WFTW Body: 

"दोघे जण मिळून एकाच्या दुपटीपेक्षा जास्त साध्य करू शकतात, कारण त्यांचा परिणाम अधिक चांगला असू शकतो. जर एखादा पडला तर दुसरा त्याला वर ओढू शकतो; पण जर एखादा माणूस एकटा असताना पडला तर तो अडचणीत आहे.... आणि एकट्या उभ्या असलेल्या एकावर हल्ला केला जाऊ शकतो आणि त्याचा पराभव केला जाऊ शकतो, परंतु दोन एकामागे एक उभे राहून जिंकू शकतात; तीन अधिक चांगले आहेत, कारण तिहेरी वेणीची दोरी सहजासहजी तुटत नाही" (उपदेशक ४:९-१२ लिविंग बायबल). तुम्हांला इसापच्या दंतकथांमधील कथा आठवत असेल, जिथे एका वृद्ध शेतकऱ्याने आपल्या तीन मुलांना एकतेचा वस्तुपाठ शिकवला होता, जे सतत आपापसांत भांडत होते. अनेक कमकुवत काठ्या घेऊन त्याने त्यांना दाखवून दिले की काठ्या वैयक्तिकरित्या सहजपणे कशा तोडल्या जाऊ शकतात, परंतु जेव्हा त्या एकत्र बांधल्या गेल्या तेव्हा त्या तुटणे जवळजवळ अशक्य होते. या जगातील मुलांनाही हे समजते की ऐक्य आणि सहभागितेमध्ये ताकद आहे.पवित्र शास्त्र म्हणते: "टोळ" हे "जरी लहान असले तरी ते असामान्यपणे शहाणे असतात कारण ते टोळीत राहतात"(नीतिसूत्रे ३०:२७-लिविंग बायबल) एकत्र राहतात. त्यात त्यांची सुरक्षितता आणि त्यांचे सामर्थ्य दडलेले आहे. येशू ख्रिस्ताच्या मंडळीमध्ये आपण हा धडा पुन्हा शिकला पाहिजे.

नवीन करार ज्या ऐक्याबद्दल बोलतो, ते म्हणजे ख्रिस्ताच्या शरीराच्या सदस्यांचे एकमेकांबरोबर, ख्रिस्ताच्या प्रमुखपदाखाली ऐक्य - एक जैविक ऐक्य आहे, संघटनात्मक नाही. यात ख्रिस्ताच्या शरीराबाहेर असलेल्यांना वगळण्यात आले आहे, जरी त्यांच्याकडे 'ख्रिस्ती' अशी खूणपट्टी असली तरी. जीवंत आणि मृत यांच्यात कोणतीही एकता असू शकत नाही.केवळ नवीन जन्माच्या माध्यमातून ख्रिस्तात जिवंत झालेल्यांनाच देवाने अशाच प्रकारे पुनरुज्जीवित केलेल्या इतरांशीच त्यांचे आध्यात्मिक ऐक्य सापडू शकते. ख्रिस्ती ऐक्य पवित्र आत्म्याने निर्माण केले आहे केवळ तोच आपल्याला ख्रिस्ताच्या शरीराचे सदस्य बनवू शकतो. पवित्र शास्त्र आपल्याला "आत्म्याच्या द्वारे घडून आलेले ऐक्य शांतीच्या बंधनाने राखण्यास झटत जा."(इफिसकरांस पत्र ४:३ अँप्लिफाईड बायबल ) असा बोध करते. माणसाने निर्माण केलेली कोणतीही एकजूट निरुपयोगी आहे.

