WFTW Body: 

नव्या करारामध्ये दोन व्यक्तींनी "माझ्या मागे या" असे म्हटले. जुन्या करारातील कोणताही संदेष्टा असे कधीच म्हणु शकला नाही. त्यांचे जीवन अनुकरण करण्याजोगे नव्हते – यशया नाही किवा मोशेसुद्धा नाही. ते फक्त घोषणा करू शकत होते, "देव माझ्याद्वारे काय बोलतो आहे ते ऐका. हे देवाचे शब्द आहेत." पण त्यापैकी एकही व्यक्ती "माझ्या जीवनाचे अनुकरण करा” असे म्हणू शकला नाही. मोशेने आपल्या पत्नीशी वाद घातला आणि आपल्या मुलाची सुंता न करून त्याने देवाच्या आज्ञेचे उल्लंघन केले. ते पूर्णपणे आदर्श नव्हते, परंतु ते देवाचे वचन अचूकपणे घोषित करू शकले आणि म्हणू शकले, "प्रभूने असे म्हटले." परंतु नव्या करारात, आपण फक्त "प्रभु असे म्हणतो" एवढेच म्हणत नाही. आपण फक्त असे म्हणत नाही,“या आणी देव काय म्हणतो ते ऐका ”

नवीन करारात आपण म्हणतो, "या आणि देवाने काय केले आहे ते बघा." जे जुन्या करारातील संदेष्ट्यांनी म्हटलेल्या, "या आणि, देव काय म्हणतो ते ऐका ."ह्यापेक्षा वेगळे आहे. नवीन करारातील संदेष्टा म्हणतो, "या आणि देवाने माझ्या जीवनात काय केले आहे ते बघा. या आणि देवाने माझ्या कुटुंबात काय केले आहे ते बघा. या आणि देवाने माझ्यामध्ये काय केले आहे ते बघा". "आता मी तुम्हाला येशूने आज्ञा केलेल्या गोष्टींचे पालन करायला शिकवू इच्छितो जेणेकरून तो तुमच्या आयुष्यातही असेच करू शकेल. माझे अनुकरण करा."

पवित्र शास्त्रात येशू हा पहिला व्यक्ती होता जो म्हणाला, "माझे अनुकरण करा." नंतर आपण पौलाने म्हंटलेले वाचतो, "जसा मी ख्रिस्ताचा अनुकरण करणारा आहे, तसे तुम्हीहि माझे अनुकरण करणारे व्हा "(१करिंथकर ११:१). तो फिलिप्पैकर ३:१७ मध्ये पुढे म्हणतो, "बंधूंनो, माझे अनुकारी व्हा. आणि केवळ माझेच उदाहरणच नाही तर जे माझ्यासारखे चालत आहेत, त्यांचेही अवलोकन करा. तुम्ही त्यांच्या उदाहरणाचे देखील अनुकरण करू शकता, कारण मी ख्रिस्ताचे अनुकरण करत आहे. "ख्रिस्त हा त्या व्यक्तीसारखा आहे जो १०,००० मीटर उंच पर्वताच्या शिखरावर चढला आहे. तो शिखरावर पोहोचला आहे आणि आपण त्याचे अनुकरण करत आहोत. पौल कदाचित आपल्या पुढे असेल. कदाचित तो ३,००० - ४,००० मीटर वर गेला असेल. तो त्याच्या मागे असलेल्यांना म्हणतो, "माझे अनुकरण करा." कदाचित मी फक्त ५०० मीटर पर्यंतच चढलो आहे. मी डोंगरावर आणखी खाली असलेल्या लोकांना म्हणू शकतो, "माझ्या मागे या." मी माझ्या पुढे असलेल्या इतरांच्या उदहरणाचे अनुकरण करू शकतो, जे शिखरावर पोहोचणाऱ्या ख्रिस्ताचे अनुकरण करत आहेत. शिखर म्हणजे पूर्णपणे ख्रिस्तासमान होणे. हेच ध्येय आहे. जगातील सर्व आजारी लोकांना बरे करणे हे ध्येय नाही, तर आपल्या जीवनात पूर्णपणे येशू ख्रिस्तासारखे बनणे हे आहे आणि त्या जीवनातून सेवाकार्याचा ओघ येईल.

