लेखक :   झॅक पुननं श्रेणी :   साधक
WFTW Body: 

रोमकरांस पत्र अध्याय 6 मधील वचन बघू या. जुन्या व नवीन करारातील भिन्नता या वचनात थोडक्यात मांडली आहे. रोम 6:14 मध्ये आपण वाचतो ''तुम्ही नियमशास्त्राधीन नाहीं, तर कृपेच्या अधीन आहां, म्हणून पाप तुमच्यावर सत्ता चालविणार नाहीं''. ''नियमशास्त्र'' हा शब्द जुना करार दर्शवितो. हा करार इस्राएली लोक व देवामध्ये झाला. कराराच्या अटी नियमशास्त्रामध्ये आहेत. कृपा हा एक शब्द असून तो देवाचा नवीन करार दर्शवितो. हा प्रभु येशू ख्रिस्ताद्वारे स्थापीत करण्यात आला. कृपेमध्ये नवीन कराराच्या सर्व अटी आहेत. याठिकाणी म्हटले आहे की तुम्ही नियमशास्त्राच्या अधीन असू शकता किंवा कृपेच्या अधीन असू शकता. प्रमाण हे आहे की तुम्ही नियमशास्त्राच्या अधीन नसून कृपेच्या अधीन असता तेव्हा हा पाप तुमच्यावर सत्ता चालवीत नाही. आपण दसु र्या शब्दात अशाप्रकारे म्हणू शकतो की जर आपण कृपेच्या अधीन नसून नियमशास्त्राच्या अधीन आहोत तर पाप आपल्यावर सत्ता चालविते. आपण नियमशास्त्राच्या अधीन आहोत की कृपेच्या अधीन आहोत ह्याची पारख करण्याकरिता आपण किती नीतीनियम पाळतो हे बघणे वाजवी नसून पापाची सत्ता आपल्यावर आहे किंवा नाही हे बघणे वाजवी आहे. पापाची सत्ता आपल्यावर नसेल तर आपण कृपेच्या अधीन आहोत. तुमची पापावर सत्ता आहे का?

हा प्रश्न फार महत्वाचा आहे, कारण येशू जे देण्याकरिता आला व जुन्या करारांतर्गत मोशे जे देण्याकरिता आला त्यातील भिन्नता अनेक लोकांना कळत नाही. आता मी तुम्हाला एक सोपा प्रश्न विचारतो : कोण श्रेष्ठ आहे? मोशे की प्रभु येशू ख्रिस्त? उत्तर सोपे आहे. मोशे दास आहे आणि प्रभु येशू हा धनी आहे. स्पष्टपणे आपण सांगू शकतो की मोशेपेक्षा येशू कितीतरी पटीने श्रेष्ठ आहे.

