येशूने शिकवले की पवित्र आत्मा आपल्या अंतरातम्यातून वाहू लागण्याचा पहिला टप्पा म्हणजे पश्चात्ताप करणे, म्हणजेच मागे फिरणे (मत्तय ४:१७). फक्त पृथ्वीवरील भौतिक गोष्टीचा शोध घेणे थांबवणं नाही, तर पापापासून पूर्णपणे मागे फिरणे सर्वात महत्त्वाचे आहे.
आपण पवित्र आत्मा प्राप्त करण्यापूर्वी पापावर विजय मिळवावा असे नाही. उलट पवित्र आत्मा आपल्यात येतो , तेव्हा तो आपल्याला पापावर विजय मिळवण्यासाठी मदत करतो. आपण रथाला घोड्यांच्या समोर लावत नाही तर घोडे रथाच्या समोर असतात.
मी पाप सोडून देऊन नंतर नाही म्हणू शकत , “ प्रभू मला पवित्र आत्मा दे , त्याऐवजी मी म्हणतो, प्रभू पापांवर मात करण्यासाठी मला पवित्र आत्म्याची आवश्यकता आहे” . पण मी माझ्या मनात पापांपासून वळू शकतो; याचा अर्थ माझी वृत्ती अशी आहे की मी खरोखरच सर्व पाप सोडण्याची इच्छा करतो हेच देवाला तुमच्याकडून हवे आहे . आपल्या जीवनात देवाचा अनादर करणाऱ्या प्रत्येक गोष्टीपासून पूर्णपणे वळण्याची तुमची वृत्ती आहे का ? कदाचित पापांवर मात करण्यासाठी तुम्हाला काही वर्षे लागतील. काही हरकत नाही . परंतु आपली वृत्ती नेहमी पश्चात्तापाची असली पाहिजे की तुम्ही तुमच्या जुन्या जीवनाला पाठ दाखवून मागे फिराल .पश्चात्ताप आणि ख्रिस्तावरील विश्वास हाच ख्रिस्ती जीवनाच्या शर्यतीचा प्रारंभबिंदू आहे. इब्री करास पत्र १२:१-२ मध्ये सांगितले आहे की ख्रिस्ती जीवन हे एक शर्यती सारखे आहे , मी त्याची सुरवात तेव्हाच करू शकतो जेव्हा मी पश्चाताप करेल . पश्चाताप करणे आणि पापांपासून मागे फिरणे या संदर्भातील संदेशांची ख्रिस्ती जगात आज फार कमतरता आहे.
आजच्या काळात पश्चात्तापावर आधारित संदेश तुम्ही किती ऐकले आहेत ? किती गाणे तुम्ही पश्चातापा बद्दल ऐकले आहेत ? एखादे गाण्यांचे पुस्तक बघा त्यात तुम्हाला किती गाणे पश्चातापा बद्दल असलेले तुम्हाला मिळतात ? क्वचित एखादे .विश्वासा बद्दलचे अनेक गाणे तुम्हाला मिळतील . उदाहरणार्थ , एक सुप्रसिद्ध गाणे आहे – परमेश्वराला महिमा असो, महान काम त्याने केले आहेत . त्या गाण्यातील एक ओळ अशी आहे की- सर्वात वाईट गुन्हेगार जेव्हा खरोखर विश्वास ठेवतो , त्याक्षणी त्याला येशू कडून क्षमा मिळते. मी ह्याच्याशी असहमत आहे. समजा एक वाईट पापी व्यक्ती , ज्याला सुसमाचारा बद्दल काहीच माहीत नाही , एका सभेला येतो , आणि तो हे गाणे ऐकतो तेव्हा तो गुन्हेगार म्हणतो हो मी सर्वात वाईट पापी व्यक्ती आहे , तो हे मान्य करतो आणि म्हणतो , मला तर फक्त येशूवर विश्वास ठेवायचा आहे , मला इतकेच करायचे आहे .तो म्हणतो , हो मी त्याच्यावर विश्वास ठेवतो , तो परमेश्वरचा पुत्र आहे , तो माझ्या पापांसाठी मरण पावला. काय त्याचा पापांची क्षमा झाली आहे का? नाही , जर त्याने पश्चाताप केला नाही तर त्याच्या पापांची क्षमा झाली नाही . एक वाईट व्यक्ती जो पश्चाताप करतो आणी विश्वास ठेवतो , त्याच्या पापांची क्षमा झालेली आहे. बरेच जन म्हणतील , खऱ्या विश्वासाचा तोच अर्थ आहे. पण ते एक धर्मशास्त्रीय स्पष्टीकरण आहे. एखादा आपरिवर्तित , देवहीन पापी व्यक्तीला ज्याला ह्या बद्दल काहीही माहीत नाही, त्याला सांगण्याची गरज आहे की त्याने पश्चाताप करणे गरजेचे आहे. प्रेषित पेत्रा ने पेंटेकॉस्टच्या दिवशी सर्वांना पश्चाताप बद्दल निक्षून सांगितले. आणी पौला ने देखील त्याबद्दलच सगळीकडे प्रचार केला. त्याने दोन गोष्टींचा प्रचार केला,पश्चाताप करून देवाकडे वळणे व आपल्या प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणे. (प्रेषितांची कृत्ये – २० :२१)
