लेखक :   झॅक पुननं श्रेणी :   मंदिर
WFTW Body: 

जेव्हा आपण येशू ख्रिस्ताच्या जीवनाकडे बघतो तेव्हा आपण केवळ वधस्तंभावरील त्याच्या मरणाविषयीच विचार करीत नाही तर त्याच्या संपूर्ण जीवनाविषयी विचार करितो की तो त्याच्या पित्याला पूर्णपणे समर्पित होता. येशू म्हणाला, ''ह्यास्तव तो जगांत येतेवेळेस म्हणाला, 'यज्ञ व अन्नार्पण ह्यांची तुला इच्छा नव्हती, तूं माझ्यासाठीं शरीर तयार केलें. ह्यावरून मी म्हणालों, पाहा, हे देवा, ग्रंथपटांत माझ्याविषयीं लिहून ठेविलें आहे, तुझ्या इच्छेप्रमाणें करण्यासाठीं मी आलों आहें ' (इब्री 10:5,7). येशूने शरीरामध्ये असता कधीही स्वतःची इच्छा पूर्ण केली नाही. त्याने केवळ पित्याची इच्छा पूर्ण केली आहे. देवाला अग्नीयज्ञ अर्पण करणे म्हणावे. रोम 12:1 मध्ये पौलाने देखील आपल्याला असे करण्यास सांगितले आहे, ''ह्यास्तव बंधुजनहो, मी देवाच्या करुणेमुळे तुम्हांला विनवितों कीं, तुम्हीं आपलीं शरीरें जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावीं; ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे.'' येशूने देखील असेच केले. हा अग्नीयज्ञ देवाला अर्पण करण्यात येत असे व तो पूर्णपणे जाळण्यात येत असे. या यज्ञाविषयी बायबलमध्ये पुढीलप्रमाणे लिहिले आहे, ''हे होमार्पण परमेश्वराप्रीत्यर्थ सुवासिक हव्य होय'' (लेवीय 1:17). हा सुवासिक हव्य देवाला आवडत असे. ''हा माझा 'पुत्र' मला परमप्रिय आहे, ह्याच्याविषयीं मी संतुष्ट आहें'' (मत्तय 3:17), असे देव येशूविषयी म्हणाला. पौलाने देखील सांगितले की त्याच्या जीवनाचे ध्येय देवाला संतोषविणे आहे (2 करिंथ 5:9).

पुढीलप्रमाणे म्हणणे फार सोपे असते, ''प्रभु माझे शरीर मी पूर्णपणे तुला समर्पित करितो.'' परंतु, जोवर आपण आपल्या शरीरांचे तुकडे करून अर्पण करीत नाही, तोवर आपल्याला कळत नाही की खरोखर आपण देवाला आपले शरीर अर्पण केले आहे किंवा नाही. पुष्कळवेळा आपण स्वतःला फसवीत असतो. तुकडे करून प्रभुला अर्पण करणे म्हणजे काय? अग्नीयज्ञ तुकडे करून अर्पण केल्या जात असे. ह्याचा अर्थ असा की आपण देवाला आपल्या शरीराच्या प्रत्येक भागाचे तुकडे करून अर्पण करतो.

आपण म्हणतो, ''प्रभु हे माझे डोळे आहेत. मी या डोळ्यांचा उपयोग अनेक वर्षांपासून सैतानाकरिता केला व माझ्याकरिता देखील केला. ज्या गोष्टी तुला आवडत नाहीत त्या पाहण्याकरिता व वाचण्याकरिता मी या डोळ्यांचा उपयोग केला आहे. परंतु आता मी माझे डोळे वेदीवर अर्पण करितो. येशूने जे बघितले नसते व वाचले नसते ते मी यापुढे बघणार नाही व वाचणार नाही. माझ्या डोळ्यांद्वारे पाप घडू नये अशी माझी इच्छा आहे.'' पुढे आपण जिभेविषयी म्हणतो, ''प्रभु ही माझी जीभ आहे. अनेक वर्षांपासून सैतानाकरिता व स्वतःकरिता मी या जिभेचा उपयोग केला आहे. मी स्वार्थाकरिता लबाड बोललो, क्रोधीत शब्द बोललो. या जिभेद्वारे मी चुगली केली आहे व निंदा केली आहे. यापुढे मी असे करू इच्छित नाही. प्रभु या क्षणापासून मी माझी जीभ तुला पूर्णपणे समर्पित करितो.''

पुढे आणखी आपण आपल्या हातांविषयी, पायांविषयी व संपूर्ण शरीराविषयी एकएक करून प्रभुला सांगतो, ''प्रभु, हे माझ्या शरीराचे अवयव आहेत. या अवयवांद्वारे मी पाप केले आहे व तुला दुखविले आहे. यापुढे या अवयवांद्वारे मी स्वतःला संतोषवू इच्छित नाही व वासना पूर्ण करू इच्छित नाही. हे सर्व अवयव प्रभु तुझे आहेत.''

