लेखक :   झॅक पुननं
WFTW Body: 

येशूने नव्या बुधल्यांत नवा द्राक्षारस घालण्याबद्दल सांगितले (लूक ५:३७). नवा द्राक्षारस म्हणजे येशूचे जीवन आणि नवीन बुधले हे येशू ने रचलेली मंडळी आहे. काना येथील लग्नात, जिथे येशू उपस्थित होता, तेथे जुना द्राक्षारस संपला (योहन २:१-३). जुना द्राक्षारस मानवी प्रयत्नांनी, अनेक वर्षांच्या कालावधीनंतर बनवला गेला होता - परंतु तो गरज पूर्ण करू शकला नाही. हा दाखला नियमशास्त्रांतर्गत असलेल्या जीवनाचे दर्शक आहे - जुना करार. जुना द्राक्षारस संपतो; आणि प्रभूला आपल्याला नवीन द्राक्षारस देण्यापूर्वी जुना द्राक्षारस संपण्याची वाट पाहावी लागते.

आपल्या वैयक्तिक जीवनात, आपल्या वैवाहिक जीवनात किंवा आपल्या सामूहिक जीवनात द्राक्षारस संपला आहे का? मग आता वेळ आली आहे की आपण प्रभूचे मुख शोधले पाहिजे आणि प्रामाणिकपणे आपली गरज मान्य केली पाहिजे. तोच फक्त आपल्याला नवा द्राक्षारस देऊ शकतो! काना येथील नवा द्राक्षारस मानवी प्रयत्नांनी तयार केला गेला नव्हता. हे देवाचे अलौकिक कार्य होते (योहन २:६-११). तसेच ते आपल्या आयुष्यातही असू शकते. तो त्याचे नियम आपल्या हृदयात आणि मनात लिहिल, ज्यामुळे आपण त्याची आपल्यासाठी असलेली परिपूर्ण इच्छा पूर्ण करु शकू (इब्री ८:१०; फिलिपै २:१३). तो आपल्या हृदयाची त्याच्यावर प्रीती करण्यासाठी सुंता करील आणि आपल्याला त्याच्या आज्ञा मध्ये चालण्यास प्रवृत्त करेल (अनुवाद ३०:६; यहेज्केल ३६:२७). काना येथे तयार झालेला नवा द्राक्षारस हे जितके त्याचे कार्य होते तितकेच हे ही त्याचे कार्य असेल. हा कृपेचा अर्थ आहे. आपण येशूचे जीवन घडवू शकत नाही - जरी आपण आयुष्यभर प्रयत्न केला तरी. पण जर आपण आपल्या शरीरात "येशूचे मरण" वाहिले (दररोज वधस्तंभ उचलणे, आपल्या अहंकाराला, आपल्या स्वइच्छेला आणि आपल्या हक्कांना आणि प्रतिष्ठेला मारणे) तर देव आपल्यात येशूच्या जीवनाचा नवा द्राक्षारस तयार करण्याचे अभिवचन देतो (२ करिंथ ४:१०).

नवा द्राक्षारस मिळवण्यासाठी आपली लढाई पापाच्या विरुद्ध आहे. पण नवे बुधले मिळवण्यासाठी आपली लढाई ज्याकडून देवाचा शब्द मोडला त्या धार्मिक परंपरांशी आहे. आणि पुष्कळांसाठी पापापासून मुक्त होण्यापेक्षा माणसांच्या परंपरापासून मुक्त होणे जास्त कठीण आहे! परंतु, फक्त हिंसा करणारे लोक देवाचे राज्य हस्तगत करून घेतील (मत्तय ११:१२). धार्मिक परंपरांना हिंसक वर्तनाशिवाय दूर करता येत नाही.

