मत्तय ४:९ मध्ये, सैतानाने येशूला एका अतिशय उंच डोंगरावर नेऊन त्याला जगातील सर्व राज्ये आणि त्यांचे वैभव दाखविले आणि म्हणाला, "जर तू पाया पडून मला नमन करशील तर मी हे सर्वकाही काही तुला देईन." त्याला (सैतानाला) नेहमीच हेच हवे होते आणि आणि त्यामुळेच तो सैतान बनला. तो देवाने निर्माण केलेल्या देवदूतांचा प्रमुख होता, तो सुंदर, ज्ञानाने परिपूर्ण, विश्वातील सर्वोच्च स्थान असलेला, मानवाच्या निर्मितीच्या खूप आधी त्याची निर्मिती केली होती. आपण यशया १४ आणि यहेज्केल २८ मध्ये या सर्वोच्च देवदूताचा इतिहास वाचतो. आपल्याला त्याचे नाव माहित नाही, पण त्याला देदीप्यमान तारा (यशया १४:१२) असे म्हटले आहे, ज्याचे लॅटिनमध्ये "लुसिफर" असे भाषांतर केले आहे. म्हणून त्याला त्या नावाणे ओळखतात, परंतु ते त्याचे खरे नाव नाही. आपल्याला त्याचे नाव माहित नाही, परंतु देवदूतांच्या या प्रमुखाची इच्छा होती की देवदूतांनी देवाची उपासना न करता त्याची उपासना करावी. यशया १४ मध्ये तो तेच म्हणतो, "मी स्वतःला देवासारखे करीन". लक्षात ठेवा की – जेव्हा कोणालातरी स्वतःची उपासना हवी होती, जेव्हा कोणीतरी देवाविरुद्ध बंड करु इच्छित होते, आणि जेव्हा कोणाचे तरी हृदय अभिमानाने उंचावले होते आणि देवदूतांनी त्याची प्रशंसा करावी असे वाटत होते तेव्हा हयाद्वारे पापाची उत्पत्ति झाली.
हे पापाचे मूळ आहे. जगातील पहिले पाप खून किंवा व्यभिचार नव्हते; तर इतर लोकांनी तुमची प्रशंसा करन्याची इच्छा असणे हे होते. जर तुमची हीच इच्छा असेल, तर मग तुम्ही कोणीही असो, जरी तुम्ही स्वतःला ख्रिस्ती किंवा उपदेशक म्हणत असाल, आणि जर तुम्हाला लोकांनी येशू ख्रिस्ताची नाही तर तुमची प्रशंसा करावी असे वाटत असेल, तर सैतान ज्या मार्गाने चालला त्याच मार्गाने तुम्ही देखील चालत आहात. हे धोकादायक आहे कारण ते शेवटी नरकात घेऊन जाते. सैतान तेव्हा ते मिळवू शकला नाही; कारण तेव्हा त्याला स्वर्गातून बाहेर टाकण्यात आले होते, परंतु आता तो पुन्हा ते मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. सैतान म्हणतो, "पाया पडून मला नमन कर, आणि माझी उपासना कर." पण येशू म्हणाला, “अरे सैताना, चालता हो, कारण असा शास्त्रलेख आहे की, ‘परमेश्वर तुझा देव ह्याला नमन कर, व केवळ त्याचीच उपासना कर.’” आपण फक्त एकाच व्यक्तीची उपासना केली पाहिजे. तेजस्वी दूतांची आणि देवाच्या महान सेवकांची उपासना करण्याची चूक आपल्याकडून होण्याची शक्यता आहे. प्रकटीकरण २२:८ मध्ये, महान प्रेषित योहानानेही ही चूक केली. प्रकटीकरणाच्या पुस्तकात प्रकट झालेल्या अद्भुत गोष्टी योहाणाने ऐकल्या व पाहिल्या तेव्हा हे त्याला दाखविणाऱ्या देवदूताला नमन करण्यासाठी तो त्याच्या पाया पडला. कल्पना करा, जर ९५ वर्षांचा प्रेषित योहान, जो इतक्या काळापासून प्रभूला ओळखत होता, त्याच्याकडून देवाच्या एका महान सेवकाची प्रशंसा करण्याची चूक झाली, तर आपल्यापैकी कोना कडूनही तशी चूक होऊ शकते. आपण देवाच्या एखाद्या महान सेवकाची इतकी प्रशंसा करू नये की आपण आपला देवाशी संपर्क केवळ त्या सेवकाद्वारेच करू.
