WFTW Body: 

काना येथील लग्नात येशू उपस्थित होता, तेव्हा जुना द्राक्षरस संपला. जुना द्राक्षरस लोकांच्या प्रयत्नांनी तयार केला होता. जुना द्राक्षरस तयार करण्याकरिता अनेक वर्षे लागली; परंतु, त्याद्वारे लोकांची गरज भागली नाही. ही घटना जीवनाच्या दाखल्याप्रमाणे देखील आहे. आपले जीवन नियमाखाली होते, जुन्या नियमशास्त्राच्या खाली होते. जुना द्राक्षरस संपला. नवीन द्राक्षरस देण्यापूर्वी येशूला जुना द्राक्षरस संपण्याची वाट पाहावी लागली. ''कारण प्रभु परमेश्वर इस्राएलाचा पवित्र प्रभु म्हणाला, मागे फिरणे व स्वस्थ राहणे यात तुमचा बचाव आहे. शांतता व श्रद्धा यात तुमचे सामर्थ्य आहे. तरी तसे तुम्ही करीतना. तुम्ही म्हणाला, नाही, आम्ही घोड्यावर बसून पळू, म्हणून तुम्हास पळावे लागेल; तुम्ही म्हणाला, आम्ही चपळ घोड्यावर बसू, म्हणून तुमचा पाठलाग करणारे चपळ बनतील. एकाच्या धमकीने तुमचे हजार पळतील. पाचांच्या धमकीने तुम्ही पळाल...यामुळे परमेश्वर तुम्हावर प्रसन्न होण्यास विलंब लावील, तुम्हावर करुणा करावी म्हणून उच्चस्थानी आरूढ होईलपरमेश्वर न्यायी देव आहे. जे त्याची वाट पाहतात ते सर्व धन्य'' (यशया 30:15-18).

विजयी जीवन जगण्याचा आम्ही प्रयत्न करीत गेलो व वारंवार अपयशी झालो. हाच धडा देव आपल्याला शिकवीत आहे. देव आपल्याला सांगत आहे की आपण स्वतःच्या शक्तीने विजय प्राप्त करू शकत नाही. जोवर आपण नियमशास्त्राच्या खाली राहणार तोवर पापाची सत्ता आपल्यावर राहील. देवाच्या प्र्त्येक लके रामं ध्ये दवे एक प्रमुख कार्य करू इच्छितो. तो प्रत्येक लकेरामंधील त्यांची स्वतःची शक्ती पूर्णपणे नाहीशी करू इच्छितो. काना येथे येशूने द्राक्षरस सपं ण्याची वाट बघितली. चमत्कार करण्यापूर्वी त्याने वाट बघितली. तो वाट बघत आहे की आपली स्वतःची शक्ती संपावी. आपल्या पदरी पडणारे अपयश व पराभव देवाकडनू असू शकतात, कारण तो आपल्या शक्तीचा शेवट करू इच्छितो. जेव्हा आपण पूर्णपणे दबु र्ल होतो तेव्हा तो आपल्यामध्ये त्याचे परिपूर्ण सामर्थ्य आतेू शकतो व पक्र ट करू शकतो (2 करिंथ 12:9).

जेव्हा आपली परीक्षा होते, आपल्याला मोह होतो, आपण प्रतिकार करताना दुष्ट शब्दांचा उपयोग करतो, रागावतो, टीका करतो, इतरांचा न्याय करतो, अक्षमाशील असतो, भौतिक गोष्टींच्या मागे धावतो, हक्कांसाठी लढत राहतो, प्रतिष्ठा मिळवू पाहतो, तेव्हा, आपली स्वतःची शक्ती आपल्याला दिसते. अशाप्रकारची मनोवृत्ती आपली असते तेव्हा आपल्या स्वतःमधील मी पणा किती बळकट आहे ह्याचे प्रमाण आपल्याला कळते. तेव्हा जुना द्राक्षरस संपलेला नसतो. अशा वेळी येशू काही न करता वाट बघत असतो.

आपल्या वैयक्तीक जीवनातील, वैवाहीक जीवनातील व सामाजिक जीवनातील द्राक्षरस संपला आहे का? संपला असेल तर आपण येशूचे मुख बघण्याची गरज आहे व त्याला प्रामाणिकपणे आपली गरज सांगण्याची वेळ आहे. तोच केवळ आपल्याला नवीन द्राक्षरस देऊ शकतोकाना येथील नवीन द्राक्षरस मानवीय प्रयत्नांनी तयार झाला नव्हता. ते देवाचे अलौकीक कार्य नव्हते. आपले जीवन देखील असे होऊ शकतेप्रभु आपल्या हृदयावर व मनावर त्याचे नियम लिहील, जेणेकरून, आपण त्याची परिपूर्ण इच्छा पूर्ण करू (इब्री 8:10; फिलिप्पै 2:13). आपण येशूवर प्रीती करावी म्हणून तो आपल्या हृदयाची सुंता करेल. तो आपल्याला त्याच्या आज्ञांप्रमाणे चालवेल (अनुवाद 30:6; यहेज्केल 36:27). ज्याप्रमाणे त्याने काना येथे नवीन द्राक्षरस बनविण्याचे कार्य केले त्याप्रमाणे आपल्या जीवनात त्याचे हे कार्य होईल. हाच कृपेचा अर्थ आहेआपण् ा संपूर्ण जीवन प्रयत्न केला तरी आपण येशूसारखे जीवन आपल्यामध्ये उत्पन्न करू शकत नाही. जर आपण येशूसोबत वधस्तंभावर मरण पावलो, रोज आपला वधस्तंभ उचलला व आपल्या गर्वाला व मी पणाला वधस्तंभावर दिले तर देव आपल्याला अभीवचन देतो की तो आपल्यामध्ये नवीन द्राक्षरस म्हणजे येशूचे जीवन उपलब्ध करील (2 करिंथ 4:10).