लेखक :   झॅक पुननं
WFTW Body: 

लूक पवित्र आत्म्याच्या सेवेविषयी त्याने लिहिलेल्या दोन पुस्तकांत बरेच काही सांगतो. खरं तर, त्याचा मुख्य भर यावरच आहे. या शुभवर्तमानातील ही उदाहरणे पहा:

बाप्तिस्मा करणारा योहान आपल्या मातेच्या उदरापासूनच पवित्र आत्म्याने परिपूर्ण असेल (लूक १:१५). पवित्र आत्मा मरियेवर येईल (लूक १:३५). अलीशिबा व जखऱ्या पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले (लूक १:४१, ६७). शिमोनावर पवित्र आत्मा होता, पवित्र आत्म्याने त्याला प्रकट केले व त्याला मंदिरात आणले (लूक २: २५-२७). येशू पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा करील (लूक ३: १६). येशू बाप्तिस्मा घेताना प्रार्थना करत होता (अर्थातच पवित्र आत्म्याच्या अभिषेकासाठी) पवित्र आत्मा त्याच्यावर ताबडतोब आला (लूक ३:२१, २२). येशू आत्म्याने परिपूर्ण असता आत्म्याने त्याला रानात नेले आणि तो आत्म्याच्या सामर्थ्यात परत आला (लूक ४: १, १४). येशूने घोषित केले की पवित्र आत्मा त्याच्यावर होता (लूक ४:१८). जे पवित्र आत्मा मागतात त्यांना तो दिला जातो (लूक ११:१३). येशू आपल्या शिष्यांना पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यासाठी थांबण्याची आज्ञा देतो (लूक २४:४९).

प्रेषितांची कृत्ये मध्ये लूक पवित्र आत्म्याचा उल्लेख ५० पेक्षा जास्त वेळा करतो. लूक निःसंशयपणे आत्म्याने भरलेला मनुष्य होता आणि पवित्र आत्म्याच्या देणगीद्वारे शक्य झालेल्या या नव्या कराराच्या जीवनाबद्दल उत्सुक होता. मला विस्मय वाटतो की तो जसा उत्साहित होता तसे किती ख्रिस्ती उत्साहित आहेत. नवीन कराराच्या पहिल्या पाचही पुस्तकांच्या सुरूवातीस पवित्र आत्म्यामधील बाप्तिस्म्याचा उल्लेख आहे. हे आपल्याला या नव्या कराराच्या युगातील पवित्र आत्म्याच्या सेवेच्या प्रचंड महत्वाबद्दल शिकवते. म्हणूनच, जर अशी एक गोष्ट आहे ज्यामध्ये सैतान बनावट करण्याचा प्रयत्न करेल तर ते म्हणजे पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा घेणे; आणि आपल्याकडे आज अशी बरीच बनावट दिसत आहे.

विश्वासणारे पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा घेणार नाही यासाठी सैतान त्यांची खात्री कशी करून देतो? सर्व प्रथम, त्यापैकी काहींना शारीरिक किंवा भावनिक अनुभव देऊन. पापावर विजय मिळविण्याची आणि परमेश्वराची सेवा करण्याची शक्ती त्यांच्यात नाही. परंतु सैतान त्यांना हमी देतो की त्यांनी पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा घेतला आहे. असे विश्वासणारे पुन्हा पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा घेण्याचा प्रयत्न करणार नाहीत कारण त्यांना खात्री आहे की त्यांना तो आधीच मिळाला आहे. असे कोट्यावधी ख्रिस्ती सर्वत्र आहेत. ते पापाने पराभूत झाले आहेत, त्यांचे पैशावर प्रेम आहे आणि ते जगासाठी जगतात. परंतु ते लबाडीने काहीबाही बोलतात ज्यांना ते "अन्य भाषा" म्हणतात आणि असामान्य शारीरिक आणि दृश्यमान अनुभव घेत असल्याचा दावा करतात. दुसरे म्हणजे, सैतान काही इतर विश्वासणाऱ्यांना (जे आत्म्याच्या बाप्तिस्म्यासंबंधीच्या सिध्दांतासंबंधी विरुद्ध ध्रुवावर आहेत) या स्पष्ट बनावटांविरुद्ध प्रतिक्रिया देण्यास आणि आत्म्याच्या बाप्तिस्म्यापासून पूर्णपणे दूर राहण्यास लावतो. अशा प्रकारे तो हे सुनिश्चित करण्यात यशस्वी झाला की दोन्ही विश्वासू लोकांना (आणि यात बहुतेक विश्वासणारे येतात) देवाचे खरेखुरे सामर्थ्य मिळणार नाही आणि ते पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा घेणार नाहीत. सावधगिरी बाळगा आणि हे दोन्ही गट टाळा.

योहान आपल्या आईच्या गर्भातच पवित्र आत्म्याने कसा भरला होता? त्याने गर्भाच्या रूपात त्याच्या आईच्या उदरात आत्म्याची प्रतीक्षा केली का? एखाद्याने त्याला गर्भाशयातच प्रार्थना करण्यास बोध केला का? नाही. देवाने त्याला भरले. पवित्र आत्म्याने तुम्हाला भरण्याचे काम हे देवाचे कार्य आहे. जर आपण त्याच्या अधीन राहिलो तर तो आपल्याला पवित्र आत्म्याने भरेल. आपल्या विश्वासाला उत्तेजन देणारी अशी एक गोष्ट इथे आहे: जर देव आईच्या उदरातील असहाय्य गर्भ पवित्र आत्म्याने भरू शकतो तर तो आपल्याला का भरू शकत नाही? कोणत्याही हलक्या बनावट गोष्टीबद्दल समाधानी असू नका. मी जेव्हा तरुण होतो तेव्हा मी परमेश्वराला सांगितले की मी बनावट अनुभवाने कधीही समाधानी होणार नाही आणि खरा अनुभव मिळविण्यासाठी आवश्यक असल्यास दहा वर्षे थांबण्यास तयार आहे. हे प्रतीक्षा करण्याच्या योग्यतेचे होते. जेव्हा आपण आत्म्याने खरोखर बाप्तिस्मा घेता तेव्हा तो आपल्या संपूर्ण जीवनामध्ये बदल करेल. जेव्हा योहान पवित्र आत्म्याने भरला, तेव्हा तो प्रभुच्या दृष्टीने महान झाला (लूक १:१५). हेच आत्मा आपल्याला देखील बनवू इच्छितो - मनुष्याच्या दृष्टीने नव्हे तर देवाच्या दृष्टीने महान.