लेखक :   झॅक पुननं
WFTW Body: 

पौलाने इफिसकरांस लिहिलेल्या पत्रात शुभवर्तमानाचा समतोल संदेश आढळतो. /अध्याय १ ते ३ मध्ये एकही बोध दिलेला नाही. देवाने आपल्यासाठी काय केले आहे याचेच वर्णन या अध्यायांमध्ये नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर पुढील तीन अध्यायांमध्ये आपण देवासाठी काय केले पाहिजे याविषयीचा बोध देण्यात आला आहे. या शुभवर्तमानाच्या नाण्याच्या दोन बाजू आहेत. दोन्हींपैकी कोणतीही एक बाजू अनुपस्थित असेल तर नाणे (शुभवर्तमान) बनावट आहे. "निराळ्या शुभवर्तमानाचा" प्रचार करणाऱ्यांसाठी गलतीकरांस पत्र १:८,९ म/ध्ये एक शाप सांगितला आहे. त्यामुळे इतरांना - आपण संपूर्ण शुभवर्तमानाचा - आणि योग्य शुभवर्तमानाचा प्रचार करण्याची काळजी घेतली पाहिजे.

देवाने आम्हांला ख्रिस्तामध्ये स्वर्गीय गोष्टीत प्रत्येक आध्यात्मिक आशीर्वाद दिला आहे (इफिसकरांस पत्र १:३). देवाने जे केले आहे त्यापासून आपल्या ख्रिस्ती जीवनाची सुरुवात झाली पाहिजे. आमची त्याच्यावर प्रीती आहे कारण प्रथम त्याने आमच्यावर प्रीती केली (१ योहान ४:१९) आम्ही त्याची सेवा करतो, कारण प्रथम त्याने आमची सेवा केली. जगाच्या स्थापनेपूर्वी देव आपल्याला ओळखत होता (इफिसकरांस पत्र १:४). आपल्याला हे समजू शकत नाही कारण की आपल्याकडे भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य आहे, तर देवाचे नाव "मी आहे" आहे (निर्गम ३:१४). देव सार्वकालिक वर्तमानात राहतो. त्यामुळे त्याने काहीही निर्माण करण्यापूर्वी तो आम्हां प्रत्येकाला नावाने ओळखत होता. जगाच्या स्थापनेपूर्वीच त्याने आम्हांला ख्रिस्तामध्ये नेमले.

"ख्रिस्तामध्ये असणे" म्हणजे काय याचे एक उदाहरण येथे दिले आहे. जर तुम्ही कागदाचा एक तुकडा घेऊन पुस्तकाच्या आत ठेवलात आणि मग पुस्तक जाळले तर कागदही जाळला जाईल. जर तुम्ही पुस्तक जमिनीत पुरले तर तो कागदही पुरला जाईल. जर तुम्ही ते पुस्तक चंद्रावर यानातून पाठवले तर तो कागदही चंद्रावर जाईल. त्याचप्रमाणे आम्हांला ख्रिस्तामध्ये ठेवण्यात आले होते (चिरंतन काळापासून, देवाच्या मनामध्ये). त्यामुळे, इ.स. २९ मध्ये ख्रिस्ताला वधस्तंभावर खिळण्यात आले तेव्हा आम्हीही त्याच्याबरोबर खिळले गेलो. त्याला पुरण्यात आले तेव्हा आम्हीही त्याच्याबरोबर पुरले गेलो. तो मृतांमधून उठवला गेला आणि स्वर्गात चढला. "आणि आम्हास त्याच्याबरोबर उठवले आणि स्वर्गीय स्थानात ख्रिस्त येशूसोबत बसविले"(इफिसकरांस पत्र २:६).हे एक अद्भुत सत्य आहे. पण देवाच्या वचनावर विश्वास ठेवला तरच आपण हे वास्तव अनुभवू शकतो- अन्यथा नाही. “तुमच्या विश्वासाप्रमाणे तुम्हांला प्राप्त होवो.”(मत्तय ९:२९) हा देवाचा नियम आहे.

