WFTW Body: 

जेव्हा देवाने त्याच्या लोकांकरिता काही करण्याचा विचार केला तेव्हा त्याने एका व्यक्तीपासून सुरुवात केली. त्याने योग्य व्यक्ती निवडली त्यानंतरच इस्राएल राष्ट्राला मुक्त केले. मोशेला 80 वर्षांचे प्रशिक्षण मिळाले. हे प्रशिक्षण केवळ शैक्षणिक प्रशिक्षण नव्हते तर व्यवहारिक देखील होते. मिसरामध्ये त्याला शैक्षणिक प्रशिक्षण मिळाले पण त्याद्वारे तो देवाच्या कार्याकरिता सिद्ध झाला नव्हता. प्रेषित 7 मध्ये स्तेफन म्हणतो की मोशे शब्दात व व्यवहारात सामर्थ्यशाली होता. वयाच्या 40 व्या वर्षी मोशे दृढ होता व भाषणात उत्तम होता. तो सैन्याचा अधिकारी होता, श्रीमंत होता व त्याला उच्च कोटीचे शिक्षण प्राप्त झाले होते जे इतर कुठेही उपलब्ध नव्हते. कारण त्या काळी मिसर राष्ट्र जगामध्ये सर्वात शक्तीशाली होते. परंतु, एवढे असताना सुद्धा मोशे देवाची सेवा करण्यास पात्र नव्हता. स्तेफन सांगतो की मोशेला वाटले की इस्राएली लोक ओळखतील की देवाने त्याला इस्राएली लोकांची सुटका करण्यास उभे केले आहे. परंतु, इस्राएली लोकांनी त्याला पुढारी म्हणून स्वीकारले नाही. पृथ्वीवरील त्याची प्रतिष्ठा व पात्रता त्याला देवाच्या सेवेकरिता तयार करू शकली नाही व सज्ज करू शकली नाही

आज अनेक ख्रिस्ती लोकांची धारणा आहे की त्यांना बायबलचे ज्ञान असल्यामुळे, संगीताचे दान असल्यामुळे व भरपूर पैसा असल्यामुळे ते देवाची सेवा करू शकतील. परंतु हा त्यांचा मोठा गैरसमज आहे. मोशेच्या जीवनातून त्यांना बोध घेण्याची गरज आहे : 40 वर्षे त्याने जगातील उत्तम प्रशिक्षण घेतले व गोष्टी साध्य केल्या तरीही तो देवाच्या सेवेकरिता तयार होऊ शकला नाही.

शेवटी, देवाला गरज भासली की देवाने त्याला पुढील 40 वर्षे अरण्यात न्यावे, अशाठिकाणी न्यावे ज्याठिकाणी त्याला अगदी भिन्न वातावरण दिसेल व त्याठिकाणी तो सुसज्ज होईल. त्याठिकाणी त्याला मानवी शक्तीच्या गर्वापासून भग्न हृदयी होण्याची गरज होती. काही काळ त्याला मेंढपाळ करण्याद्वारे देवाने हे साध्य केले. मोशेने भग्नहृदयी होण्याकरिता देवाने त्याला 40 वर्षे मंढे पाळ बनवून ठेवले व आपल्या सासर्यााची सेवाचाकरी करण्यास भाग पाडले. सासर्यावच्या घरी एक वर्ष राहणे देखील एखाद्यासाठी अपमानजनक आहे. मला माहीत आहे की भारतातील अनेक विवाहीत स्त्रिया आजीवन सासर्या च्या घरी राहतात. परंतु, पुरुषाला जेव्हा सासर्यारच्या घरी राहावे लागते व काम करावे लागते तेव्हा परिस्थिती अगदी वेगळी असते. पुरुषाकरिता हे दिवस अगदी नम्र अवस्थेचे असतात. परंतु, देवाने मोशेला अशा परिस्थितीतच भग्न केले. देवाने याकोबाला देखील अशा परिस्थितीत भग्न केले. याकोबाला 20 वर्षे सासर्या च्या घरी राहावे लागले. आपल्या लेकरांना भग्न करण्याकरिता देव सासुसासर्यां चा उपयोग करून घेतो

मिसरातील मोठमोठे विद्यापीठ मोशेला ज्या गोष्टी शिकवू शकले नाही त्या गोष्टी तो अरण्यात मेंढरे चारतांना व सासर्यालची चाकरी करताना शिकला. 40 वर्षांच्या शेवटी मोशे इतका भग्न झाला की तो म्हणाला, ''प्रभु, मी अपात्र आहे. मी नीट बोलू शकत नाही. तुझ्या लोकांना मुक्त करण्याकरिता इतर कोणाची निवड कर.'' मग देव बोलला, ''शेवटी, तू तयार झाला आहेस. मी तुला आता फारोकडे पाठवीत आहे'' (निर्गम 4:10-17).

मोशे व याकोबाच्या जीवनातून आपण कोणता बोध घेतला? बोध अशाप्रकारे आहे : तुम्ही तयार आहात असे तुम्हाला वाटते तेव्हा तुम्ही नसता. जेव्हा तुम्हाला वाटते की तुम्ही पात्र आहात, सशक्त आहात, तुम्हाला ज्ञान आहे, तुम्ही बोलू शकता, गाऊ शकता, वाद्य वाजवू शकता व देवासाठी अद्भुत गोष्टी करू शकता, तेव्हा देव तुम्हाला म्हणतो, ''तुम्ही अपात्र आहा. तुम्हाला मी भग्न करण्याची गरज आहे.'' या प्रक्रियेमध्ये याकोबाला 20 वर्षे लागली व मोशेला 40 वर्षे लागली. पेत्राला तीन वर्षे भग्न होण्याच्या प्रक्रियेतून जावे लागले व पौलाला देखील तीन वर्षे जावे लागले. आपल्याला किती वर्षे लागणार? आपण देवाच्या सामर्थी हातात स्वतःला किती लवकर समर्पित करतो त्यावर ते अवलंबून आहे.

शाळेमध्ये पहिल्या वर्गातून बाराव्या वर्गात जाण्यास किती वेळ लागतो? 12 वर्षे लागतात ना? तुम्ही दरवर्षी पास झाला तर 12 वर्षे लागतील. परंतु काही लेकरांना बारावी उत्तीर्ण करण्याकरिता 16 वर्षे लागतात. मी डॉक्टर झालेल्या अशा विद्यार्थ्यांना ओळखतो ज्यांना 5 वर्षांचा मेडिकल अभ्यासक्रम पूर्ण करण्याकरिता 15 वर्षे लागलीत. आपल्याला शाळा पूर्ण करण्याकरिता किती दिवस लागतील हे आपल्या शिकण्यावर अवलंबून आहे की आपण किती लवकर शिकतो. ख्रिस्ती जीवनात देखील हेच लागू होते.