WFTW Body: 

प्रकटीकरण 19:1-7 मध्ये आपण पुढीलप्रमाणे वाचतो, 'ह्यानंतर स्वर्गांतील मोठ्या जनसमुदायाची जशी काय एक मोठी वाणी मीं ऐकली; ती म्हणालीः 'हालेलूया;' तारण, गौरव व सामर्थ्य ही आमच्या देवाचीं आहेत; कारण 'त्याचें न्यायनिर्बंध सत्याचे' व ीतीचें' आहेत; ज्या मोठ्याकलावंतिणीनें आपल्याजारकर्मानें पृथ्वी भ्रष्ट केली तिचा न्यायनिवाडा त्यानें केला आहे, आणि आपल्या 'दासांच्या रक्ताबद्दल तिचा सूड घेतला आहे.' ते दुसर्यांदा म्हणाले, 'हालेलूया; तिचा धूर युगानुयुग वर चढत आहे.' तेव्हां ते चोवीस वडील व ते चार प्राणी उपडे पडून 'राजासनावर बसलेल्या' देवाला नमन करतांना म्हणालेः आमेन; 'हालेलूया.' इतक्यांत राजासनापासून' वाणी झाली; ती म्हणालीः अहो आमच्या देवाची 'भीतिबाळगणार्या सर्वलहानथोर दासांनो,त्याचे स्तवन करा.' तेव्हां'जणूं काय'मोठ्या 'समुदायाची वाणी, अनेक जलप्रवाहांचा ध्वनि' व प्रचंड मेघगर्जनांचा ध्वनि मीं ऐकला; तो म्हणलाः 'हालेलूया; कारण' सर्वसमर्थआमचा 'प्रभु' देव ह्यानें 'राज्य हातीं घेतलें आहे. आपण आनंद' व 'उल्लास करूं' व त्याचें गौरव करूं; कारण कोंकर्याचें लग्न निघलें आहे, आणि त्याच्या नवरीनें स्वतःला सजविलें आहे.''

हालेलूया' हा शब्द अद्भुत आहे. या शब्दाचा अर्थ 'देवाची स्तुती असो' असा होतो. नवीन करारामध्ये हा शब्द केवळ चार वेळेस आलेला आहे. चारही वेळेस तो प्रकटीकरण 19:1-6 मध्येच आहे. एक गोष्ट रोचक आहे ती अशी की जारकर्मी बाबेलचा न्याय होत असताना हा शब्द पहिल्या वेळेस नवीन करारात वापरण्यात आला. याकरिता आपण देखील मोठ्याने हालेलूया म्हणावे. परंतु, करिसमॅटीक लोक जे अद्याप बाबेलमध्ये बसून आहेत ते असे म्हणू शकणार नाही. कारण बाबेलच्या जादूने त्यांना भुरळ घातली आहे व फसविले आहे. या वचनाच्या एका भाषांतरामध्ये म्हटले आहे की बाबेलने तिच्या जारकर्माच्या विषाद्वारे पृथ्वीला बाधीत केले आहे. एक प्याला दुधाला विषारी करण्याकरिता काही थोडेचथेंब पुरेसेअसतात. अशाप्रकारे बाबेलने ख्रिस्तीविश्वासाला भ्रष्टकेले आहे. तिने सत्यामध्ये मानवाच्या परंपरेंचे विष मिसळले आहे. आता देव आपल्या दासांच्या रक्ताबद्दल तिचा सूड घेत आहे.

याच कारणास्तव पुन्हा एकदा ते 'हालेलूया' म्हणून ओरडतात. जारकर्मी बाबेलचा न्याय होत असताना स्वर्गामध्ये मोठा आनंद दिसतो.

'त्याप्रमाणें, पश्चात्तप करणर्या एका पापी माणसाबद्दल देवाच्या दूतांसमोर आनंद होतो, हें मी तुम्हांस सांगतों'' (लूक 15:10). या आनंदाविषयी आपण समजू शकतो.