आपल्या शरीराचे अवयव एकएक करून आपण वेदीवर प्रभुला अर्पिल्यावरच आपल्याला खर्या रीतीने कळेल की आपले शरीर पूर्णपणे प्रभुला समर्पित आहे किंवा नाही. जेव्हा आपण आपल्या शरीरांचे तुकडे करून ते सर्व तुकडे वेदीवर अर्पण करितो तेव्हा आपण म्हणू शकतो, ''प्रभु, हे माझ्या शरीराचे अवयव आहेत. हे तुला अर्पण केलेले आहेत. यावर तुझा अग्नी पाठवून ते भस्म कर.'' लेवीय 9:24 मध्ये आपण वाचतो की देवाचा अग्नी वेदीवर उतरला व देवाने सर्व अर्पण स्वीकारले. हा अग्नी पवित्र आत्म्याने बाप्तिस्म्याचे चित्र आहे. आपले अर्पण भस्म करण्याकरिता तो येतो. देवाकरिता आपले शरीर पेटवावे म्हणून हा अग्नी येतो. जोवर आपण आपल्या शरीराचा प्रत्येक अवयव वेदीवर आणून अर्पण करीत नाही तोवर हा अग्नी उतरत नाही.

जेव्हा ख्रिस्ती लोक आपले शरीर वेदीवर आणीत नाहीत आणि त्याचवेळेस त्यांची इच्छा असते की अग्नी उतरावा तेव्हा ते काय करतात? ते खोटा अग्नी तयार करतात. हा प्रकार आपल्याला लेवीय 10:1-2 मध्ये पहायला मिळतो, ''अहरोनाचे मुलगे नादाब व अबीहू ह्यांनी आपआपली धुपाटणी घेऊन त्यात अग्नी घातला आणि त्यावर धूप घालून तो अशास्त्र अग्नी परमेश्वरासमोर नेला. असा अग्नि नेण्याची परमेश्वराची आज्ञा नव्हती. तेव्हा परमेश्वरासमोरून अग्नी निघाला व त्याने त्यांस भस्म केले; आणि ते परमेश्वरासमोर मरण पावले.'' जेव्हा आपल्याकडे देवाचा खरा अग्नी नसतो व आपण त्या लोकांसारखे होऊ पाहतो ज्यांच्याकडे खरा अग्नी आहे तेव्हा आपण त्यांच्यासारखे वागण्याचा प्रयत्न करितो आणि हे फार धोक्याचे आहे. आपण लबाडीने म्हणतो, ''होय आमच्याकडे देखील अग्नी आहे. आम्ही देखील अन्य भाषा बोलतो.'' नादाब व अबीहू ह्यांनी खोटा अग्नी पेटविल्यामुळे देवाला त्यांचा राग आला. देवाने त्यांच्यावर अग्नी पाठवून त्यांच्या यज्ञाचा स्वीकार केला नाही तर या दोन लबाड व्यक्तींचा नाश केला!

आत्मिक गोष्टींची नक्कल करणे फार धोक्याचे आहे. तरीदेखील आज असंख्य ख्रिस्ती लोक असे करीत आहेत. प्रचारक त्यांना अन्य भाषा बोलण्याचे प्रशिक्षण देतात, भावना जागृत करण्याची कला शिकवितात, त्याचप्रमाणे रोग बरे झाल्याचा भास घडवून आणण्याची देखील कला शिकवितात. ते या सर्व गोष्टी येशूचे नाव घेऊन करतात.

ज्या लोकांना देवाकडून खरा अग्नी प्राप्त झालेला असतो त्यांनी किंमत देखील मोजलेली असते. त्यांनी देवाच्या वेदीवर पैसा, डोळे, जीभ, हात व सर्वस्व अर्पण केलेले असते. त्यांनी आपल्या जीवनाचे अवलोकन केलेले असते व खात्री करून घेतलेली असते की आपल्या शरीराचा प्रत्येक अवयव वेदीवर अर्पिला आहे व देवाने अग्नी पाठविला आहे. तुम्ही अशा लोकांच्या जीवनाकडे बघा, तुम्हाला वाटेल की तुमचे देखील जीवन त्यांच्यासारखे असावे. पुष्कळ वेळा आपण किंमत न मोजता त्यांच्यासारखे वागण्याचा प्रयत्न करितो व लोकांना भासवितो की आपला अभिषेक झाला आहे. आपण नादाब व अबीहूसारखा खोटा अग्नी पेटवितो, भावना जागृत करितो व बनावटी अन्य भाषा बोलतो. 95 टक्के विश्वासणार्यां ना पारख करण्याचा आत्मा नसतो. तुम्ही त्यांच्यासोबत सहज लबाडी करून त्यांना भासवू शकता की तुमच्या ठायी खरा अग्नी आहे. परंतु तुम्हालाच माहीत असते की हा अग्नी तुम्ही स्वतः पेटविलेला आहे तो देवाकडून नाही. सावध असा! देवाने नादाब व अबीहूचा जसा न्याय केला तसा जर त्याने आज केला तर असंख्य ख्रिस्ती लोक भस्म होऊन मृत्युमुखी पडतील.