आपल्याला हे समजून घेणे गरजेचे आहे. येशूने आपल्याला ही आज्ञा दिली नाही की आपण जाऊन लोकांना त्याने जी सेवा केली ती करायला सांगावे . जर पौलाने "माझ्या मागे या" हे सेवा करण्याच्या संदर्भात म्हटले असते, तर आपल्याला ते शक्य झाले नसते. तो आपल्याला प्रेषित बना असे सांगत नव्हता . कारण प्रत्येकजण प्रेषित कसा बनू शकेल? प्रत्येकजण पौलासारखा संदेष्टा किंवा सुवार्तिक कसा बनू शकेल ? तो म्हणतो, "माझ्या जीवनाचे अनुकरण करा. मी जसा ख्रिस्ताचे अनुकरण करतो तसे माझे अनुकरण करा." पौल सुद्धा ख्रिस्ताच्या, आजारी लोकांना बरे करण्याच्या, पाण्यावर चालण्याच्या किवा पाच भाकरीत 5,000 लोकांना जेवू घालण्याच्या सेवेचे अनुकरण करू शकला नाही. अशी देखील वेळ होती जेव्हा पौल स्वतः म्हंटला की तो भुकेला आहे (2 करिंथकर 11:27), जेव्हा त्याला गरज होती, तो थंडीने कापत होता तेव्हा त्याने तीमथीला त्याचा झगा घेऊन यायला सांगितले (2 तीमथी 4:13). सुरुवातीच्या ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांना अनेक क्लेश सहन करावे लागले. सिंहांच्या तोंडात फेकले गेले तरी त्यांना संरक्षण मिळाले नाही. पण त्यांनी येशूचे अनुकरण केले, ज्याने क्रूसावर वध होताना संरक्षण नाकारले. त्याच्या जीवनाचे आपण अनुकरण केले पाहिजे. आपण त्याच्या सेवकाईचे अनुकरण करू शकत नाही.

ह्याचे सर्वात स्पष्ट उदाहरण म्हणजे – येशूच्या सेवेत जगाच्या पापांसाठी मरणे ह्याचा समावेश होता. जगात आपण त्या सेवेचे अनुकरण कसे करू शकतो? आपण नाही करू शकत. म्हणून आपण येशूच्या जीवनाचे अनुकरण करतो .आपल्याला येशूच्या जीवनातला आणि त्याच्या सेवकाईतील फरक समजून घेणे गरजेचे आहे. येशू एका वाक्यात सांगू शकला – " त्याने त्याच्या पित्याची इच्छा पूर्ण केली आहे." – दोन्ही बाबतीत त्याच्या जीवनात आणि त्याच्या सेवकाईत. आपणही आपल्या जीवनात व सेवकाईत देवाची इच्छा पूर्ण करु शकतो. आपल्या जीवनात, येशूच्या उदहरणाचे अचूक अनुसरण करणे आवश्यक आहे. पौलाने तेच केले. आपल्या सेवेत, आपल्याला देण्यात आलेले ख्रिस्ताच्या शरीरातील विशिष्ट कार्य पूर्ण करणे आहे. जर आपण येशूच्या जीवनातील आणि येशूच्या सेवेतील हा फरक समजून घेतला तर आपल्याला आढळेल की आपण फसवणुकीपासून संरक्षित आहोत आणि स्वतःला अनेक अवास्तवता (भ्रम ) आणि ढोंगीपणापासून वाचवतो. ख्रिस्ती लोकांमध्ये बराच ढोंगीपणा आहे, जे असे भासवतात की ते येशूने केलेल्या गोष्टीच करत आहेत.