'त्याला त्यांनीं कोंकर्याच्यारक्तामुळें वआपल्या साक्षीच्या वचनामुळें जिंकलें; आणि त्यांच्यावरमरावयाची पाळीआली तरीत्यांनीं आपल्या जिवावर प्रीति केली नाहीं, म्हणून 'स्वर्गांनो' व त्यांत राहणर्यांनो, 'उल्लास करा;' पृथ्वी व समुद्र ह्यांवर अनर्थ ओढवला आहे, कारण सैतान आपला काळ थोडा आहे हें ओळखून अतिशय संतप्त होऊन खलीं तुम्हांकडे आला आहे'' (प्रकटीकरण 12:11,12). या उल्लासाविषयी आपण समजू शकतो. परंतु पुढील वचन वाचा, 'हे स्वर्गा,' अहो पवित्र जनांनो, प्रेषितांनों व संदेष्ट्यांनो, तिच्याविषयीं 'आनंद करा;' कारण देवानें तिला दंड करून तुम्हांला ∙याय दिला आहे'' (प्रकटीकरण 18:20). या आनंदाविषयी आपल्याला कळेल का? जर आपल्याला कळत नाही तर समजावे की आपल्याला देवाचा मार्ग कळालेला नाही.

बाबेलवरील देवाचा न्याय अनेक लोकांपासून सैतानाने लपवून ठेवला आहे. जेव्हा बाबेलचे पातक, जादूगिरी व फसवणूक उघडी केल्या जाते व तिचा एकदाच सर्वांकरिता न्याय केल्या जातो तेव्हा स्वर्गात मोठा आनंद होतो तो स्पष्टपणे या वचनात दिसून येतो. आपण त्या आनंदात सहभागी होऊन पुढीलप्रमाणे म्हणावे, 'हालेलूया! प्रभुची स्तुती असो की एके दिवशी या भ्रष्ट प्रणालीचा न्याय होईल. हीप्रणालीजीलोकांनाफसवितेवख्रिस्ताच्यानावाचाअनादरकरिते,ख्रिस्ताच्यापावलांवरपाऊलदेऊनचालतनाही,वधस्तंभवाहतनाही, परंतु, जगात केवळ मौज करू पाहते, नावलौकीक मिळवू पाहते, ख्रिस्तीत्वाच्या नावावर पैसा मिळवू पाहते तिचा न्याय होणार आहे. प्रभुची स्तुती असोकी प्रभुच्यानावाखाली ज्यावाईट गोष्टीहोत आहेत - अश्लीलवस्त्र पेहराव,चमकदार वस्त्र,सोन्याचे क्रूस,मुकूट, मेजवान्या व उत्सव नष्ट करण्यात येणार. हालेलूया! तिचा धूर नेहमीकरिता वर जात आहे.'' हा स्वर्गाचा आत्मा आहे आणि हा आत्मा आपल्यामध्ये असावा. जर आपण देवासोबत एक आहोत आणि स्वर्गाचे वारीस आहोत तर बाबेलचा न्याय होत असता आपण देखील आनंद करू! तिसर्या वेळेस 'हालेलूया' असा जयघोष याच कारणासाठी झालेला आढळतो. जारकर्मी बाबेलचा न्याय होत असल्यामुळे तीन वेळा 'हालेलूया' असा जयघोष झाला. बाबेलचा नाश होत असल्यामुळे तीन वेळा 'हालेलूया' असा जयघोष झाला!

चौथ्या वेळेस देखील 'हालेलूया' असा जयघोष झाला व स्वर्गात आनंद करण्यात आला कारण लग्नाकरिता ख्रिस्ताच्या वधूने स्वतःला तयार केले. सर्वसामर्थी प्रभु देव सदासर्वकाळ राज्य करितो म्हणून पृथ्वीवर वधूने जो छळ व विरोध सहन केला तो तिच्या हिताकरिता होता जेणेकरून तिने लग्नाच्या दिवसाकरिता तयार व्हावे. देवाने तसे हाऊ दिले.