ख्रिस्तामध्ये देवाने आपल्याकरिता जे केले आहे त्यात आपण स्थापित झाले पाहिजे. हा पाया घातला गेला तरच इफिसकरांस पत्र ४ ते ६ मधील नव्या पद्धतीने चालण्याच्या आणि सैतानाचा प्रतिकार करण्याच्या व सैतानावर मात करण्याच्या बोधाने आपण आपले घर बांधू शकतो.अन्यथा आपण वारंवार निराशेच्या आणि आत्मनिंदेच्या दलदलीत फसू. त्यामुळे आधी इफिसकरांस पत्र अध्याय१ ते ३ वर पुष्कळ मनन करा.

पुष्कळ ख्रिस्ती लोक एका ठिकाणी पाया घालतात आणि मग दुसऱ्या ठिकाणी घर बांधतात! त्यामुळे घर कोसळते. इफिसकरांस पत्राच्या शेवटच्या तीन अध्यायांमध्ये आढळणारा प्रत्येक बोध देवाच्या आपल्यावरील प्रीतीवर आणि त्याने आपली केलेली परिपूर्ण स्वीकृतीवर आधारित आहे (ज्याचा पहिल्या ३ अध्यायांमध्ये उल्लेख केला आहे). हे प्राथमिक आहे. पण तरीही आपला कल ते विसरण्याकडे असतो. एके दिवशी आपल्याला असे वाटते की ४५ मिनिटे पवित्र शास्त्र वाचतो म्हणून देव आपल्याला स्विकारत आहे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला असे वाटते की शास्त्रवचने वाचायला एक मिनिटही मिळत नसल्यामुळे तो आपल्यावर नाखूष आहे आणि तो आपल्या प्रार्थना ऐकणार नाही. आणि जर काही चुकीचे घडले तर आपल्याला असे वाटते की त्या दिवशी आपण पवित्र शास्त्र वाचले नाही म्हणूनच हे झाले! आपल्याला देवाने पवित्र शास्त्र वाचनामुळे स्वीकारले आहे आणि ख्रिस्ताने आपल्यासाठी जे काही केले त्यामुळे नव्हे असा विश्वास धरणे ही अंधश्रद्धा आहे. पवित्र शास्त्र वाचन फार फार महत्त्वाचे आहे यात शंका नाही. पण हा आपल्या स्वीकृतीचा पाया नाही. तो पायावर असलेल्या इमारतीचा भाग आहे. या सत्यात तुम्ही प्रस्थापित होणे फार फार फार महत्त्वाचे आहे. अन्यथा शुभवर्तमान मानवकेंद्रित बनते - आणि तुम्ही पायामध्ये दरवाजे आणि खिडक्या घालाल! जे या सत्यांकडे (जे इफिसकरांस पत्र १ ते ३ मध्ये आढळते) दुर्लक्ष करतात किंवा त्यांचे अवमूल्यन करतात त्यांचा शेवट नेहमीच परूशीपणात होतो.

पण अर्थातच पाया घालण्याचा उद्देश संपूर्ण घर बांधणे हा आहे. त्यामुळे आपण पाया घालून थांबत नाही. आपण इमारत बांधत राहिले पाहिजे.

"कृपा" म्हणजे देवाने त्याचा हात लांबवून आपल्याला प्रत्येक स्वर्गीय आशीर्वाद देणे होय. देवाच्या हातून हे आशीर्वाद घेण्यासाठी आपला लांबवलेला हात म्हणजे विश्वास होय. त्यामुळे येशूच्या नावावरील विश्वासात आपण जितका दावा करू तितकेच मिळवु शकू. देवाने आपल्या स्वर्गीय बँक खात्यात लाखो आशीर्वाद ठेवले आहेत आणि येशूच्या नावाने स्वाक्षरी केलेले अनेक कोरे धनादेश आपल्याला दिले आहेत. आता आपल्याला फक्त रक्कम भरून बँकेत जाऊन आपल्या वारस हक्काचा दावा करायचा आहे.