आपल्याला असे वाटेल की, ख्रिस्ती असल्यामुळे आपण जुन्या यहुदी बुधल्यापासून मुक्त झालो आहोत आणि ख्रिस्ती मंडळीमध्ये आपल्याला एक नवे बुधले आहे. पण तुम्ही तुमच्या ख्रिस्ती सभेत काळजीपूर्वक पाहिले तर त्यात अनेक जुन्या कराराची वैशिष्ट्ये पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. जरी अनेक उदाहरणे असली तरी केवळ तीन उदाहरणांचा विचार करु या.

सर्वप्रथम, याहूद्यांचा एक विशेष वंश होता (लेवी) ज्यात सर्व धार्मिक कामे करणारे याजक होते. सर्वच यहुदी याजक असू शकत नव्हते. तथापि नवीन करारा अंतर्गत, सर्व विश्वासणारे याजक आहेत (१ पेत्र २:५; प्रकटीकरण १:६). जरी बरेचसे विश्वासणारे लोक हे सत्य तत्वतः धारण करतात, तरी प्रत्यक्षात ते फारच कमी लोक पाळतात. ख्रिस्ती लोकांच्या जवळजवळ प्रत्येक गटाकडे त्यांचे 'याजक' किंवा 'पाळक' किंवा 'देवाचा सेवक' किंवा 'पूर्णवेळ काम करणारे कामकरी' असतात जे अगदी जुन्या लेवी वंशा सारखे देवाच्या लोकांच्या उपासनेचे नेतृत्व करतात. फक्त हे 'लेवीं' नवीन धर्मांतरितांना बाप्तिस्मा देऊ शकतात आणि भाकर मोडू शकतात. आणि या 'लेवीं' ना देवाच्या लोकांच्या दशांशाचा आधार असतो. सभांमध्ये 'ख्रिस्ताच्या शरीराला' कोणतीही संधी मिळू न देता या 'लेवीं'चे सभेवर वर्चस्व असते. एक वक्ता कार्यक्रम हा जुन्या बुधल्याचा एक भाग आहे. नवीन करारांतर्गत, प्रत्येक विश्वासणारा नवा द्राक्षारस पिऊ शकतो, पवित्र आत्म्याने अभिषिक्त होऊ शकतो व त्यालाआत्म्याचे कृपादाने असू शकतात. दोन किंवा तीन संदेष्टे सभा सुरू करु शकतात, एक किंवा दोन जण अन्य भाषेमध्ये बोलू शकतात (प्रत्येकाच्या अर्थासहित) आणि प्रत्येक विश्वासणारा सभेत संदेश देण्यासाठी आणि मंडळी तयार करण्यास मोकळा आहे. हे नवे बुधले आहे (१ करिंथ १४:२६-३१). नव्या द्राक्षारसाचे वर्णन १ करिंथ १३ मध्ये केले आहे - प्रीतिमय जीवन. नवीन बुधल्याचे वर्णन १ करिंथ १२ आणि १४ मध्ये केले आहे. पण किती विश्वसणार्‍या लोकांना देवाच्या मार्गाने काम करायचे आहे? अरेरे, फारच कमी. बरेचसे जण त्यांच्या जुन्या बुधल्या सोबत आणि त्यांच्या पगारी 'लेवीं' सोबतच समाधानी असतात.

दुसरे म्हणजे, यहुद्यांना संदेष्टे होते जे विविध बाबतीत देवाची इच्छा ओळखायचे - कारण फक्त संदेष्ट्यांनाच आत्मा होता. परंतु नवीन करारांतर्गत, संदेष्ट्यांचे कार्य अगदी वेगळे आहे - ख्रिस्ताचे शरीर तयार करणे (इफिस ४:११,१२). सर्व विश्वसणार्‍याना आता पवित्र आत्मा मिळू शकतो, त्यामुळे त्यांना त्यांच्यासाठीअसलेली देवाची इच्छा शोधण्यासाठी कोणा संदेष्ट्याकडे जाण्याची गरज नाही (इब्री ८:११; १ योहान २:२७). तरीही बरेचसेजण अजुनही जुन्या बुधल्या राहतात म्हणजे त्यांनी काय करावे, कोणाशी लग्न करावे इत्यादी गोष्टी शोधण्यासाठी ते देवाच्या एखाद्या माणसाकडे जातात.