तुम्हाला आता स्पष्टपणे कळले आहे की मोशेद्वारा देवाने इस्राएली लोकांसोबत जो करार केला त्याच्यापेक्षा येशूद्वारे देवाने जो नवीन करार स्थापन केला तो श्रेष्ठ आहे. तुम्हाला कळले आहे की मोशेपेक्षा येशू श्रेष्ठ आहे. आपण म्हणू शकतो की मोशे आणि त्याचे नियमशास्त्र जुन्या करारातील लोकांना जीवनाच्या विशिष्ट पातळीवर आणू शकते तर येशू आणि त्याचा नवा करार सुद्धा लोकांना अधिक उच्च पातळीवर नेऊ शकतोतुम्ही म्हणू शकता की एका विशिष्ट पातळीवर तो आपल्याला नेऊ शकतो. आपण म्हणू शकतो की जुना करार आपल्याला चालवितो तर नवीन करार आपल्याला हवेत उडवितो. सायकल चालविणे आणि विमानात बसणे यातील ही भिन्नता आहे. सायकल आणि विमानात मोठी भिन्नता आहे. त्यांच्या वेगामध्ये देखील मोठी भिन्नता आहे, जशी सायकल आणि विमानात भिन्नता आहे तशीच जुन्या करारात व नवीन करारात भिन्नता आहे. सायकलप्रमाणे जुना करार तुम्हाला एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी हळूवार गतीने नेऊ शकतो. नवीन करार तुम्हाला विमानाप्रमाणे मोठ्या वेगाने एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी नेऊ शकतो. जुन्या कराराद्वारे मानवाची देवासोबत विशिष्ट सीमेपर्यंत सहभागिता होऊ शकते. जुन्या करारातील निवासमंडपात आपल्याला हे दिसते. अति पवित्रस्थानात व याजकात मोठा पडदा होता. त्याठिकाणी सांगण्यात आले होते की विशिष्ट सीमेपर्यंत तुम्ही जाऊ शकता; परंतु तुम्हाला पडदा ओलांडता येणार नाही. तुम्हाला माहीत आहे की पडद्यामागे देव वास करीत असे. हे जुन्या करारातील मंदिर होय. देवाच्या उपस्थितीत कोणीही जाऊ शकत नसे. त्याठिकाणी याजकाला केवळ वर्षातून एकदा जाण्याची परवानगी होती. कोणालाही अति पवित्रस्थानी जाण्याची परवानगी नव्हती. परंतु, प्रभु येशू ख्रिस्त वधस्तंभावर मरण पावला तेव्हा हा पवित्र स्थानातील पडदा वरपासून खालपयर्तं पूर्णपणे फाटला. त्याद्वारे आपल्याला दाखविण्यात आले की देवाच्या उपस्थितीत जाण्याचे द्वार खुले झाले. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छितो, ''पडदा फाटला आणि देवाच्या उपस्थितीत जाण्याचे द्वार खुले झाले तर आपल्या जीवनाची पातळी वा दर्जा उंचावला जावा की कमी व्हावा? जुन्या करारातील लोकांपेक्षा आपले जीवन उच्च प्रतीचे असावे की कमी प्रतीचे असावे?'' उत्तर स्पष्ट आहे. देवाची उपस्थिती नसताना नियमशास्त्राच्या भरवंशावर जर लोक आपले जीवन एका विशिष्ट पातळीवर नेऊ शकत होते तर देवाच्या उपस्थितीत आपण आपले जीवन किती अधिक उंच पातळीवर नेऊ शकतो. तरी देखील अनेक ख्रिस्ती लोकांना हे सत्य कळले नाही व त्याचा अर्थ कळला नाही. अनेक वेळा आपण ऐकतो की ख्रिस्ती लोक भयंकर पापात पडतात. एलीया संदेष्टा किंवा बाप्तिस्मा करणारा योहान कोणा स्त्रीच्या किंवा पैशाच्या मागे पळाले असे आपण ऐकले का? ते कृपेच्या अधीन नव्हते. अति पवित्र स्थानात जाण्याची मुभा त्यांना नव्हती. तरीदेखील त्यांनी जीवनात एक विशिष्ट पातळी गाठली होती. तर आपण विश्वास बाळगून किती अधिक उच्च पातळी गाठावी? नवीन करारांतर्गत आपल्याला अधिक उंच पातळी गाठण्याची संधी नाही का?

याठिकाणी पौल तेच सांगतो. पापाची सत्ता तुमच्यावर नसावी कारण तुम्ही नियमशास्त्राच्या अधीन नसून कृपेच्या अधीन आहात. योहान 11:11 मध्ये येशूने म्हटले की बाप्तिस्मा करणार्या योहानाच्या दिवसापर्यंत केवळ बाप्तिस्मा करणारा योहान श्रेष्ठ मानव होऊन गेला. मग पुढे येशूने म्हटले की जो स्वर्गाच्या राज्यात म्हणजे देवाच्या राज्यात कनिष्ठ राहील तो योहानापेक्षा श्रेष्ठ असेल. येशू सांगू इच्छित होता की नियमशास्त्र मानवाला ज्या उंचीवर नेऊ शकते त्यापेक्षा कितीतरी पटीने वरच्या उंचीवर देवाच्या दुर्बळतात दुर्बळ लेकराला कृपा नेऊ शकते. म्हणजेच काही विशिष्ट विश्वासणारेच बाप्तिस्मा करणार्या योहानापेक्षा वरची पातळी गाठतील असे नाही. तर देवाची इच्छा आहे की देवाच्या प्रत्येक लेकराने बाप्तिस्मा करणार्या योहानापेक्षा वरची पातळी कृपेच्या अधीन होऊन गाठावी. परंतु, कृपेअधीन होऊन वरच्या पातळीचे जीवन जगणे ही वेगळी बाब आहे. जर त्यांना देव देत असलेली कृपा कळाली व तिचा त्यांनी प्रभु येशू ख्रिस्ताद्वारे स्वीकार केल्यास हे शक्य आहे इब्री 4:16 मध्ये आपण 'दया' हा शब्द वाचतो. जेव्हा आपण या शब्दाची तुलना करितो तेव्हा आपल्याला सांगण्यात आले आहे की आपण धैर्यानें कृपेच्या राजासनाजवळ जावे; जेणेकरून आपल्यावर दया व्हावी आणि गरजेच्या वेळी कृपा प्राप्त व्हावी. मागील अभ्यासामध्ये मी सांगितले आहे की दया आणि कृपेमध्ये भिन्नता आहे. दया हा जुन्या कराराचा शब्द आहे. जुन्या करारामध्ये या शब्दाचा उपयोग पुष्कळवेळा झाला आहे. दाविदाने सुद्धा या शब्दाचा उल्लेख केला आहे. या दयेमुळेच जुन्या करारातील लोकांच्या पापांवर पांघरूण घालण्यात आले आणि त्यांची क्षमा करण्यात आली. ते शुद्ध झाले नव्हते. म्हणूनच दावीद म्हणाला, ''ज्याच्या पापांवर पांघरूण घालण्यात आले आहे तो धन्य.'' येशू वधस्तंभावर मरण्यापूर्वी कोणाचेही पाप धुतल्या गेले नाही. ते शुद्ध होऊ शकले नाही. तोवर केवळ त्यांच्या पापांवर पांघरूण घालण्यात आले. त्यांची क्षमा करण्यात आली. स्तोत्र 103 मध्ये दावीद म्हणतो, ''हे माझ्या जिवा, परमेश्वराचा धन्यवाद कर, त्याचे सर्व उपकार विसरू नको; तो तुझ्या सर्व दुष्कर्मांची क्षमा करितो.'' ही दया होती आणि आपल्या सर्वाना दयेची गरज आहे. आपल्याला दयेची गरज आहे आणि पापापासून क्षमा मिळण्याची गरज आहे. परंतु त्यापलीकडे नवीन करारामध्ये काही महत्वाचे आहे. होय, कृपा महत्वाची आहे. कृपा ही दयेपलीकडे आहे. भविष्याकरिता ही दया आपली मदत करिते. आपल्या स्वभावामधील मोहावर विजय मिळविण्याकरिता ती सहायक असते. आणि याठिकाणी म्हटले आहे की आपण कृपेच्या राजासनाजवळ येऊ शकतो. याठिकाणी आपल्याला दया प्राप्त होते. आपल्या गरजेच्या वेळी आपल्याला कृपा प्राप्त होते.