सैतान हा एक धूर्त शत्रू आहे आणि ख्रिस्त आणि त्याच्या वचनाच्या अधिकाराखाली राहणाऱ्या संयुक्त ख्रिस्ती सहभागितेवर तो मात करू शकत नाही हे त्याला समजते. म्हणूनच, सहभागी सदस्यांमध्ये मतभेद, संशय आणि गैरसमज पेरणे अशी त्याची युद्धाची रणनीती आहे, जेणेकरून तो त्यांना वैयक्तिकरित्या पंगू करू शकेल. येशूने सांगितले की, अधोलोकाच्या शक्ती आपल्या मंडळीवर मात करू शकणार नाहीत. (मत्तय १६:१८). सैतानाविरुद्धच्या लढाईत मंडळी, ख्रिस्ताच्या शरीराला जिंकण्याचे वचन मिळाले आहे. इतर विश्वासणाऱ्या लोकांपासून एकीकडे उभा असलेला विश्वासणारा कदाचित स्वत: ला पराभूत होताना पाहील. पृथ्वीवरील ख्रिस्ताच्या जीवनात सैतानाने ख्रिस्तावर सतत हल्ला केला, पण तो जिंकू शकला नाही. शेवटी क्रुसावर सैतानाची माणसावरील सत्ता ख्रिस्ताने त्याच्यापासून हिरावून घेतली (इब्री २:१४, कलस्सै २:१५). आज सैतान पुनरूत्थित ख्रिस्तावर हल्ला करू शकत नाही. त्यामुळे त्याचे हल्ले ख्रिस्ताच्या शरीरावर, मंडळीवर केले जातात. सैतानावर विजय मिळवता येईल जर आपण आपल्या प्रभूच्या मस्तकाखाली शरीर म्हणून त्याच्याविरुद्ध एकवटून उभे राहतो. ख्रिस्ती लोकांच्या सहभागितेत जरी एखादा सदस्य आपले कार्य पूर्ण करत नसला, तरी त्या प्रमाणात शरीराची शक्ती कमकुवत होते. सैतानाला हे माहीत असल्यामुळे, तो सतत एखाद्या गटाच्या वैयक्तिक सदस्याला एकटे पाडण्याचा किंवा गटाला (किंवा मंडळीला) अनेक गटांमध्ये विभागण्याचा प्रयत्न करतो. कोणत्याही एका प्रकारे तो आपल्या ध्येयात यशस्वी होतो. म्हणूनच आपण सैतानाच्या कपटापासून सतत सावध असले पाहिजे, नाहीतर तो आपल्यातील आणि ख्रिस्ताच्या शरीराच्या इतर सदस्यांमधील संबंध कमकुवत करेल.

येशूने देवाला प्रार्थना करणाऱ्या वैयक्तिक विश्वासणाऱ्यांच्या संदर्भात अनेक अभिवचने दिली. पण मत्तय १८:१८,१९ मध्ये ख्रिस्ताच्या शरीराच्या एका मतैक्याने प्रार्थना करण्याऱ्या गटाला वचन दिले आहे: "तुम्ही पृथ्वीवर जे काही बांधता ते", येशू म्हणाला, "ते स्वर्गात बांधले जाईल आणि जे काही तुम्ही पृथ्वीवर मोकळे कराल ते स्वर्गात मोकळे केले जाईल. मी आणखी तुम्हांला खचीत सांगतो, पृथ्वीवर तुमच्यापैकी दोघे कोणत्याही गोष्टीविषयी सहमत होऊन विनंती करतील तर ती माझ्या स्वर्गातील पित्याकडून त्यांच्यासाठी केली जाईल." (लिविंग बायबल). वचन १९ मध्ये "सहमत" हा भाषांतरित शब्द म्हणजे "सुमफोनिओ" हा ग्रीक शब्द आहे, ज्यातून आपला इंग्रजी शब्द "सिम्फनी" तयार झाला आहे. येशू या वचनांमध्ये त्याच्या कोणत्याही अगदी दोन मुलांमधील एकतेचा उल्लेख करत होता जी संगीतरचनेसारखा (सिम्फनी) असेल. याचा अर्थ दुसऱ्याच्या प्रार्थनेच्या शेवटी "आमेन" म्हणण्यापेक्षा जास्त आहे. संगीतरचना म्हणजे जे एकत्र प्रार्थना करत आहेत त्यांच्यात आत्म्याचा सखोल एकोपा आहे.जेव्हा ख्रिस्ती लोकांच्या एका छोट्या गटाची सहभागिता एखाद्या सुव्यवस्थित वाद्यवृंदाने तयार केलेल्या संगीतरचनेसारखी असते, तेव्हा (येशूने सांगितले) त्यांच्या प्रार्थनेला असा अधिकार असेल की त्यांनी मागितलेली कोणतीही गोष्ट मंजूर केली जाईल. अशा ख्रिस्ती गटाला सैतानाच्या शक्तीला बांधून सैतानाच्या बंदिवानांना मुक्त करण्याचा अधिकार असेल. अशा प्रकारच्या सहभागितेमुळे असा अधिकार का वापरता येईल याचे कारण येशूने स्पष्ट केले: "कारण", तो म्हणाला, "जेथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने जमले आहेत तेथे त्यांच्यामध्ये मी आहे." (वचन २०). ख्रिस्त हे मस्तक अशा सहभागितेदरम्यान त्याच्या सर्व अधिकारांसह उपस्थित आहे आणि म्हणूनच नरकाचे सामर्थ्य त्याच्या विरोधात कधीही उभे राहू शकत नाही.मंडळीने "प्रेषितांच्या कृत्यांमध्ये" वर्णन करण्याचे एक कारण म्हणजे त्यांच्या सहभागितेमध्ये हे ऐक्य असल्यामुळे या अधिकाराचे वास्तव त्यांना माहित होते. "हे सर्व जण (११ प्रेषित).....एकचित्ताने प्रार्थना व विनंती करण्यात तत्पर असत"..... तेव्हा विश्वास ठेवणारे सर्व एकत्र होते…..ते दररोज एकचित्ताने व तत्परतेने मंदिरात जमत असत ".....हे ऐकून ते (प्रेषित आणि इतर विश्वासणारे )एकचित्ताने देवाला उच्च स्वराने म्हणाले..... "(प्रेषितांची कृत्ये १:१४; २:४४,४६; ४:२४). ख्रिस्ताच्या अधिकाराखाली ते एका शरीरात एकरूप झाल्यामुळे ते प्रार्थनेत परमेश्वराच्या अधिकाराचा वापर करू शकत होते. ते उच्च शिक्षित नव्हते, त्यांचा कोणताही सामाजिक प्रभाव नव्हता आणि आर्थिक पाठबळ नव्हते, तरीही त्यांनी ख्रिस्तासाठी तत्कालीन ज्ञात जगाची उलथापालथ केली. जेव्हा पेत्राला तुरुंगात डांबण्यात आले, तेव्हा हेरोदाचे सर्व सैन्य देवाच्यासमोर गुडघ्यावर असलेल्या त्या सुरुवातीच्या मंडळीच्या सामर्थ्याच्या विरोधात उभे राहू शकले नाही (प्रेषितांची कृत्ये १२:५-११). संपूर्ण रोमी साम्राज्यात मानवी जीवनात ख्रिस्ताचा विजय आणि अधिकार नोंदवताना सैतानाचे राज्य त्या मंडळीने त्याच्या पायासकट हादरवले (याचे एक उदाहरण म्हणून प्रेषितांची कृत्ये १९:११-२० पहा).