जेव्हा एखादा उपदेशक किंवा पाळक देवामध्ये आणि मानवांमध्ये दुसरा मध्यस्थ होण्याचा प्रयत्न करतो, तिथे तुम्हाला सावधगिरी बाळगावी लागेल. जुन्या करारातील संदेष्टे हे असे लोक होते जे देवाची इच्छा लोकांना सांगत असत, परंतु नवीन करारात, देव आणि मानवांमध्ये फक्त एकच मध्यस्थ आहे आणि तो म्हणजे प्रभु येशू ख्रिस्त. ख्रिस्त आणि तुमच्यामध्ये दुसरा मध्यस्थ होण्यासाठी तुम्हाला पाळक किंवा उपदेशक किंवा देवाच्या कोणत्याही सेवकाची गरज नाही. तुम्हाला मरीयेची गरज नाही. तुम्हाला इतर कोणाचीही गरज नाही. तुम्ही थेट येशूकडे आणि त्याच्याद्वारे पित्याकडे जाऊ शकता. पण योहानाने जशी चूक केली तशीच चूक आपल्याकडूनही होऊ शकते. प्रकटीकरण २२ मध्ये, आपण येथे या महान देवदूताचा विश्वासूपणा देखील पाहतो. तो म्हणतो, "असे करू नको ; माझी उपासना करू नको."
असे प्रचारक, पाळक आणि ख्रिस्ती नेते कुठे आहेत जे इतर ख्रिस्ती लोकांना त्यांच्याशी जोडले जाऊ देणार नाहीत, जे त्यांना दूर करतील आणि म्हणतील, "माझ्याशी जोडले जाऊ नका; स्वतः ख्रिस्ताशी जोडले जाण्याचा प्रयत्न करा"? जो तुम्हाला स्वतःशी जोडले जाऊ देण्यास नकार देतो आणि तुमच्यासाठी देवाची काय इच्छा आहे हे शोधण्यास नकार देतो, परंतु तुम्हाला सांगतो, "देव तुमचा पिता आहे, त्याच्याकडे थेट जा, तोच तुम्हाला त्याची तुमच्यासाठी काय इच्छा आहे हे दाखवेल" असे सांगतो, तो देवाचा खरा सेवक आहे ज्याचे तुम्ही कोणत्याही भीतीशिवाय अनुसरण करू शकता. कारण इब्री लोकांस ८:११ मध्ये देवाचे नवीन कराराचे वचन आहे की , "तेव्हा परमेश्वराला ओळखा, असे प्रत्येक जण आपल्या सहनागरीकाला, आणी प्रत्येक जण आपल्या बंधुला,' असे शिकवणार नाही, कारण त्यातील लहानापासून थोरापर्यंत सर्वजण मला ओळखतील." याचा अर्थ असा की जो नव्याने जन्मला आहे, ख्रिस्तामध्ये एक बाळ आहे अश्या व्यक्तिपासून ते अगदी देवाच्या सर्वश्रेष्ठ, सर्वात महान सेवकापर्यंत, सर्वजण त्याला वैयक्तिकरित्या ओळखू शकतात. म्हणून देवदूत म्हणतो, "माझी उपासना करू नको. मी तुझ्या सोबतीचा, तुझे बंधु संदेष्टे ह्यांच्या सोबतीचा दास आहे, तुला देवाची उपासना करण्याची आवश्यकता आहे."