WFTW Body: 

बाप्तिस्मा करणारा योहान हा इस्राएल राष्ट्रासाठी संदेष्ट्यांपैकी शेवटचा होता. मत्तय ३:२ मध्ये वर्णन केलेला त्याचा प्राथमिक संदेश हा होता की, "पश्चात्ताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे." तो या लोकांकडे एका अतिशय महत्त्वाच्या कारणासाठी हा संदेश घेऊन आला होता.

पश्चात्ताप करणे म्हणजे मागे फिरणे. मला वाटते यासाठी, लष्करी आदेश "मागे फिरा" ही सर्वात उत्तम उपमा असू शकते. जेव्हा एखादा सैनिक उभा असतो आणि परेड च्या मैदानावर सार्जंट मेजर जेव्हा "मागे फिरा" अशी आज्ञा देतो, तेव्हा तो सैनिक लगेचच जिथे त्याची पाठ असते त्या दिशेने वळतो आणि त्याची पाठ पूर्वी ज्या दिशेने होती त्या दिशेने पाहतो. ह्यावरून आपल्याला पश्चात्ताप करणे म्हणजे – मागे फिरणे या शब्दाचा अर्थ स्पष्ट होतो . आपल्याला मनापासून मागे फिरावे लागते. इंग्रजी आणि बहुतेक भाषांमध्ये, पश्चात्ताप हा शब्द फार स्पष्टपणे अनुवादित केलेला नाही, परंतु तमिळ भाषेत तो अगदी स्पष्ट आहे. तमिळ भाषेत पश्चात्तापाचे भाषांतर "मनम् थिरुम्बुधल" असे केले आहे, ज्याचा अर्थ मनापासून वळणे आहे. मनापासून वळणे, हेच बाप्तिस्मा करणारा योहान इस्राएल राष्ट्राला सांगत होता .

इस्राएल राष्ट्राला पृथ्वीवरील सर्व जगीक गोष्टींचे वचन देण्यात आले होते देवाच्या दैवी स्वभावाचे भागीदारी व्हाल , स्वर्गात संपत्ति मिळेल , किंवा पृथ्वीवरील स्वर्गीय जीवन इत्यादी बाबत. जुन्या करारात कोणतेही आश्वासन दिलेले नाही. जुन्या कारारातील सर्व वचने जगीक गोष्टीसाठी होती.

अनुवाद २८ मध्ये, आपण स्पष्टपणे पाहतो की त्यांना भौतिक संपत्ती, भौतिक समृद्धी, शारीरिक आरोग्य, अनेक मुले आणि त्यांच्या व्यवसायांवर, पिकांवर आणि गुरांवर आशीर्वाद देण्याचे वचन देण्यात आले होते. त्यांना वचन देण्यात आले होते की ते खूप समृद्ध होतील, ते कधीही कर्जबाजारी होणार नाहीत, त्यांचे पृथ्वीवरील सर्व शत्रू नष्ट होतील, ते एक महान राष्ट्र होतील आणि त्यांना एक देश मिळेल ज्याचे नाव कनान देश, ज्याला इस्राएल असे म्हटले जाते.

या काळापर्यंत इस्राएलला दिलेले सर्व आशीर्वाद जगीक गोष्टीसाठी होते आणि त्यांचे मन नेहमीच पृथ्वीवरील गोष्टींवर केंद्रित होते. पण बाप्तिस्मा करणारा योहान आला आणि म्हणाला, " मागे वळा, यापासून मागे वळा. पृथ्वीवरील गोष्टींवर मन लावणे थांबवा आणि मागे वळा कारण आता एक नवीन राज्य येत आहे. ते स्वर्गाचे राज्य आहे, जिथे पृथ्वीवरील गरजा दुय्यम होतात, अगदी शारीरिक आरोग्य देखील दुय्यम होते. भौतिक समृद्धी महत्वहीन होते कारण देव आपल्या भौतिक गरजा पुरवतो. मागे वळा, कारण आता देव तुम्हाला आत्मिक संपत्ती देणार आहे, म्हणजेच स्वर्गीय संपत्ती. देव तुम्हाला आत्मिक मुले देणार आहे, आवश्यक नाही की शारीरिक मुले असतील . तुमच्याकडे जगीक भूमी नाही पण आत्मिक, स्वर्गीय भूमी असेल." तो त्यांना मागे वळा असे सांगत होता कारण स्वर्गाचे राज्य अद्याप आले नव्हते पण जवळ आले होते. ते पेंटेकॉस्टच्या दिवशी येणार होते.

