WFTW Body: 

एक चांगला विवेकभाव व प्रामाणिक विश्वास या अशा वाहिनीच्या दोन तरंगणाऱ्या मार्गदर्शक खुणा आहेत ज्यामधून आपल्या जीवनाचे तारू गेले पाहिजे. जे लोक या दोन्हींपैकी एकाही खुणेकडे दुर्लक्ष करतात ते आपल्या जीवनाचे तारू उद्ध्वस्त करतात (१ तीमथ्य १:१९,२०)

त्यामुळे आपल्या विवेकाभावाची संवेदनशीलता कायम जपण्याची काळजी घ्या. जेव्हा जेव्हा तुमचा विवेकभाव विचलित होतो , तेव्हा तुम्ही खात्री बाळगू शकता की तुम्ही सुरक्षित वाहिनी सोडली आहे आणि धोकादायक पाण्यात आहात. सद्सद्विवेकबुद्धीच्या इशारा - घंटांकडे दुर्लक्ष करून जर तुम्ही त्या मार्गाने जात राहिलात, तर तुमच्या जीवावर बेतण्याचा मोठा धोका निर्माण होईल. त्यामुळे या बाबतीत खूप, खूप काळजी घ्या.

विश्वास ही दुसरी तरंगणारी मार्गदर्शक खूण आहे जी सुरक्षित वाहिनी दर्शविते. विश्वास म्हणजे आपल्या व्यक्तित्वाचे देवावर संपूर्णपणे अवलंबून असणे, त्याच्या न बदलणाऱ्या प्रीतीवर, त्याचे सर्वशक्तिमान सामर्थ्य आणि त्याच्या परिपूर्ण ज्ञानावर पूर्ण भरवसा ठेवणे होय.

देवाची न बदलणारी प्रीती, आपल्या जीवनात जे काही येण्यास देव परवानगी देतो ते सर्व काही ती निश्चित करते. ज्या प्रार्थना-विनंत्या नाकारल्या जातात, त्याही त्याच परिपूर्ण दैवी प्रीतीमुळे नाकारल्या जातात.

देवाचे सर्वशक्तिमान सामर्थ्य आपल्याला सहन करता येणार नाही अशा कोणत्याही परिक्षेला, आपल्यावर येण्यापासून नेहमीच रोखेल (१ करिंथ १०:१३); आणि आपल्याजवळ येणाऱ्या प्रत्येक मोहावर मात करण्यास ते आपल्याला मदत करेल (इब्री ४:१६). आणि ते आपल्याकरता जे काही आपल्या मार्गावर येईल ते सर्वकाही आपल्याकरता कल्याणासाठी असे करेल (रोम ८:२८).

देवाचे परिपूर्ण ज्ञान आपल्या जीवनात येऊ देणाऱ्या कोणत्याही गोष्टीत कधीही चूक करणार नाही - आणि आपल्या सर्वकाळच्या भल्यासाठी काय आहे हे केवळ त्यालाच माहीत आहे.

देवाच्या या तीन गुणांवरचा तुमचा पूर्ण भरवसा तुम्ही कधीही गमावू नये. विश्वासाने जगणे म्हणजे हेच आहे. दुर्दैवाने, "विश्वासाने जगणे" ह्या शब्दांचा अर्थ पूर्ण-वेळ सेवा करणाऱ्यांनी देव आपल्या आर्थिक गरजा भागवतो असा बदलला आहे. पण हा शब्दाचा चुकीचा वापर आहे. पवित्र शास्त्र म्हणते की सर्व "नीतिमान विश्वासाने जगतील" (रोमकरांस पत्र १:१७). पवित्र शास्त्रामधील शब्दांचा वापर नेहमी पवित्र शास्त्रामध्ये ज्याप्रकारे केला जातो त्याच प्रकारे आपण त्यांचा वापर केला पाहिजे.

जर आपण विश्वास आणि चांगला विवेकभाव या बाबतीत निष्काळजी राहिलो, तर हळूहळू आपण वाईट अंतःकरण (अविवेक) आणि अविश्वासणारे अंतःकरण (विश्वास गमावलेले) विकसित करू. यामुळे आपण देवापासून दूर जाऊ शकतो. (इब्री ३:१२).

अशा प्रकारच्या अडखळण्यापासून आपले रक्षण करण्यासाठी, आपल्याला दररोज एकमेकांना उपदेश करण्यास आणि बोध करण्यास सांगितले जाते (पुढील वचन पहा, इब्री ३:१३). त्यामुळे तुम्ही दररोज शास्त्रवचनांतील काही बोध घेणे चांगले आहे - शास्त्रवचनांचे वाचन व मनन करण्याद्वारे, किंवा चांगल्या ख्रिस्ती पुस्तकांचे वाचन करण्याद्वारे किंवा मंडळीच्या सभांमध्ये आणि चित्र वा ध्वनीफीत संदेश ऐकण्याद्वारे.