तिसरे म्हणजे, यहुदी लोकांचा एक मोठा समुदाय होता जो विस्तृत भागात विखुरलेला होता परंतु येरुशलेम मध्ये त्यांचे मध्यवर्ती मुख्यालय होते आणि त्यांचा पुढारी म्हणून ऐहिक मुख्य याजक होता. नवीन करारांतर्गत, येशू एकमात्र आपला प्रमुख याजक आहे आणि आपल्याकडे एकमेव मुख्यालय आहे ते म्हणजे देवाचे राजासन. यहुद्यांचा दीपवृक्ष होता आणि त्याच्या मधल्या खोडातून सात शाखा बाहेर काढल्या होत्या (निर्गम २५:३१,३२). हे जुने बुधले होते.

नवीन करारांतर्गत, प्रत्येक स्थानिक मंडळी एक स्वतंत्र समई आहे - ज्याला शाखा नाहीत. तुम्ही हे स्पष्टपणे प्रकटी १:१२,२० मध्ये पाहू शकता, जिथे आशिया मायनरमधील सात स्थानिक मंडळींचे प्रतिनिधित्व सात स्वतंत्र समया द्वारे केले आहे - यहुदी दीपवृक्षा पेक्षा निराळे. मंडळीचे मस्तक या नात्याने येशू त्या समयामधून फिरतो. त्या काळी जगामध्ये कोणत्याही संप्रदायाचे पृथ्वीवर धर्मगुरू किंवा वरिष्ठ अधीक्षक किंवा अध्यक्ष नव्हते. पृथ्वीवर कोणताही मुख्य वडील बंधू नव्हता, जो कोणत्याही बाबतीत शेवटचा आवाज असेल असा. प्रत्येक स्थानिक मंडळी स्थानिक वडिलांनी चालवलेली होती. हे वडील थेट परमेश्वराला प्रमुख म्हणून जबाबदार होते. परंतु आज आपण आपल्या सभोवताली अनेक ख्रिस्ती पाहतो जे सांप्रदायिक व्यवस्थेत आहेत (जुन्या बुधल्यात), मग त्याला नाव असो किंवा नसो - कारण काही गट आहेत जे कोणताही सांप्रदायिक नसल्याचा दावा करतात परंतु तरीही त्यांच्याकडे सांप्रदायिक सर्व वैशिष्ट्ये आहेत. हे सर्व जुने बुधलेच आहेत.

भ्रष्टाचाराचा प्रसार रोखण्यासाठी देवाने स्थानिक मंडळींचे नवे बुधले नियुक्त केले आहे. आशिया मायनरमधील सात मंडळ्या एकमेकांच्या शाखा असत्या, तर बालाम आणि निकलाइतांचे भ्रष्ट शिक्षण आणि इजबेलचे खोटे संदेश या सातही मंडळ्यात पसरले असते (प्रकटी २:१४;१५,२०). पण ते सर्व स्वतंत्र समया असल्यामुळे स्मुर्णा आणि फिलदेल्फिया येथील दोन मंडळ्या स्वत:ला शुद्ध ठेवू शकल्या. म्हणून, जर तुम्हाला तुमची सभा शुद्ध ठेवायची असेल तर संप्रदायवादाच्या जुन्या बुधल्यापासून सुटका करून घ्या. देव करो आणि आपल्या देशात असे अनेकजण होवो जे मानवी परंपरांशी हिंसा करायला तयार असतील (मत्तय ११:१२) ज्याने पुष्कळांना बंधनात टाकले आहे; व ते प्रत्येक परिसरात ख्रिस्ताचे शरीर तयार करतील.