बाप्तिस्मा करणारा योहान हा येशू ख्रिस्ताचा अग्रदूत देखील होता, जो, देव मानव जाती बरोबर करत असलेल्या एका नवीन कराराचा मार्ग उघडणार होता, जो सर्व राष्ट्रांच्या लोकांना त्यांचा पिता म्हणून देवाशी नातेसंबंधात आणेल. आपण मत्तय ४:१२-१३ मध्ये वाचतो की योहानाला हेरोदने कैद केले होते. जेव्हा येशूने हे ऐकले, तेव्हा तो गालीलात निघून गेला आणि नासरेथ सोडुन जुबलून व नफतालीत असलेल्या समुद्रकिनाऱ्यावरील कफरनहुमास जाऊन राहिला, जिथे तो लहानाचा मोठा झाला होता आणि तीस वर्षे राहिला होता. तो समुद्राकाठी असलेल्या कफर्णहूम येथील एका घरात येऊन राहिला. त्यानंतर, त्या क्षणापासून, बाप्तिस्मा देणाऱ्या योहानाने सांगितलेल्या संदेशाची येशू घोषणा करीत संदेश देऊ लागला की ,"पश्चात्ताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे" (मत्तय ४:१७). योहान जणू धावण्याच्या शर्यतीचा पहिला टप्पा धावला होता आणि आता त्याने येशूला जबाबदारी दिली, आणि येशू आता त्याच संदेशाची घोषणा करत होता तो म्हणजे -"पश्चात्ताप करा". जेव्हा येशू स्वर्गात गेला, तेव्हा आपण वाचतो की प्रेषित पेत्राने येशूच्या हातातून ती धुरा घेतली आणि तोच संदेश त्याने दिला - "पश्चात्ताप करा" (प्रेषितांची कृत्ये २:३८). त्याने पेन्टेकॉस्टच्या दिवशी लोकांना उपदेश केला, "पश्चात्ताप करा आणि तुम्हाला पवित्र आत्म्याचे दान मिळेल, जे आपल्यामध्ये असलेले देवाचे राज्य आहे." मग ते(देवाचे राज्य) शेवटी आले.

जेव्हा बाप्तिस्मा देणाऱ्या योहान आणि येशू देवाच्या राज्याबद्दल बोलले, तेव्हा ते म्हणाले की, ते ( स्वर्गाचे राज्य ) येणार आहे, किंवा ते जवळ आले आहे. येशूने एकदा म्हटले होते की देवाचे राज्य तुमच्यामध्ये आहे, कारण ख्रिस्तामध्ये देवाचे राज्य आधीच अस्तित्वात होते. पण ते त्याच्या सभोवतालच्या लोकांमध्ये नव्हते. हे फक्त पेंटेकॉस्टच्या दिवशी घडणार होते, जेव्हा १२० शिष्य पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा घेण्याची वाट पाहत होते. मग देवाचा आत्मा त्यांना भरून गेला आणि देवाचे राज्य त्यांच्यात वास करू लागले. त्यांनी घोषित केलेले ते हेच राज्य - स्वर्गाचे राज्य (किंवा देवाचे राज्य) - जिथे पवित्र आत्मा आपल्यामध्ये राहतो. ते शारीरिक रोग बरे करण्याचा आणि भौतिक समृद्धीचे बाह्य राज्य नाही, ज्याचा दुर्दैवाने, आज बरेच ख्रिस्ती प्रचारक प्रचार करत आहेत. स्पष्टपणे सांगायचे तर, ती एक फसवणूक आहे आणि ते देवाचे राज्य नाही.

पण ते नेमके काय आहे? रोमकरास १४:१७ मध्ये म्हटले आहे की, देवाचे राज्य खाणे-पिणे नाही. ते समृद्धी किंवा शारीरिक रोग बरे करने नाही - ते पृथ्वीवरील आशीर्वाद आहे असे अजिबात नाही.

रोमकरास १४:१७ नुसार, नीतिमत्व, शांती व पवित्र आत्म्याच्या द्वारे मिळणारा आनंद हयात ते आहे .

• नीतिमत्व: देवाचे स्वतःचे नीतिमत्त्व, जे प्रथम आपण ख्रिस्ताला आपला तारणहार आणि प्रभु म्हणून स्वीकारतो तेव्हा आपल्यावर दिले जाते आणि नंतर पवित्र आत्म्याद्वारे आपल्याला दिले जाते, जिथे देवाचे नीतिमत्त्व आपल्या जीवनात प्रकट होते.
• आनंद: एक आंतरिक आनंद जो आपल्याला पवित्र आत्म्याद्वारे निराशा आणि नैराश्यापासून पूर्णपणे मुक्त करतो.
• शांती: एक आंतरिक शांती, जी प्रामुख्याने पवित्र आत्म्याद्वारे दिली जाते, ज्यामुळे चिंता, भीती, तणाव, निराशा, उदासी, वाईट मनःस्थिती इत्यादींपासून मुक्तता मिळते आणि सर्व लोकांसोबत शांती देते, जिथे आपण लोकांशी किंवा कोणत्याही गोष्टीशी लढण्यास नकार देतो.

तर हे देवाचे राज्य आहे. ते एक आंतरिक गोष्ट आहे. देवाचे राज्य आपल्या आत आहे. ते पवित्र आत्म्याद्वारे मिळणारे ख्रिस्ती जीवन आहे. ते स्वर्गाचे जीवन आहे, येथे या पृथ्वीवर, आपल्या अंतःकरणात.

पुढे आपण जेव्हा बघतो , आपण बाप्तिस्मा देणाऱ्या योहानाच्या शब्दांकडे लक्ष देऊया: "पृथ्वीच्या गोष्टींवर मन लावणे थांबवा आणि मागे फिरा कारण आता एक नवीन राज्य येत आहे, जिथे पृथ्वीवरील गरजा दुय्यम होतात, अगदी शारीरिक आरोग्य देखील दुय्यम होते. भौतिक समृद्धी महत्वहीन होते कारण देव आपल्या भौतिक गरजा पुरवतो. मागे फिरा - या जगाच्या गोष्टीवर मन लावण्यापासून पश्चात्ताप करा - कारण आता देव तुम्हाला आध्यात्मिक संपत्ती देणार आहे."

आपण स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करूया.