लोक कधीकधी विचारतात, "शेवटच्या भोजनानंतर येशूने जे म्हटले त्याचा अर्थ काय, 'मी तुम्हाला खचित खचित सांगतो, मी जे कृत्ये करितो , ती माझ्यावर विश्वास ठेवणाराहि करील, आणि त्यापेक्षा मोठी करील, कारण मी पित्याकडे जातो . मी पित्याला पवित्र आत्मा पाठवण्यासाठी विनंती करणार आहे' (योहान १४:१२,१६)?" तो जे म्हणत होता ते असे आहे की, जेव्हा पवित्र आत्मा येणार होता, तेव्हा तुम्ही त्याने केलेली कामे करू शकाल आणि त्याहीपेक्षा मोठी कामे करू शकाल. आपल्याला ते समजून घेणे आवश्यक आहे.

जर तुम्ही एखाद्याला विचारले की येशूने कोणती कामे केली आहेत, तर ते लगेच आजारी लोकांना बरे करणे, मृतांना उठवणे, पाण्यावरून चालणे, ५ पाच भाकरीत ५००० लोकांना खाऊ घालणे याबद्दल बोलतील. पण तुम्ही येशूच्या आयुष्यातील शेवटच्या १०% जीवनाबद्दलच बोलत असाल ! त्याच्या आयुष्याच्या शेवटच्या साडेतीन वर्षात त्याने हेच केले. त्याने एवढेच केले का? त्याच्या उर्वरित आयुष्याच्या ९०% जीवनाबद्दल काय? त्याच्या आयुष्याच्या त्या ९०% जीवनात त्याने काय केले? त्याने त्याच्या संपूर्ण आयुष्यात काय केले ? एका वाक्यात: सांगायचे तर त्याने त्याच्या पित्याची इच्छा पूर्ण केली. येशूने स्वतः योहान ६:३८ मध्ये म्हटले आहे, "मी स्वर्गातून मृतांना उठवण्यासाठी, आजारी लोकांना बरे करण्यासाठी आणि पाण्यावरून चालण्यासाठी आलो नाही. मी स्वतः च्या इच्छेप्रमाणे नव्हे , तर ज्याने मला पाठवले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे म्हणून स्वर्गतून उतरलो आहे ."

थोडक्यात, ही "येशूची कामे" आहेत. तो स्वतःच्या इच्छेला "नाही" म्हणण्यासाठी आणि त्याच्या पित्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी आला. त्याच्या पित्याच्या इच्छेमध्ये, डोंगरावरील प्रवचन सांगणे, आजारी असलेल्या सर्वांना बरे करणे, कधीकधी बेथसेदा येथील तलावात फक्त एकाच व्यक्तीला बरे करणे, पाण्यावरून चालणे, पेत्राला पाण्यावरून चालायला लावणे आणि पाच भाकरी घेऊन ५,००० लोकांना खायला घालणे यांचा समावेश होता. पौलासाठी पित्याच्या इच्छेमध्ये पाण्यावरून चालणे किंवा पाच भाकरी घेऊन ५,००० लोकांना खायला घालणे किंवा चार दिवसांपासून मृत असलेल्या लाजरसारख्या व्यक्तीला उठवणे यांचा समावेश नव्हता, तर त्यात पित्याची इच्छा पूर्ण करणे यांचा समावेश होता.

मुद्दा हाच आहे. एका वाक्यात येशूने केलेली कामे म्हणजे - देवाची इच्छा. पौलानेही तेच केले. त्याच्यासाठी, देवाची इच्छा ही होती की, प्रवास करणे, मंडळ्या स्थापन करणे, आणि धर्मशास्त्र लिहिणे. येशूने कधीही कोणतेही धर्मशास्त्र लिहिले नाही, परंतु पौलाने लिहिले. आपल्याला शास्त्र लिहिण्यासाठी बोलावले गेले नाही. परंतु आपल्याला आपल्या पित्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी बोलावले गेले आहे. ती येशूची कामे आहेत. यामध्ये, घरात योसेफ आणि मरीयेच्या आज्ञेत राहणे याचा समावेश होतो. जर मरीयेने त्याला विहिरीतून एक बादली पाणी आणण्यास सांगितले तर येशू एक बादली पाणी आणेल. ती येशूची कामे आहेत: लहान आणि मोठ्या सर्व गोष्टींमध्ये पित्याचे आज्ञापालन करणे. आपण सर्वजण ते करू शकतो.