लेखक :   झॅक पुननं श्रेणी :   मंदिर
WFTW Body: 

हेज्केल 36:25-37 मध्ये नवीन कराराच्या जीवनाविषयी सुंदर भविष्यवाणी आहे. देवाला हवे असणारे ख्रिस्ती जीवन कसे असावे ह्याचे वर्णन यात आहे. सर्वप्रथम आपल्याला शुद्ध करण्याचे त्याने वचन दिले. आपल्या अंतःकरणातून सर्व मूर्ती काढण्याचे, पाषाणमय हृदय काढण्याचे व त्याठिकाणी मांसमय हृदय देण्याचे आणि त्यानंतर त्याचा पवित्र आत्मा देण्याचे आणि त्याच्या नियमांनी चालण्याचे आणि त्याच्या आज्ञा पाळण्याचे व सर्व मलीनतेपासून वाचविण्याचे त्याने वचन दिले (यहेज्केल 36:25-29). परंतु हे तेव्हाच घडेल जेव्हा आपण देवाजवळ प्रार्थना करू आणि ह्या सर्व गोष्टी करण्यास त्याला विनवणी करू (यहेज्केल 36:37). अशाप्रकारचे जीवन जर आपण मागितले नाही तर ते आपल्याला मिळणार नाही. या गौरवयुक्त जीवनात जेव्हा आपण येऊ तेव्हा भूतकाळातील जीवन आठवून ‘‘आपला आपल्यालाच वीट वाटेल’’ (यहेज्केल 36:31). आत्म्याने भरलेल्या व्यक्तीचे हे प्रमुख चिन्ह आहे की त्याला त्याच्या देहात पाहिलेल्या पापांचा वीट वाटेल ‘‘किती मी कष्टी माणूस! त्या पापी लोकांपैकी मी मुख्य आहे’’ (रोम 7; तीमथ्य 1:15). आत्म्याने भरलेली व्यक्ती इतरांमधील पापे बघण्यापूर्वी स्वतःमधील पापे बघत आणि त्याबद्दल तिला स्वतःचा वीट येतो. जेवढे आपण देवाजवळ जाऊ तेवढीच आपल्या पापांबद्दल आपल्याला जाणीव होईल.

देवाने यहेज्केलाला शुष्क अस्थिच्या खोर्‍यात नेले व त्याला अस्थिंविषयी संदेश देण्यास सांगितले (यहेज्केल 37). देवाचे वचन त्यांच्यापर्यंत गेले तेव्हा अस्थींना अस्थी लागून जडल्या, त्यांवर स्नायु आले, मांस चढले, त्वचेने त्यांस आच्छादिले. परंतु त्यांना देवाच्या वचनापेक्षाही आणखी काही गरजेचे होते - त्यांना पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याची गरज होती, ज्याप्रकारे आपण उत्पत्ती 1 मध्ये बघतो. तेथे आपण देवाचे वचन आणि पवित्र आत्मा मिळून एकत्र कार्य करताना बघतो ज्याद्वारे मरणातून जीवन आले. याठिकाणीसुद्धा हेच साम्य आहे आणि आजही हीच साम्यता आहे. जेव्हा पवित्र आत्मा ह्या मृत शरींरावर आला तेव्हा ते उठून उभे राहिले व ते सजीव होऊन देवाकरिता मोठे सामर्थ्यशाली सैन्य बनले. आजच्या मंडळीत देव अशाप्रकारचे चित्र बघू इच्छितो. अधिकतर ख्रिस्ती सुरुवातीला अगदी त्या शुष्क अस्थिंसारखे असतात - कडक आणि मृत, त्यांना त्यांच्या सिद्धांतामध्ये दुरूस्ती करण्याची गरज असते. जेव्हा ते देवाच्या वचनाला प्रतिसाद देतात तेव्हा ते ख्रिस्ती म्हणून एकत्र येण्यास सुरुवात करतात (अस्थींना अस्थी लागून जडल्या), आणि ते चांगले जीवन जगण्यास सुरुवात करतात (जेव्हा अस्थींवर मांस चढते तेव्हा त्यांची काही प्रमाणात सुंदरता वाढते), परंतु, ह्या ख्रिस्ती लोकांना जर देवासाठी सामर्थ्यशाली सैन्य बनायचे आहे तर त्यांना आणखी एका गोष्टीची गरज आहे. देवाच्या पवित्र आत्म्याच्या अलौकीक सामर्थ्याची त्यांना गरज आहे.