आता ऐनवेळी किंवा गरजेच्या वेळी म्हणजे काय? ऐनवेळ म्हणजे आपल्या देहातील मोहामुळे आपल्यावर मोठा दबाव येतो ती वेळ म्हणजे ऐनवेळ. ह्यावेळी सैतान आपल्यावर दबाव आणतो की आपण पाप करावे. आपले पतन व्हावे म्हणून सैतान या वेळी आपल्यावर मोह आणतोदेव सांगतो की अशावेळी कृपा आपली मदत करेल. कृपा ही सहाय्य करिते. ऐनवेळी ती आपले सहाय्य करिते. पापाच्या मोहावर मी विजय मिळवावा ही माझी गरज असल्यास कृपा ऐनवेळी मला सहायक होईल. उदा. मी डोंगरावर चढत आहे आणि पाय घसरून पडणार आहेतेव्हा मी जर देवाला सहाय्य मागतो तर देव मला उचलून धरितो आणि स्थिर उभे करितो जेणेकरून मी पडू नये. परंतु, सहाय्य मिळावे अशी मी देवाला विनंती करीत नाही व स्वतःला वाचविण्याचे मी स्वतःच प्रयत्न करितो, तर त्यात अपयशी होऊन मी खाली पडतो व माझीहाडे मोडतात. मग मी देवाला सहाय्य मागतो तेव्हा एक अॅम्बुलन्स येते व मला उचलून दवाखाण्यात नेते. ही सुद्धा मदतच आहे. परंतु याला दया म्हणावी. माझे पतन झाल्यावर देव मला उचलतो, माझी क्षमा करितो, मला दवाखाण्यात नेतो, मलहमपट्टी करितो आणि चांगले आरोग्य देतो. अनेक ख्रिस्ती लोकांचा हा अनुभव आहे. ते पतन पावतात आणि देवाला मदत मागतात. परंतु, यापेक्षा दुसरा चांगला मार्ग नाही का? नक्कीच आहे. कृपा ऐनवेळी महा सहायक होईल. मोहावरती मला विजय मिळवून देईल आणि माझे पतन होणार नाही.

आता पुढील वेळी जेव्हा तुम्ही मोहात आहा, तुमच्यावर दबाव आहे आणि तुमचे पतन होणार त्यावेळी कृपेकरिता देवाकडे प्रार्थना करा. प्रयत्न करा आणि परिणाम पहा. तुम्ही देवाला अशाप्रकारे विनंती करा, ''प्रभो, यावर मी स्वतः विजय मिळवू शकणार नाही. मला तुझी मदत हवी आहे. मोहावर विजय मिळविण्याकरिता मला तुझी कृपा दे.'' क्षणात तुम्हाला कळेल की तुम्हाला कृपा प्राप्त झाली आहे व ती तुम्हाला यशस्वी करीत आहे.