लेखक :   झॅक पुननं
WFTW Body: 

मंडळीमध्ये वर्षानुवर्षे तुम्हांला मिळालेल्या आध्यात्मिक अन्नाची तुम्हांला किंमत असेल तर तुम्ही मंडळीची कदर कराल. तुम्हांला एका जेवणाचे आमंत्रण देणाऱ्यांचे तुम्ही किती आभारी असता याचा विचार करा. मंडळीमध्ये दरवर्षी तुम्हांला सतत मिळणाऱ्या आध्यात्मिक अन्नाबद्दल तुम्ही किती जास्त कृतज्ञ असले पाहिजे. किंवा या गोष्टीचा दुस-या पद्धतीने विचार करा. समजा असा कोणीतरी आहे ज्याने तुमच्या मुलांची काळजी घेतली, त्यांना धोक्यापासून संरक्षण दिले, आजारी असताना त्यांची काळजी घेतली, निराश झाल्यावर त्यांना प्रोत्साहन दिले आणि त्यांना त्यांच्या अभ्यासात मदत केली जेणेकरून त्यांनी चांगले गुण मिळवले. आणि समजा या व्यक्तीने हे सगळे फक्त एक-दोन दिवसच नव्हे तर अनेक वर्षे केले तर तुम्ही त्याचे कृतज्ञ असणार नाही का? आपल्या मुलांचे संरक्षण केल्याबद्दल तुम्ही मंडळीचे इतके तरी आभारी आहात का? पुष्कळ विश्वासणारे लोक आध्यात्मिकरित्या वाढले नाहीत याचे एक कारण म्हणजे मंडळी कडून मिळालेल्या गोष्टींबद्दल ते मंडळीशी कृतज्ञ राहिले नाहीत. मंडळीपासून दूर गेलेले लोक हे ते आहेत जे मंडळीकडून इतक्या वर्षांपासून मिळालेल्या सर्व गोष्टीबद्दल पूर्णपणे कृतघ्न आहेत.

लूक १७:१४-१६ मध्ये आपण बरे झालेल्या दहा कुष्ठरोग्यांबद्दल वाचतो. पण त्यांच्यापैकी एकच जण देवाचे आभार मानण्यासाठी आणि देवाचा गौरव करण्यासाठी प्रभूकडे परत आला. जेव्हा त्यांना गरज होती तेव्हा त्या सर्वांनी दयेची मागणी करण्यासाठी आवाज उंचावला होता. पण ते बरे झाल्यानंतर त्यांना मिळालेल्या लाभाबद्दल नऊ जण पूर्णपणे कृतघ्न होते. उपकारस्तुती करण्यात फक्त एकाने आवाज उंचावला. पॅलेस्टाईनमध्ये आणखी हजारो लोक बरे झाले असावेत ज्यांनी कधीही प्रभूचे आभार मानण्याची तसदी घेतली नाही. पण हा शोमरोनी माणूस परत आला आणि त्याने प्रभूचे आभार मानले. त्याने प्रभूला कदाचित असे सांगितले असेल, "प्रभू, भविष्यात माझे आयुष्य आधीपेक्षा किती वेगळे असणार आहे, आता तू मला स्पर्श केला आहेस. मी शहराच्या आत जाऊ शकतो. मी माझ्या कुटुंबाकडे परत जाऊ शकतो. तू माझ्या आयुष्यात आनंद आणला आहेस. मला यांपैकी कोणताही आशीर्वाद गृहीत धरायचा नाही. मी सर्व गोष्टींबद्दल तुझा ऋणी आहे आणि माझ्या आयुष्यातील तुझ्या सर्व आशीर्वादांबद्दल मी मनापासून आभारी आहे." त्याने प्रकट केलेल्या कृतज्ञतेच्या या वृत्तीबद्दल येशूने त्या माणसाची कदर केली. मग येशूने त्याला आणखी काहीतरी दिले. त्याने त्याला सांगितले की त्याच्या विश्वासामुळे तो वाचला आहे. त्या शुद्ध झालेल्या कुष्ठरोग्याला प्रभूकडून फक्त बरे होण्यापेक्षा अधिक काही मिळाले. तो आधीच बरा झाला होता. पण तो कृतज्ञ असल्यामुळे त्याला तारणदेखील मिळाले. मला खात्री आहे की मी या शोमरोन्याला स्वर्गात भेटेन. पण मी तिथल्या इतर नऊपैकी कोणालाही भेटेन की नाही याची मला खात्री नाही. जेव्हा तुम्ही प्रभूचे आभार मानायला परत येता तेव्हा बाकीच्यांना जे मिळते तुम्हांला त्यापेक्षा जास्त मिळते.

