सर्व अभिषिक्त प्रचार करताना वचन तुमच्या मनाद्वारे तुमच्या अंतःकरणात प्रवेश करेल आणि तुमचे आंतरिक विचार व हेतू तुम्हांला प्रकट करेल.

१ करिंथकरांस पत्र १४:२५ मध्ये अभिषिक्त प्रचारकार्यातून येणारा परिणाम आपण वाचतो. लोकांच्या हृदयाचे विचार प्रकट होतात आणि ते नतमस्तक होतात आणि सभेत देव उपस्थित आहे हे कबूल करतात. जेव्हा तुम्ही एखाद्या देवाच्या माणसाशी बोलत असता आणि तो तुमच्याशी अभिषिक्त संदेशाचे शब्द बोलतो तेव्हा हीच गोष्ट घडू शकते. अभिषिक्त वचन नेहमीच हृदयाचे विचार व हेतू प्रकट करते कारण देवाचे वचन तीक्ष्ण दुधारी तरवारीसारखे आहे. जर तुम्हांला प्रभूची सेवा करायची असेल तर पाते तुमच्या हृदयात आणि तोंडात तीक्ष्ण आहे याची खात्री करा. तरवारीची धार कधीही बोथट करू नका आणि मानवाने स्वीकारावे यासाठी देवाचा शब्द मुलामा देऊन चतुराईने गुळगुळीत बनवू नका. यामुळे लोकांना काहीही फायदा होणार नाही, कारण तो आरपार जाणार नाही आणि जिथे जायला हवा तिथे जाणार नाही. तुम्ही बोथट सुरीने मांस कापण्याचा प्रयत्न केला आहे का? तुम्ही कापत राहाल आणि मांस कापले जाणार नाही. देवाच्या वचनाच्या तीक्ष्णतेशी तडजोड करणाऱ्या एका प्रचारकाला त्याच्या संदेशाच्या शेवटी असे सापडेल की देवाचे कोणीही ऐकले नाही.

देवाचे वचन ही दुधारी तरवार आहे. प्रचारकाने त्याला सर्वप्रथम स्वतःचे हृदय कापून स्वतःचे विचार व हेतू प्रकट करण्याची परवानगी दिली पाहिजे! तरच तो त्याचा उपयोग इतरांचे हृदय कापण्यासाठी करू शकेल. देवाचे वचन आधी तुमच्या हृदयात आरपार गेले नसेल तर त्याचा प्रचार करू नका. बहुतेक प्रचारक देवाच्या वचनाने कधीही स्वतःचा न्याय करत नाहीत. ते फक्त इतरांचाच न्याय करतात. देवाचे वचन आरपार शिरते आणि आपल्या हेतूंचाही न्याय करते. जर आपण देवाच्या वचनातील आत्म्याच्या आवाजासाठी सतत खुले असलो तर शेवटी आपल्याला पूर्णपणे शुद्ध हृदय मिळेल कारण आपल्या अंतःकरणाचे विचार व हेतू आपल्याला सतत प्रकट होतील आणि आपण स्वतःला शुद्ध करू शकू. प्रत्येक विश्वासणाऱ्या व्यक्तीने दररोज असे जगले पाहिजे. ज्याप्रमाणे अरण्यातील इस्राएली लोकांना दररोज मान्ना मिळत असे त्याचप्रमाणे आपल्यालाही त्याच्याकडून दररोज देवाचे अभिषिक्त वचन मिळाले पाहिजे