देवाकडे पश्चात्ताप करा , समृद्धी आणि आरोग्यासाठी नाही. पश्चात्ताप म्हणजे आजारपणापासून बरे होणे नाही. पश्चात्तापामुळे मी गरिबीपासून समृद्धीकडे वळत नाही. ! ती एक खोटी सुवार्ता आहे जीचा प्रचार केला जातो . येथे असे म्हंटले आहे की, मी माझ्या जीवनात देवाच्या विरुद्ध असलेल्या सर्व गोष्टींसाठी देवाकडे पश्चात्ताप करतो आणि आपल्या प्रभु येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो. पौल थेस्सलनीकाकरांना लिहित असतानाही हेच म्हणतो. तो त्यांना सांगतो की देवाचे वचन त्यांच्याकडे आले आणि ते देवाकडे वळले, जिवंत देवाची सेवा करण्यासाठी मूर्तींपासून दूर गेले" (१ थेस्सलनीकाकर पत्र १:८-९).
मूर्ती म्हणजे काय? मूर्ती म्हणजे तुमच्या हृदयात देवाचे स्थान घेणारी कोणतीही गोष्ट. ती तुमचे आरोग्य, तुमची संपत्ती, तुमची नोकरी, तुमचे घर, तुमची गाडी, तुमची पत्नी किंवा तुमची मुले असू शकतात . ती तुमच्या हृदयात देवाचे स्थान घेणारी कोणतीही गोष्ट असू शकते. जसे इसहाकाने अब्राहामाच्या हृदयात देवाचे स्थान घेतले आणि देवाने अब्राहामाला ती मूर्तिपूजा सोडून देण्यास सांगितले . मूर्तींपासून आणि देवाला तुमच्या हृदयात प्रथम आणि सर्वोच्च असण्यापासून रोखणाऱ्या प्रत्येक गोष्टीपासून देवाकडे वळणे – तोच खरा पश्चात्ताप. याचा अर्थ हा आहे की , पहिल्याने देवाचे राज्य आणि त्याचे नीतिमत्त्व मिळवण्यास, अशा प्रकारे झटणे की आपल्या सर्व ऐहिक गरजा आपल्याला त्याच्या बरोबर आपोआप मिळतील (मत्तय ६:३३). जर तुम्ही प्रथम देवाचे राज्य शोधाल तर तुम्ही खात्री बाळगू शकता की तुम्हाला कधीही ऐहिक गोष्टींची कमतरता भासणार नाही - जरी तुम्ही कधीही करोडपती झाला नाही तरी तुमच्या ऐहिक गरजा तो भागविल . त्याबद्दल देवाचे आभार माना.
प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीने असेच जगले पाहिजे. आज जेव्हा ख्रिस्ती लोकाना भौतिक समृद्धी आणि आरोग्य हे देवाच्या आशीर्वादाचे लक्षण आहेत असे वाटते ,तेव्हा ही खूप दुःखद गोष्ट आहे. हे खरे असू शकत नाही कारण असे बरेच अविश्वासणारे आहेत ज्यांच्याकडे विश्वासणार या लोकांपेक्षा खूप जास्त भौतिक समृद्धी आणि शारीरिक आरोग्य आहे. हे स्वतःच सिद्ध करते की ही सुवार्ता नाही. शिवाय, त्यांना खऱ्या शिष्यासारखी पापापासून मुक्तता नाही.
येशूने प्रथम जो संदेश घोषित केला आणि आपण तो घोषित करत राहणे आवश्यक आहे तो म्हणजे पश्चात्ताप करा . जेव्हा येशू म्हणाला, "मी जे काही शिकवले आहे ते सर्व त्यांना करायला शिकवा," . त्याने काय शिकवले? सर्वात प्रथम म्हणजे पापापासून मागे फिरणे, देवाकडे वळणे आणि स्वर्गाच्या राज्यासाठी तुमचे हृदय उघडणे जेणेकरून तुमचे मन आता वरील गोष्टींवर, देवाच्या गोष्टींवर - पवित्र आत्म्यामध्ये नीतिमत्ता, शांती आणि आनंदावर केंद्रित होईल.