लेखक :   झॅक पुननं श्रेणी :   शिष्य
WFTW Body: 

नवीन करारामध्ये महत्वाच्या विषयांपैकी पवित्र आत्मा देखील एक महत्वाचा विषय आहे. तसेच यशया 40-66 मध्ये देखील पवित्र आत्मा महत्वाचा विषय आहे.

'्याहा; हा माझा सेवक, याला मी आधार आहे'' (यशया 42:1). देवाचा खरा सेवक तो असतो ज्याला देवाचा आधार असतो. त्याला पैशाचा किंवा कोणत्या संस्थेचा आधार नसतो. आपल्याला सदैव प्रभुचाच केवळ आधार असावा. लोक आपल्याला पैसा देतील किंवा अनुदान देतील. परंतु आपण लोकांवर व पैशावर विसंबून राहू नये. ''आधार'' या शब्दाचा संबंध 'विसंबून राहणे' या शब्दाशी आहे. आपण केवळ प्रभुवर विसंबून राहावे. जेव्हा आपण असहाय्य स्थितीत असतो तेव्हा देव आपल्यावर त्याचा आत्मा ओततो.

यशया 42:2,3 मध्ये पुढील प्रमाणे लिहिले आहे, 'तो गवगवा करणार नाही, तो आपला स्वर उच्च करणार नाही'' हे शब्द येशूकरिता वापरले आहेत. त्याच्याविषयी मत्तय 12:18 मध्ये लिहिले आहे. यशयामध्ये पुढील वचनात म्हटले आहे, ''तो रस्त्यातून पुकारा करणार नाही, चेपलेला बोरू तो मोडणार नाही.'

ह्याचा अर्थ असा की प्रभु चुकलेल्या कोणत्याही व्यक्तीला निराश करणार नाही तर धीर देईल व बरे करील. मिणमिणत्या मेणबत्तीला तो विझविणार नाही. त्या मेणबत्तीला तो मोठ्या प्रमाणात जळते ठेवील. चुकलेल्या व उणे असलेल्या विश्वासणार्यांना देव मदत करू इच्छितो. जे निराश व दुःखी आहेत त्यांना प्रभु सहाय्य करू इच्छितो व त्यांचा आत्मा उचलून धरू इच्छितो.

प्रभुचा खरा दास सुद्धा धीर देण्याची सेवा करीत असतो. जे निराश व हताश आहेत, ज्यांच्यापुढे आशा नाही व जे जीवनाला थकले आहेत त्यांना प्रभुचा खरा दास उचलून धरितो. आपण सर्वांनी अशी सेवा करावी कारण सर्वत्र आपल्यासारख्या लोकांची गरज आहे.

यशया 42:6-8 मध्ये प्रभु पुढीलप्रमाणे म्हणतो, 'ट्टी परमेश्वराने न्यायानुसार तुला बोलाविले आहे.आंधळ्यांचे डोळे उघडावे, बंदीशाळेतून बंदिवानास व अंधरात बसलेल्यांस कारागृहांतूनबाहेर काढावे म्हणून मी असे करीन.'' ही महान सेवा आहे. परंतु एक गोष्ट नेहमीलक्षात ठेवावी. '्य्रभु परमेश्वर म्हणतो, ट्टी आपले गौरव दुसर्यांस देऊ देणार नाही' ' (यशया 42:8). आपल्या सेवेमध्ये आपण स्वतः गौरव घेऊ नये. स्वतःला श्रेय देणे किंवा स्वतःचे गौरव करून घेणे गंभीर गुन्हा आहे. पैसे चोरण्यापेक्षा हे गंभीर स्वरूपाचे पाप आहे. देव तुमच्यावर व तुमच्या सेवेवर आशीर्वाद पाठवो व तुमचा अद्भुत रीतीने उपयोग करून घेवो. तो असे करील परंतु, तो स्वतःचे गौरव कोणा दुसर्याला देणार नाही. तुम्ही देवाच्या गौरवाला स्पर्श करण्यास सुरुवात केल्याबरोबर तुम्ही स्वतःचा नाश कराल. प्रभुच्या अनेक सेवकांनी अशाप्रकारे स्वतःचा नाश करून घेतला. लोकांपुढे तुम्हीस्वतःची जाहीरात करू लागल्यास, लोकांना प्रभुकडे न नेता स्वतःकडे ओढल्यास व देवाच्या कार्याचे श्रेयस्वतः घेतल्यास तुम्ही मोठा धोका ओढवून घेतला आहे असे समजावे. अशाप्रकारे हजारो सेवकांनी देवाचा अभिषेक गमाविला आहे.

यशया 42:19 , 'ट्टाझ्या सेवकाखेरीज कोण आंधळा आहे? मी पाठवितो त्या माझ्या दूतासारख कोण बहिरा आहे? माझ्या भक्तासारखा कोण आंधळा आहे? परमेश्वराच्या सेवकासारखा कोण आंधळा आहे?' हे वचन गोंधळविणारे वाटते. परंतु, या वचनात येशूविषयी सांगितले आहे (पहिल्या वचनातून आपल्याला कळेल).

या वचनाचा अर्थ काय? या वचनाचा अर्थ असा की देवाचा खरा सेवक अनेक गोष्टींसाठी आंधळा व बहिरा असतो. सभोवताली असलेल्या अनेक गोष्टींसाठी तो आंधळा व बहिरा असतो. त्याला अनेक गोष्टी दिसतात परंतु, त्याकडे तो लक्ष देत नाही (यशया 42:20). तो लोकांची पापे शोधत नाही. तो लोकांमध्ये चुका शोधण्याकरिता त्यांचे ऐकत नाही. परूशी लोक तसे करीत असत. ते येशूचे बोलणे ऐकत असत जेणेकरून त्याच्यात काही चूक शोधता येईल. ते येशूमध्ये दोष शोधत असत. आज अनेक ख्रिस्ती लोक परूश्यांसारखे वागतात. ते वाट बघत असतात की पुढील व्यक्तीच्या बोलण्यात चूक सापडावी, कारण त्या व्यक्तीच्या सेवेविषयी त्यांना हेवा वाटतो. आपण तसे नसावे.

आपल्या सभोवती असलेल्या अनेक गोष्टींप्रती आपण बहिरे व आंधळे असावे. कोणी तुमच्यावर खोटा आरोप लावलेला आहे का? तुम्ही बहिरे असते तर तुम्ही तो आरोप ऐकू शकले नसते. बहिरे असा! आकर्षित स्त्रिया दिसू नये म्हणून प्रभुच्या दासाने आंधळे असणे चांगले नाही का? तुम्हाला डोळे आहेत पण तुम्ही पाहात नाही. तुम्ही आंधळे आहात! तुम्हाला कान आहेत परंतु तुम्ही ऐकत नाही! कारण तुम्ही डोळ्यांनी पाहून व कानांनी ऐकून कोणाचा न्याय करीत नाही. येशू देखील अशाच प्रकारे जीवन जगला. आपण देखील त्याच्यासारखे जीवन जगावे (यशया 11:3).