लेखक :   झॅक पुननं
WFTW Body: 

ख्रिस्ती धर्माची पहिली ३०० वर्षे जवळजवळ सर्व ख्रिस्ती, ख्रिस्तीविरोधी शासकांच्या नेतृत्वाखाली राहत होते ज्यांनी बऱ्याचदा त्यांचा छळ केला आणि त्यांपैकी अनेकांना जिवे मारले. देवाने आपल्या महान सुज्ञतेने लोकांना त्याच्या गौरवासाठी आपल्या मुलांचा छळ करण्याची परवानगी दिली. आजही देवाने त्याच्या काही सर्वोत्तम मुलांना त्यांचा छळ करणाऱ्या सरकारच्या शासनात राहण्याची परवानगी दिली आहे. मंडळीची नेहमीच छळ होत असताना उत्तम वाढ झाली आहे. पण जेव्हा मंडळी सुलभता, सोय आणि भौतिक समृद्धी अनुभवते तेव्हा बहुतेक वेळा ते जगिक बनते. जोपर्यंत आपण जगात आहोत तोपर्यंत आपल्याला संकटे, छळ आणि कसोट्यांना सामोरे जावे लागेल. त्यामुळे आपण सोप्या काळाची अपेक्षा करण्याची गरज नाही - आपल्या कामाच्या ठिकाणी किंवा आपल्या वैयक्तिक जीवनात -आपण या युगाच्या शेवटाकडे येत असताना.

आर्थिक अडचणींचा समय येईल. त्यामुळे आपण आताही साधेपणाने जगायला शिकले पाहिजे. जे ऐषोरामात राहतात त्यांना येत्या काही दिवसांत गोष्टी खूप कठीण जातील. भविष्यासाठी पैसे वाचवण्यात आपण शहाणे असले पाहिजे, जेणेकरून आपल्याला इतरांवर अवलंबून राहावे लागणार नाही. पण आपला भरवसा आपल्या बचतीवर नव्हे तर केवळ प्रभूवर असला पाहिजे. देव ईर्ष्यावान देव आहे आणि निर्माण झालेल्या कोणत्याही गोष्टीवर तो आपल्याला कधीही भरवसा ठेवू देणार नाही. देव जगातील वित्तीय व्यवस्थेला हादरवेल, जेणेकरून निर्माण केलेल्या गोष्टींवर भरवसा ठेवणारे हादरून जातील. येशूने म्हटल्याप्रमाणे, भाऊ भावाचा विश्वासघात करताना आपल्याला दिसेल आणि आपले कुटुंबातील सदस्य आपले शत्रू बनताना दिसतील (मत्तय १०:२१). कार्यालयांमध्ये आणि कारखान्यांमध्ये विश्वासणाऱ्या बांधवांचा सक्रिय छळ केला जाईल. हे सगळे आपल्याला अधिक शुद्ध करेल आणि आपल्याला अधिक चांगले ख्रिस्ती बनवेल.१ पेत्र ३:१३ म्हणते की आपण नेहमी चांगल्याची आस्था बाळगली तर कोणीही आपले नुकसान करू शकत नाही. त्यामुळे, देवाच्या कृपेने आपण सर्वांचे भले करण्याचे ठरवले पाहिजे. जे आमचा द्वेष करतात त्यांच्यावर आपण प्रीती केली पाहिजे, आपल्याला शाप देणाऱ्यांना आशीर्वाद दिला पाहिजे आणि आमचा छळ करणाऱ्यांची क्षमा व्हावी यासाठी प्रार्थना केली पाहिजे. मग कोणीही आपले नुकसान करू शकणार नाही. सैतान आणि त्याचे दूत आपल्याला फसवू शकतात, आपल्याला त्रास देऊ शकतात, आपला छळ करू शकतात, आपल्याला लुटू शकतात, आपल्याला जखमी करू शकतात, आपल्याला तुरुंगात डांबू शकतात आणि आपल्या शरीराला ठारही मारू शकतात. पण ते आपले आत्मिक नुकसान कधीच करू शकणार नाहीत.

येत्या काही दिवसांत त्यांच्या विश्वासासाठी छळाला सामोरे जाण्यासाठी आपण जगभरातील ख्रिस्ती लोकांना तयार केले पाहिजे. आपल्या प्रभूने आपल्याला अशा दिवसांसाठी चार आज्ञा दिल्या आहेत:

