लेखक :   झॅक पुननं
WFTW Body: 

प्रकटीकरण ३:१४-२२ मध्ये, प्रभुने लावदिकीया येथील मंडळीला लिहिण्यास सांगितले:जो आमेन, जो विश्वसनीय व खरा साक्षी, जो देवाच्या सृष्टीचे आदिकरण तो असे म्हणतो: "मला तुझी कृत्ये ठाऊक आहेत, की तू शीत नाहीस व उष्ण नाहीस. तू शीत किंवा उष्ण असतास तर बरे होते. पण तू तसा नाहीस, कोमट आहेस ;म्हणजे उष्ण नाहीस, शीत नाहीस म्हणून मी तुला आपल्या तोंडातून ओकून टाकणार आहे."

येथे एक मंडळी आहे जी देवासाठी पेटून उठलेली नव्हती. ती फक्त "कोमट " (प्रकटीकरण ३:१६) होती. ती तिच्या शिकवणीत अगदी अचूक होती - पण ती अचूक असूनही मृत होती! ती नैतिकदृष्ट्या आदरणीय आणि आध्यात्मिकरित्या मृत होती!

परमेश्वराची इच्छा आहे की आपली अंतःकरणे सदैव पेटलेली असावीत - त्याच्याबद्दल आणि इतर विश्वासणाऱ्यांसाठी उत्कट प्रीतीची ती ज्योत पेटत राहावी. "वेदीवर अग्नी सतत जळत ठेवावा; तो विझू देऊ नये", हा जुन्या कराराचा नियम होता. (लेवी. ६:१३). येशूच्या खर्‍या शिष्याच्या सामान्य स्थितीची देव कशी अपेक्षा करतो हे आम्ही येथे प्रतिकात्मकपणे पाहतो. यापेक्षा काहीही कमी असलेले दर्जाहीन आहे. परमेश्वराच्या अग्निने झुडुप ज्वालाग्राही झाले तेव्हा तेथे कोणतेही कीटक किंवा जीवजंतु जगू शकले नाहीत. आणि जेव्हा आपली अंतःकरणे आत्म्याने प्रज्वलित होतात, तेव्हा तेथे कोणतीही अप्रिय मनोवृत्ती टिकू शकत नाही.

हा एक मार्ग आहे ज्याद्वारे आपण गरम, थंड किंवा कोमट आहोत याची चाचणी घेऊ शकतो: "गरम" असणे म्हणजे इतरांवर उत्कट प्रेम करणे. "शीत" असणे कटुता आणि इतरांना क्षमा न करणे आहे. “कोमट” असणे म्हणजे दुसर्‍यांबद्दल कटुता नसणे व प्रेमही नसणे होय. जेव्हा एखादा विश्वासणारा म्हणेल की “माझ्या मनात कोणाविरूद्ध काही नाही”, तर तो कोमट आहे. असे येशू म्हणाला का ,"जेव्हा तुमच्या अंत:करणात एकमेकांबद्दल काही नसेल तर तुम्ही माझे शिष्य आहात हे सर्व लोकांना कळेल"? नाही. एकमेकांबद्दल वाईट मनोवृत्ती नसणे ही येशूच्या शिष्यांची ओळख पटणारी चिन्हे नाहीत. ( पहा योहान १३: ३५). आपल्या अंतःकरणात काहीतरी असले पाहिजे. आपल्या सर्व सहविश्वासू बांधवांबद्दल आपल्याला उत्कट प्रेम असणे आवश्यक आहे. प्रेम हा एक सकारात्मक गुण आहे आणि केवळ वाईटाचा अभाव नाही.

आपल्या अंत:करणातून कटुतेचा आत्मा काढून टाकणे आणि नंतर ते शुद्ध आणि रिक्त सोडणे म्हणजे कोमटपणा आणि शेवटी सुरूवातीपेक्षा वाईट स्थितीत जाण्याचा एक निश्चित मार्ग आहे (लूक .११: २४-२६). जग म्हणते, "काहीही नसण्यापेक्षा काहीतरी असणे चांगले आहे". जर असे असेल तर एखाद्याला असे वाटेल की शीत असण्यापेक्षा कोमट असणे चांगले आहे. पण परमेश्वर असे म्हणत नाही. तो म्हणतो, "माझी इच्छा आहे की तू शीत असतास तर बरे होते" (प्रकटीकरण ३: १५ ). अर्धे आत्मिक असण्यापेक्षा पूर्णपणे ऐहिक असणे देवाला चालेल. कोमट, तडजोड करणारे ख्रिस्ती जगिक ख्रिस्ती लोकांपेक्षा पृथ्वीवरील ख्रिस्ताच्या कार्याचे अधिक नुकसान करतात. अविश्वासू ख्रिस्ताचे नाव घेत नाही आणि म्हणून त्याचे ऐहिकपण सुवार्तेमध्ये अडथळा ठरू शकत नाही. पण एक तडजोड करणारा, अर्धवट आत्मिक ख्रिस्ती ख्रिस्ताचे नाव घेतो आणि त्याच्या जगिकपणामुळे जगातील इतर राष्ट्रांमध्ये या नावाला कलंक लावतो.

कोमट, स्वतःला नीतिमान समजणारे परुशी अशांपेक्षा शीत, ऐहिक, अविश्वासणाऱ्याला (मत्तय .२१: १ पहा) आध्यात्मिक गरजांची जाणीव होण्याची अधिक शक्यता असते. या कारणांमुळेच प्रभु म्हणतो की त्याला आपल्याला कोमट असण्यापेक्षा शीत पाहणे बरे वाटेल. व्यावहारिक भाषेत याचा अर्थ असा आहे की आपल्याला पैशाच्या प्रेमापासून किंवा राग किंवा अशुद्ध विचारांपासून मुक्त होण्याची तीव्र इच्छा नसल्यास (फक्त पापाची तीन क्षेत्रे लक्षात घेतल्यास) आपण येशूचा शिष्य असल्याचा दावा करण्यापेक्षा अविश्वासणारे राहिल्यास बरे होईल. आपण कोमट असण्यापेक्षा आपण शीत असल्यास आपल्यासाठी अधिक आशा आहे. हे आश्चर्यकारक आहे, परंतु सत्य आहे.