आज सैतान; एक विभक्त मंडळी जी त्याला जाहिरातबाजी, यंत्रे, सभा, धर्मशास्त्रीय ज्ञान, वक्तृत्व आणि प्रशिक्षित गायकमंडळांद्वारे आपल्या बालेकिल्ल्यांमधून बाहेर काढू पाहते तेव्हा तो खिल्ली उडवतो.यांपैकी कशाचाही सैतानाविरुद्ध कशाचाही फायदा नाही. ख्रिस्ताच्या मस्तकाखाली एक शरीर एकवटले आहे हे मंडळीला पुन्हा जाणून घेण्याची गरज आहे. ख्रिस्ती लोकांचे एकमेकांशी योग्य प्रकारे असलेले संबंध, एकमेकांप्रती असणाऱ्या प्रेमात वाढणे आणि ख्रिस्त आणि त्याच्या वचनाच्या आज्ञाधारकतेत जगणे हा सैतानाच्या पृथ्वीवरील राज्यासाठी सर्वांत मोठा धोका आहे. सैतानाला तेवढी भीती इतर कशाचीही वाटत नाही. ख्रिस्तात एक शरीर असण्याच्या वैभवशाली सत्याच्या प्रकाशात परमेश्वर आपल्याला दररोज जगण्यास मदत करेल हीच आपली प्रार्थना बनवूया. जगभरातील अधिकाधिक ख्रिस्ती लोक जसजसे हे सत्य समजून घेण्यास आणि जगण्यास सुरुवात करतील, तेव्हा आपण मंडळीला जरी त्यांची संख्या कमी असली, तरी तिच्या मूळच्या वैभवात पुनर्स्थापित झालेली खात्रीने पाहू, जी अंधाराच्या शक्तींचा पराभव करण्यासाठी आणि गरजू जगाला आशीर्वादाचे माध्यम म्हणून देवाच्या हातातील एक साधन असेल.