१. " तुम्ही सापांसारखे चतुर व कबुतरांसारखे निरुपद्रवी व्हा." (मत्तय १०:१६).
आपल्या साक्ष देण्यात आपण मूर्ख नव्हे तर शहाणे असले पाहिजे. जिथे आपण राहतो आणि जिथे आपण काम करतो तिथे आपले जीवन ख्रिस्ताबद्दल बोलणारे असले पाहिजे. प्रभूच्या साक्षीत आपण हे स्पष्ट केले पाहिजे की आपण एका व्यक्तीबद्दल बोलत आहोत - येशू ख्रिस्त- आणि ख्रिस्ती धर्म इतर धर्मांपेक्षा श्रेष्ठ आहे याविषयी नाही. जेव्हा येशूला उंच केले जाईल तेव्हा तो लोकांना स्वतःकडे आकर्षित करेल (योहान १२:३२). ख्रिस्ती धर्मात रस असल्याचे भासवणाऱ्या गैर-ख्रिस्ती हेरांपासूनही आपण जागरूक असले पाहिजे, जेव्हा त्यांचा खरा हेतू आपल्याला आपल्या काही शब्दांवरून आपण "बळजबरीने त्यांचे धर्मांतर" करत आहोत असा आरोप करून न्यायालयात नेणे असू शकतो. त्यामुळे आपण सूज्ञ व प्रेमळ असले पाहिजे- जसा येशू होता : (क) "येशूला स्वतःला काही लोकांवर भरंवसा नव्हता , कारण त्यांच्या आत काय आहे हे त्याला माहीत होते." (योहान २:२३-२५). सर्वांची पारख करा. (ख) "येशू यहूदीयात फिरायला तयार नव्हता कारण तेथील यहुदी त्याला ठार मारण्याचा प्रयत्न करत होते" (योहान ७:१). अनावश्यक धोका टाळा. (ग) "तुमचा छळ करणाऱ्यांसाठी प्रार्थना करा" (मत्तय ५:४४). चांगले असा - आणि इतर जण वाईट असल्यामुळे वाईट बनू नका.

२. “परमेश्वराच्या मुखातून निघणार्‍या वचनाने जगा" (मत्तय ४:४).
छळाच्या वेळी, देव आपल्या हृदयाशी बोलत असलेल्या वचनाकडे संवेदनशील असणे ही सर्वांत महत्त्वाची अट आहे. आपण संपूर्ण दिवस देवाचे ऐकण्याच्या वृत्तीची सवय विकसित केली पाहिजे. मग आपण देवाकडून ऐकलेल्या वचनावर विश्वास ठेवला पाहिजे आणि त्याच्या आज्ञेचे पालन केले पाहिजे. अन्यथा त्याला काहीही किंमत नाही. त्यामुळे आपण देवाच्या वचनावर (विशेषतः नव्या करारावर) अधिक मनन केले पाहिजे- कारण फक्त अशाप्रकारेच आपण देवाचा आवाज ओळखू शकू. आणि मग आपण "विश्वास ठेवला पाहिजे व आज्ञा पाळली पाहिजे".

३. " जशी मी तुमच्यावर प्रीती केली तशी तुम्हीही एकमेकांवर प्रीती करावी. तुमची एकमेकांवर प्रीती असली म्हणजे त्यावरून सर्व ओळखतील की, तुम्ही माझे शिष्य आहात." (योहान १३:३४, ३५).
आपल्या घरात आणि आपल्या मंडळीत आपण एकमेकांचा न्याय करणे थांबवले पाहिजे, एकमेकांविरुद्ध पाठीमागे बोलणे, एकमेकांशी भांडणे आणि एकमेकांकडे संशयाने पाहणे सोडून दिले पाहिजे.पारख करणे हा एक दैवी गुण आहे, पण संशय धरणे हा सैतानी गुण आहे. आता आपल्या जीवनात पाप आणि सैतानाशी लढण्यावर लक्ष केंद्रित करण्याची वेळ आली आहे. आता आपल्या विवाहाच्या जोडीदारावर आणि आपल्या सहविश्वासू बांधवांवर झटून प्रीती करण्याची वेळ आली आहे.

४. "जगात तुम्हांला क्लेश होतील, तरी धीर धरा; मी जगाला जिंकले आहे." (योहान १६:३३).
देव सिंहासनावर आहे आणि तो कधीही स्वत:चे असणाऱ्यांचा त्याग करणार नाही. २००० वर्षांपूर्वी सैतानाचा पराभव झाला. आपण देवाच्या डोळ्याचे बुबूळ आहोत आणि म्हणून तो आपल्या भोवती अग्नीचा कोट असेल (जखऱ्या २:५, ८). आपल्याविरुद्ध तयार झालेले कोणतेही शस्त्र कधीही चालणार नाही (यशया ५४:१७). म्हणूनच, "तुमची वागणूक द्रव्यलोभावाचून असावी; जवळ आहे तेवढ्यात तुम्ही तृप्त असावे; कारण त्याने स्वतः म्हटले आहे, “मी तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही.” म्हणून आपण धैर्याने म्हणतो “प्रभू मला साहाय्य करणारा आहे, मी भिणार नाही; मनुष्य माझे काय करणार?”(इब्री १३:५, ६).

आपणही प्रार्थना करू या, "ये, प्रभू येशू, ये." (प्रकटीकरण २२:२०).