प्रभू त्याच्या मंडळीच्या मध्ये आहे, जी पृथ्वीवरील त्याचे शरीर आहे. आता आपण त्याच्या शरीराला महत्व देऊन प्रभूबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. जर तुम्ही मंडळीची कदर केली नाही आणि तिला महत्व दिले नाही तर तुमचाच तोटा होईल, मंडळीचा नव्हे. ज्यांनी मंडळीची किंमत जाणली आहे आणि मंडळीमधून मिळालेल्या गोष्टींबद्दल जे कृतज्ञ आहेत देवाने त्यांना आशीर्वादित केले आहे.

येशूने आपल्या शिष्यांच्या एकनिष्ठेला खूप महत्व दिले. एकदा त्याने आपल्या शिष्यांना सांगितले की, ते सर्व जरी त्याचा त्याग करणार असले तरी तो एकटा असणार नाही, कारण त्याचा पिता त्याच्याबरोबर (योहान १६:३२) असणार होता. त्याला त्या शिष्यांची गरज नव्हती. तरीपण त्याने लूक २२:२८ मध्ये त्यांना सांगितले की ते त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्याबद्दल तो त्यांचा आभारी आहे. तो वैभवाचा प्रभू होता. त्याच्या पाठीशी कोणीही उभे राहण्याची गरज नव्हती. पण त्याला त्यांच्या पाठिंब्याची गरज नसली तरी त्यांच्या निष्ठेचे त्याने कौतुक केले. तो त्यांना म्हणत होता, "तुम्ही या जुन्या यहुदी व्यवस्थेतून बाहेर आला आहात आणि जुना बुधला सोडून दिला आहे. वधूचा आत्मा आणि वेश्येचा आत्मा यांतील फरक तुम्ही पाहिला आहे आणि तुम्ही बाहेर येऊन माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आहात आणि कोणतीही किंमत द्यायला तयार आहात."

मला आशा आहे की शेवटच्या दिवशी प्रभू आम्हांला सांगू शकेल की आम्ही त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलो आणि आम्हांला त्याची लाज वाटली नाही, त्याने आम्हांला ज्या मंडळीमध्ये ठेवले होते त्या मंडळीवर आम्ही प्रीती केली आणि इतरांप्रमाणे आम्ही मंडळीवर टीका केली नाही. बंधुभगिनींनो, मंडळीमध्ये आपल्याला आणि आपल्या मुलांना किती मोठ्या प्रमाणात संरक्षण मिळाले आहे याची आपण कदर करू या. तुम्हां तरुण लोकांना, मंडळीने अपघात, धोका आणि पाप यांपासून तुमचे किती संरक्षण केले आहे हे कधीच कळणार नाही. जेव्हा तुम्ही प्रभूसमोर उभे राहाल तेव्हाच तुमच्या लक्षात येईल की मंडळीमधील कठोर मानकांमुळे तुम्ही जगात भरकटले जाऊन स्वत:चा नाश करून घेतला नाही. त्या दिवशी, तुम्ही मंडळीमध्ये अनेक वर्षांपूर्वी ऐकलेल्या एखाद्या गोष्टीमुळे तुम्हांला धोक्यापासून कसे संरक्षण मिळाले हे तुमच्या लक्षात येईल. तुमच्या मुलांना, मंडळीमध्ये त्यांनी जे ऐकले त्यामुळे त्यांना किती धोक्यांपासून वाचवण्यात आले आणि त्यांचे संरक्षण झाले हेही प्रभू तुम्हांला दाखवेल. पण हे आणि इतर अनेक आशीर्वाद असूनही आपण सर्वांनी मंडळीची अगदी कमी कदर केली आहे आणि त्याचे मूल्य कमी केले आहे.

तुम्ही इतरांसाठी आशीर्वाद व्हाल अशा ठिकाणी पोहोचण्याची तुमची इच्छा आहे का? मग सर्वप्रथम, त्याने तुमच्यासाठी आणि मंडळीसाठी जे काही केले त्याबद्दल प्रभूचे आभार मानायला शिका. मंडळीला गृहीत धरू नका. आपल्यापैकी बरेच जण अशा मुलांसारखे असतात ज्यांना आईवडील मरण पावल्यानंतरच आपल्या आईवडिलांची खरी किंमत कळते. खूप उशीर होण्याआधीच मंडळीमध्ये एकमेकांचे आभार मानायला प्रभू आपल्याला शिकवो.