WFTW Body: 

तूमच्या जीवनात जे काही घडते त्यामुळे तुम्ही कधीही स्वतःला निराश होऊ देऊ नका, कारण जर तुम्ही परमेश्वराला धरून राहिलात तर तो तुम्हाला प्रत्येक परिस्थितीवर मात करण्यास मदत करेल - मग ती कोणतीही असो. प्रत्येक परीक्षा ही त्याच्याद्वारे ह्यासाठी तयार केली गेली आहे कि जेणेकरून आपण त्याला अधिक चांगल्या प्रकारे जाणून घेऊ शकतो. अविश्वासणारे आणि जगिक विश्वासणारे दोघेही येथेच अपयशी ठरतात, देवाकडे वळण्याऐवजी ते जगाकडे वळतात आणि अपयशात किंवा संकटात आराम आणि शांती मिळवण्यासाठी निषिद्ध गोष्टींचा प्रयोग करतात. अशा गोष्टींचा कधीही प्रयोग करू नका. सुरुवातीला निरुपद्रवी दिसणार्‍या गोष्टींचे सुद्धा फार सहजपणे नंतर व्यसन लागते.

जे कधीही अयशस्वी होत नाहीत त्यांना परिपूर्णता प्राप्त होत नाही, परंतु जे त्यांच्या अपयशाबद्दल प्रामाणिक असतात आणि जे पडल्याबरोबर लगेच उठतात आणि सिद्ध होण्यासाठी पुठे जाण्यास प्रयत्नशील असतात त्यांना प्राप्त होते.

आपल्याला नेहमीच ‘धार्मिक’ बनण्याचा धोका असतो आणि आपण त्यालाच "आत्मिक असणे" समजतो. धार्मिक लोक बाह्य गोष्टींना महत्व देतात - परमेश्वरासाठी बाह्य त्याग, त्यांच्या बुद्धीच्या समजूतीनुसार काही परंपरा, की ज्यामुळे ते मंडळीमध्ये इतरांसाठी चांगले बनून राहण्यासाठी त्यांनी किमान काय केले पाहिजे अशा बाह्य परंपरा, मंडळीतील अनेक उपक्रम, बाह्य विधी पोशाख, वचनाचा बौद्धिक अभ्यास (रोजच्या जीवनात त्याचा वापर न करने ) आणि भावनिक सभांमध्ये (अशा भावनावादाला आत्म्याच्या सामर्थ्याचा पुरावा म्हणून कल्पना करणे) इत्यदि. यापैकी कोणतीही गोष्ट चुकीची किंवा महत्त्वाची नाही असे नाही. परंतु धार्मिक लोकांसाठी, हे सर्व प्राथमिक आहेत आणि ते त्यांलाच आत्मिक असण्याचे चिन्ह मानतात आणि त्यामुळे त्यांची फसवणूक होते.

तथापि, खरोखर आत्मिक लोक, देवाला अधिक चांगल्या प्रकारे जाणून घेण्याची इच्छा बाळगून, स्वतःला येशू आणि त्यांच्या सह-विश्वासणाऱ्या लोकांबद्दलच्या उत्कट प्रेमात टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करतात, देवाची त्यांच्यासाठी काय इच्छा आहे हे शोधण्याचा प्रयत्न करतात ('देवासाठी काहीतरी करण्यापेक्षा' '), पवित्र आत्म्याचे सामर्थ्य शोधणे आणि त्यांच्या कृतींमध्ये स्वार्थी हेतूंपासून स्वतःला शुद्ध करतात. धार्मिक लोक मंडळी बांधतात. आत्मिक लोक ख्रिस्ताचे शरीर बांधतात.

देव, त्याच्यासाठी उभे राहतील अशा लोकांना जगभर शोधत आहे; प्रुश्यासारख्यांना नाही ज्यांनी सत्य वाकवले व प्रमानाबाहेर केले आणि ज्यांनी मुरकूट गाळून काढले व उंट गिळले (मत्तय २३:२४) देव अशा मनुष्यांना शोधत आहे जे त्याच्या वचनाच्या तत्त्वांसाठी उभे राहतील, एलीया, बाप्तिस्मा देणारा योहान आणि पौल, मार्टिन ल्यूथर, जॉन वेस्ली आणि एरिक लिडेल सारखे पुरुष, जे, कितीही किंमत मोजावी लागली तरी त्यांचा जो विश्वास होता त्यावर ते ठाम उभे राहिले. अशा तत्त्वाच्या लोकांनी देव स्वर्ग भरवणार आहे. मी प्रार्थना करतो की तुम्ही त्यातिल एक असाल. तुम्हाला परमेश्वरासाठी उभे राहण्याच्या भरपूर संधी मिळतिल. तुम्ही प्रत्येक प्रसंगी असेच देवासाठी ठाम उभे रहा.

गेल्या शतकांमध्ये बायबलचे इंग्रजीत भाषांतर करण्यासाठी आणि सुवार्तेचा शुद्ध संदेश जतन करण्यासाठी अनेक ईश्वरिय पुरुषांनी आपले जीवन दिले आहे. पण दुर्दैवाने, आज अनेक विश्वासणारे त्यांच्या घरात बायबल वाचण्यासाठी पाच मिनिटेही घालवत नाहीत आणि त्याचा अभ्यास करण्यासाठी फारच कमी वेळ घालवतात. गेल्या शतकांत पुष्कळ धर्मी पुरुषांना आज आपल्याकडे असलेल्या शिकवणीची त्यावेलेस स्पष्ट समज नसावी. परंतु त्यांची ख्रिस्ताप्रती उत्कट भक्ती होती जसे की आजकाल क्वचितच आढळते - आणि अंतिम विश्लेषणात तेच सर्वात महत्त्वाचे आहे - केवळ शिकवणीची अचूकता नाही.

विसरणे ही पापासारखी गंभीर बाब नाही. पण त्यावर मात केल्याने तुमच्या अनेक गैरसोयी वाचू शकतात. आपण सारेच विसरभोळे आहोत. माझ्या विस्मरणावर मात करण्यासाठी,मला आवश्यक असलेल्या महत्त्वाच्या बाबी एका लहान वहीत लिहितो आणि ती मी नेहमी माझ्यासोबत ठेवतो. परमेश्वर माझ्याशी जे बोलतो त्या गोष्टीही मी त्यात लिहून ठेवतो. मला असे आढळून आले आहे की जर मी ते लिहून ठेवले नाही तर मी अनेकदा प्रभु माझ्या बरोबर काय बोलला ते मी विसरतो.