WFTW Body: 

जेव्हा आपला बाप्तिस्मा होतो तेव्हा आपल्याला खात्री असते, की जो माणूस आपल्याला पाण्यात बुडवतो तो आपल्याला बुडवून टाकणार नाही तर आपल्याला पाण्यातून वरही काढेल. अशाच प्रकारे जीवनातील सर्व परिस्थितींमध्ये आपण देवावरही विश्वास (भरवसा) ठेवला पाहिजे. जेव्हा तो अशा परिस्थितीची मांडणी करतो, ज्यामध्ये आपल्याला स्वतःला मरावे लागते, किंवा ज्यामध्ये आपल्याला इतरांकडून "क्रूसावर चढवले" जाते, तेव्हा आपण देवालाच तो वापरत असलेल्या मानवी साधनांच्या पलीकडे पाहिले पाहिजे.

येशूने म्हटले, अंतःकरणाचे शुद्ध असणारे केवळ देवाला पाहतील (मत्तय ५:८) - आणि कोणतीही मानवी साधने पाहणार नाहीत. जेव्हा आपण केवळ आपल्याला क्रूसावर चढवणारे लोकच पाहतो, तेव्हा हे सूचित होते की, आपली अंतःकरणे शुद्ध नाहीत . मग आम्हाला त्या लोकांविरुद्ध तक्रारी असतील.

पण जेव्हा आपली अंतःकरणे शुद्ध असतील, तेव्हा आपण फक्त देवालाच पाहू आणि मग आपण असा भरवसा ठेवू (जसा आपण पाण्याने बाप्तिस्मा घेताना ठेवतो) की जो आपल्याला मृत्यूत बुडू देतो तो आपल्याला उठवेलही. "जर आपण ख्रिस्ताबरोबर मेलो, तर आपण देवाद्वारे ख्रिस्तासारखेच उठवलेही जाऊ ." (२ तीमथ्य २:११). तेव्हा आपण विश्वासात (देवावर भरवसा ठेवून) मरतो. तेव्हा आपण एका वैभवशाली पुनरूत्थित-जीवनात प्रवेश करू शकतो. अन्यथा आपण नेहमी जगत आलेलो जुने पराभूत आदामाचे जीवन नेहमीच जगू. जेव्हा आपण स्वत:ला मरण्यास नकार देतो, तेव्हा हे सूचित होते की, आपला देवावर विश्वास (भरवसा) नाही.

विश्वास ठेवणारा मनुष्य हा एकनिष्ठ मनुष्य असतो, जसे आपण याकोब १:६-८ मध्ये वाचतो. अशा माणसाच्या जीवनात केवळ एकच ध्येय असते- देवाला संतुष्ट करणे व त्याचे गौरव करणे. केवळ अशा मनुष्याबद्दलच असे म्हणता येईल की तो विश्वासाने जगतो - कारण तो हे मान्य करत जगतो की केवळ ज्या अदृश्य गोष्टी आहेत त्यांना सार्वकालिक मूल्य आहे. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, देवाचे वचन जे सांगते त्यावर तो विश्वास ठेवतो.

पुष्कळ "विश्वासणारे" येशूवर विश्वास ठेवतात कारण एवढेच की त्यांना नरकात जाण्याची इच्छा नाही. पण ते विश्वासाने जगत नाहीत. देव आपल्या वचनात जे म्हणतो ते खरे आहे याची त्यांना खात्री पटत नाही. त्यांनी आपल्या आयुष्यात जे काही केले, बोलले, त्या प्रत्येक गोष्टीचा हिशेब त्यांना देवाला द्यावा लागेल, यावर त्यांचा विश्वासच बसत नाही. स्वत:ला खुश करण्यासाठी आणि या जगातल्या सुखाचा उपभोग घेण्यासाठी आणि पैशाच्या मागे लागण्यासाठी जगलो, तर हे जग सोडल्यानंतर त्यांना अनंतकाळ पस्तावा होईल, यावर त्यांचा विश्वास बसत नाही.

मरण पावलेल्या आणि नरकात गेलेल्या त्या श्रीमंत माणसाला (ज्याच्याविषयी येशू बोलला होता) मेल्याबरोबर लगेचच पस्तावा झाला होता आणि दररोज पश्चात्ताप न करण्याच्या आपल्या पृथ्वीवरील जीवनात त्याने जी चूक केली होती तीच चूक आपल्या भावांनी करू नये असे कोणीतरी त्यांना जाऊन सांगावे अशी त्याची इच्छा होती (लूक १६:२८,३०). आपण सर्व जण येथे पृथ्वीवर उमेदवारीच्या काळात जगत आहोत आणि देव आपली परीक्षा घेत आहे की, आपणही प्राण्यांप्रमाणे, पृथ्वीच्या मातीसाठी जगू, की देवाच्या मुलांसारखे आपण सार्वकालिक मूल्य असलेल्या गोष्टींसाठी जगू - असे जीवन जे चांगुलपणा, प्रीती, परिपूर्ण शुद्धता, नम्रता इत्यादी वैशिष्ट्यांनी पूर्ण आहे.

सार्वकालिक मूल्य असलेल्या गोष्टींसाठी जगण्यासाठी परमेश्वर तुम्हाला कृपा पुरवो.