याठिकाणी नवीन कराराच्या जीवनाचे आणि यहेज्केल 40-48 मधील मंडळीचे सुद्धा चित्र आहे. हे मंदिर म्हणून चित्रीत केले आहे. आपले शरीर हे पवित्र आत्म्याचे मंदिर आहे (1 करिंथ 6:19) आणि मंडळी ही देवाचे मंदिर आहे (1 करिंथ 3:16). यहेज्केल 43 मध्ये आपण देवाच्या गौरवाविषयी वाचतो की ते गौरव तिथून निघून नवीन मंदिरात गेले - नवीन कराराच्या मंडळीत म्हणजेच पेन्टेकॉस्टच्या दिवसापासून स्थापलेल्या मंडळीत. देव चर्चला किंवा मंडळीला ‘‘माझ्या सिंहासनाचे स्थळ’ संबोधतो (यहेज्केल 43:7). ह्या नवीन कराराच्या मंडळीचा नियम पुढीलप्रमाणे सांगितलेला आहे - ‘तिचे संपूर्ण क्षेत्र परमपवित्र असेल’ (यहेज्केल 43:12). जुन्या कराराच्या मंदिरामध्ये शेवटल्या लहान खोलीलाच ‘परमपवित्र’ केल्या गेले होते ज्याठिकाणी देव वास करीत असे. परंतु, नवीन कराराच्या मंडळीत संपूर्ण मंडळी म्हणजे संपूर्ण चर्च ‘परमपवित्र’ ठिकाण आहे. आज देवाचे मंदिर बांधायचे असल्यास हा प्रमुख उद्देश आपण लक्षात ठेवावा - या मंडळीतील प्रत्येक सदस्य पवित्र असावा. यात कुठल्याही प्रकारचे पाप कोणत्याही प्रकारे सहन केल्या जाऊ नये.

मंदिरामध्ये दोन प्रकारच्या सेवकांविषयी प्रभुने सांगितले आहे - सादोकचे वंश व लेवीचे वंश (यहेज्केल 44:9-19). सादोकचे पत्रु खिस्र्ताच्या हृदयाजवळील शिष्यांचे दर्शक आहे ज्यांना त्याची सेवा करण्याची परवानगी देण्यात आली. लेवीचे वंशज अशा सेवकांचे चिन्ह आहेत ज्यांना लोकांची सेवा करण्याची परवानगी देण्यात आली. ते तडजोड करणारे होते. या दोन सेवकांमध्ये फार मोठी भिन्नता आहे. येशूने मूळतः लोकांची सेवा केली नाही. त्याची सेवा केवळ पित्याची सेवा होती. तो तरी लोकांची सेवा करीत असे तरी ती पित्याचीच सेवा होती आणि आपण देखील अशाच प्रकारे देवाची सेवा करावी. ज्यावेळेस आपण लोकांची सेवा करण्यास सुरुवात करतो त्यावेळेस तडजोड करण्याचा व लोकांना खुश करण्याचा मोह आपल्याला होऊ शकतो. अशा पवित्र मंदिरापासून (म्हणजेच पवित्र आत्म्याने भरलेल्या मंडळीपासून) झरा उगम पावतो व पुढे तो दुभागत जाऊन अनेक नद्यांमध्ये परिवर्तित होतो (यहेज्केल 47). येशूने योहान 7:37-39 वचनामध्ये जिवंत पाण्याच्या नद्यांविषयी सांगितले आहे. त्यात सांगितले आहे की पवित्र आत्म्याने भरलेल्या व्यक्तीमधून जिवंत पाण्याच्या नद्या वाहतात. पेन्टेकॉस्टच्या दिवशी या नद्या वाहण्यास सुरुवात झाली. तेव्हापासून आजवर देवाच्या लोकांमधून त्या वाहतच आहेत. हे जीवन लहानशा झर्‍यापासून सुरू होते व त्याचे रूपांतर मोठ्या व अनेक नद्यांमध्ये होत.

