लेखक :   झॅक पुननं
WFTW Body: 

नम्रता :
आपण इफिसकरांस पत्र ४:१-२ मध्ये वाचतो "म्हणून जो मी प्रभूमध्ये बंदिवान तो मी तुम्हांला विनवून सांगतो की, तुम्हांला झालेल्या पाचारणास शोभेल असे चाला; पूर्ण नम्रता, सौम्यता व सहनशीलता दाखवून एकमेकांना प्रीतीने वागवून घ्या." मी अनेकदा असे म्हटले आहे की ख्रिस्ती जीवनाची तीन रहस्ये आहेत: नम्रता, नम्रता आणि नम्रता. तिथूनच सर्व काही सुरू होते. येशूने स्वतःला लीन केले आणि मत्तय ११:२९ मध्ये म्हटले, "मी जो मनाचा सौम्य व लीन आहे त्या माझे जू आपणांवर घ्या व माझ्यापासून शिका." त्याने आम्हाला त्याच्याकडून शिकण्यासाठी सांगितलेल्या दोनच गोष्टी म्हणजे नम्रता आणि सौम्यता. का? कारण आदामाची मुले म्हणून आपण सर्वजण गर्विष्ठ आणि कठोर आहोत. जर तुम्हाला पृथ्वीवर स्वर्गीय जीवन दर्शवयाचे असेल तर प्रथमतः ते सुवार्तेचा प्रचार, उपदेश, पवित्र शास्त्राचे शिक्षण किंवा सामाजिक कार्याद्वारे दर्शवता येणार नाही. सर्वप्रथम नम्रता आणि सौम्यतेच्या मनोवृत्तीने ते दर्शवले जाईल. देव नम्रता, सौम्यता आणि संयम शोधतो. इफिसकरांस पत्र ४:२ (लिविंग बायबल अनुवाद) म्हणते, "एकमेकांच्या चुका तुमच्या प्रीतीमुळे वागवून घ्या". कोणत्याही मंडळीमध्ये कोणीही परिपूर्ण नाही. प्रत्येकजण चुका करतो. त्यामुळे मंडळीमध्ये आपल्याला एकमेकांच्या चुका सहन कराव्या लागतील. आम्हाला एकमेकांच्या चुका वागवून घ्याव्या लागतात कारण आम्ही एकमेकांवर प्रीती करतो. "जर तुम्ही चूक केली तर मी ती झाकून घेईन. जर तुम्ही एखादी गोष्ट अपूर्ण सोडली, तर मी ती पूर्ण करीन". ख्रिस्ताच्या शरीराने असेच कार्य केले पाहिजे.

ऐक्य :
आपण इफिसकरांस पत्र ४:३ मध्ये वाचतो "आत्म्याच्या द्वारे घडून आलेले ऐक्य शांतीच्या बंधनाने राखण्यास झटत जा." ऐक्य हा पौलाच्या अनेक पत्रांमधील एक छान विषय आहे. आणि प्रभूला त्याच्या मंडळीसाठी हेच ओझे आहे. मानवी शरीराचा मृत्यू झाला की त्याचे विघटन होऊ लागते. आपले शरीर धुळीने बनलेले आहे आणि या शरीरात जीवन असल्यामुळे धुळीचे कण एकत्र धरले जातात. ज्या क्षणी आयुष्य संपते, त्या क्षणी विघटन सुरू होते; आणि काही वेळाने आपल्याला असे आढळते की संपूर्ण शरीर धूळ बनले आहे. विश्वासणार्‍यांच्या सहभागितेमध्येही असेच आहे. जेव्हा मंडळीमधील विश्वासणार्‍या लोकांमध्ये ऐक्य नसते, तेव्हा आपण खात्री बाळगू शकतो की मृत्यूने अगोदरच प्रवेश केला आहे. जेव्हा नवरा-बायकोमध्ये ऐक्य नसते, तेव्हा तुम्हाला कळते की मृत्यू आधीच आत शिरला आहे, जरी त्यांनी कधीही घटस्फोट घेतला नसला तरी. लग्न झाल्यानंतर एका दिवसात विघटन सुरू होऊ शकते - गैरसमज, तणाव, भांडणे इत्यादी यामुळे. मंडळीमध्येही असे घडू शकते. मंडळीची सुरुवात सहसा काही आवेशी बांधवांनी होते जे परमेश्वरासाठी शुद्ध कार्य करण्याच्या मोठ्या आवेशाने एकत्र येतात. लवकरच मतभेद होवू लागतात आणि मृत्यू आत शिरतो. आत्म्याचे ऐक्य टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला सतत लढाई लढायची असते - लग्नात आणि मंडळीमध्येसुद्धा.

देव पवित्र व्यक्तींचा समूह तयार करत नाही. तो एक शरीर तयार करत आहे. इफिसकरांस पत्र ४:३ मध्ये पौल याबद्दलच बोलतो. तो आपल्याला "एकच शरीर आहे म्हणून आत्म्याद्वारे घडून आलेले ऐक्य टिकवून ठेवा" असा आग्रह करतो. स्थानिक मंडळीत ऐक्य आहे असे आपण कधी म्हणू शकतो? जेव्हा "शांतीचे बंधन"असेल( इफिस ४:३). "आत्म्याचे चिंतन शांती आहे" (रोम ८:६).