पवित्र आत्म्याने भरून जगण्याच्या जीवनाची थोडीशी चव देवाने यहेज्केलाला दिली (यहेज्केल 47:3-6). देवाने यहेज्केलाला टप्याटप्याने या नदीचा अनुभव घडविला. या नदीतून एक हजार हात अंतर चालल्यावर यहेज्केलाच्या घोट्यापर्यंत पाणी पोहंचले. पुढील एक हजार हात चालल्यावर त्याच्या गुडघ्यापर्यंत पाणी पोहंचले. आणखी एक हजार हात चालल्यावर त्याच्या कमरेपर्यंत पाणी पोहंचले. आणखी एक हजार हात आत गेल्यावर त्याच्याने नदीतून चालवेना कारण पाणी फार झाले. त्याचे पाय जमीनीला टेकले नाही. नदीच्या प्रवाहाने त्याला वाहून नेले. आपण देखील देवासोबत यहेज्केलाप्रमाणे पुढे आणि पुढे जाऊ शकतो. कदाचित काही लोक एखाद्या ठिकाणी थांबतील. देव आपल्याला पुढे चालण्यास जबरदस्ती करीत नाही. अलीशा एलीयाच्या मागे गेला (2 राजे 2). तो अलीशाला पारखत होता. तो बघत होता की त्याला भूक लागली आहे की जे त्याच्याकडे आहे त्यात तो तृप्त आहे. देवाकडून उत्तम ते मिळेपर्यंत अलीशा तृप्त नसल्यामुळे त्याला त्याच्या जीवनावर दुप्पट अभिषेक प्राप्त झाला. याठिकाणी आपण बघतो की यहेज्केलाची देखील अशीच पारख झाली. तो देखील नदीमध्ये पुढे आणि पुढे चालत गेला आणि शेवटी पाण्यावर तरंगू लागला. तुमच्या जीवनामध्ये पवित्र आत्म्याचे कार्य होत असता तुम्हाला देखील असाच अनुभव घडेल. देवाकडून उत्तम मिळूस्तोवर तुम्ही एखाद्या ठिकाणी थांबावे असे तुम्हाला वाटणार नाही. याठिकाणी एक गोष्ट बघा की यहेज्केलाच्या घोट्यापर्यंत, मग गुडघ्यापर्यंत आणि मग कमरेपर्यंत पाणी पोहंचूस्तर त्याचे पाय जमीनीला टेकले होते; परंतु, त्यानंतर त्याचे पाय जमीनीवर स्थिर राहू शकले नाही. हीच स्थिती आल्यावरच आपण समजू शकतो की आपण पवित्र आत्म्याने खरोखर भरले आहोत. या स्थितीमध्ये आपला जगाशी संबंध तुटतो. आपली ओढ जगाकडे राहत नाही. भौतीक गोष्टींपासून आपण विभक्त होतो. आपल्याला पवित्र आत्मा चालवत असतो. पवित्र आत्मा आपल्याला आपल्या मर्जीप्रमाणे चालवीत नाही तर देवाच्या इच्छेप्रमाणे चालविता. यहेज्केलाच्या पुस्तकाच्या शेवटच्या वचनात म्हणजे यहेज्केल 48:35 मध्ये नवीन कराराच्या मंडळीचे नाव सांगितले आहे - ‘‘याव्हे-शाम्मा’’ आहे, म्हणजेच तेथे परमेश्वर आहे. अशाचप्रकारची मंडळी उभारण्यास आपल्याला सांगितले आहे - ज्याठिकाणी लोकांना कळेल की देव त्याच्या गौरवानिशी तिथे उपस्थित आहे. परंतु, अशी मंडळी उभारण्याकरिता देवाला यहेज्केलासारखे लोक हवे आहेत जे पूर्णपणे त्याच्या आज्ञेप्रमाणे वागतील.