रोम ८ हे आत्म्यामधील जीवनाबद्दल बोलते. जेव्हा आपण पवित्र आत्म्याच्या अधीन होण्याच्या या जीवनात येतो, तेव्हा आपला पिता आपल्या जीवनातील सर्व परिस्थितीमध्ये सर्व काही आपल्या सार्वकालिक कल्याणासाठी कसे कार्य करेल यासाठी काम करू लागतो. इतर लोकांनी जरी आपले नुकसान करण्याचा प्रयत्न केला तरी देव आपल्या भल्यासाठी काम करतो आणि आपल्याला ठाऊक आहे की, देवावर प्रीती करणार्यांना म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलावलेल्यांना देवाच्या करणीने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात.(रोम ८:२८) कारण ज्यांच्याविषयीचे त्याला पूर्वज्ञान होते त्यांनी आपल्या पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे बनावे म्हणून त्याने त्यांना आगाऊच नेमून ठेवले; ह्यात हेतू हा की, तो पुष्कळ बंधु-भगिनीजनांमधला ज्येष्ठ असा व्हावा (रोम ८:२९). हे खरोखरच एक अद्भुत शुभवर्तमान आहे! रोम ८:२८ हे नवीन करारातील सर्वात अद्भुत अभिवचनांपैकी एक आहे आणि ह्यात आपण सामोरे जाऊ अशा प्रत्येक परिस्थितीचा समावेश केलेला आहे - अगदी खात्रीने आणि पूर्णपणे. म्हणून प्रभूला सांगा, "प्रभू, पृथ्वीवर माझी कोणतीही महत्त्वाकांक्षा नाही, फक्त जसा तू स्वतः जगला तसे तुझी इच्छा पृथ्वीवर पूर्ण करणे हीच माझी महत्वाकांक्षा आहे. मला पैसा किंवा सन्मान किंवा प्रसिद्धी किंवा ऐषोरामाचा पाठलाग करण्याची इच्छा नाही. मला स्वत:साठी पृथ्वीवर एकही गोष्ट नको आहे. मला फक्त दररोज तुला संतुष्ट करायचे आहे. आणि मी या बाबतीत सतत स्वत:चे परिक्षण करेन." मग सर्व गोष्टी आपल्या भल्यासाठी एकत्र काम करतील. आणि त्या "भल्या" चा उल्लेख पुढील वचनात केला आहे - रोम ८:२९ - तुम्हाला स्वतः येशूसारखे बनवले जाईल. सर्वशक्तिमान देव तुमच्यासाठी यापेक्षा अधिक चांगले करू शकणार नाही.
आम्ही इफिस १:४,५ मध्ये "देवाने आपल्याला प्रेमाने पूर्वीच नेमले आहे" असे वाचतो. "पूर्वीच नेमले " हा आणखी एक शब्द आहे ज्याबद्द्ल खूप गैरसमज झाला आहे. देवाने आपल्याला कशासाठी पूर्वनियोजित केले? स्वर्गात जायचे की नरकात यासाठी? नाही. त्याने कोणालाही पूर्वीच स्वर्गात किंवा नरकात जाण्यासाठी नेमले नाही. येथे असे म्हटले आहे, "त्याने आपल्या मनाच्या सत्संकल्पाप्रमाणे आपल्याला येशू ख्रिस्ताच्या द्वारे स्वतःचे दत्तक होण्याकरता प्रेमाने पूर्वीच नेमले होते." त्याने आपण ख्रिस्ती बाळे नव्हे तर ख्रिस्तात प्रौढ मुले व्हावे, हे पूर्वीच नेमले आहे. तुम्हांला एक जबाबदार मुलगा व्हावे लागेल ज्याला तुमच्या स्वर्गीय पित्याच्या व्यवसायात रस आहे. म्हणून स्वत: ला एखाद्या मुलासारखे वागवा ज्याला त्याच्या वडिलांच्या व्यवसायाबद्दल जबाबदारीची भावना आहे.
कलस्सै १:२८ मध्ये पौलाने म्हटले: "आम्ही त्याची घोषणा करतो, सर्व प्रकारच्या ज्ञानाने प्रत्येक माणसाला बोध करतो व प्रत्येक माणसाला शिकवतो; अशासाठी की, प्रत्येक माणसाला ख्रिस्त येशूच्या ठायी पूर्ण असे उभे करावे." ही भविष्यवाणी आणि शिकवण दोन्ही आहे - सर्व प्रकारच्या ज्ञानाने . पौलाचे अंतिम ध्येय "प्रत्येक माणसाला ख्रिस्त येशूच्या ठायी पूर्ण असे उभे करावे" हे होते. पौलाची जर १०० लोकांची मंडळी असती तर ते सर्व १०० लोक - प्रत्येक भाऊ-बहीण - ख्रिस्तात परिपूर्ण होतील याची खात्री करण्यासाठी तो शक्य ते सर्व प्रयत्न करणार होता. तो त्यांना बोध करणार होता, त्यांची कानउघाडणी करणार होता आणि त्यांना सर्व शहाणपणाने शिकवणार होता, कारण एक दिवस त्याला त्यांना देवाला सादर करावे लागणार होते. ज्यांच्यावर असे ओझे आहे असे फार थोडे पाळक आणि मेंढपाळ आहेत. ते फक्त प्रचार करतात.एवढेच. पण पौलावर प्रत्येक व्यक्तीला आध्यात्मिक परिपक्वतेकडे नेण्याचे ओझे होते. मंडळीमध्ये वडील होण्याची जबाबदारी तुम्ही सहजपणाने घेऊ शकत नाही. जेव्हा मी बंगळुरू येथील आमच्या मंडळीमध्ये २५ वर्षे वडील होतो, तेव्हा मी माझ्या मंडळीमधील प्रत्येक प्रौढ व्यक्तीची आध्यात्मिक स्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून मी त्यांना सुधारू शकेन, त्यांची कानउघाडणी करू शकेन , त्यांना शहाणपण देऊ शकेन, त्यांना उत्साहवर्धक शब्द आणि कठोर शब्द बोलू शकेन, जेणेकरून मी त्यांना एक दिवस ख्रिस्तात परिपूर्ण सादर करू शकेन. मला त्यांच्याकडून स्वत:साठी कधीच काही नको होते. त्यांच्यासाठी, ख्रिस्ताच्या शरीरासाठी, मला माझ्या खाजगी जीवनात खूप चिरडले जावे लागले. देवाने माझ्याशी इतक्या प्रकारे व्यवहार केला की ख्रिस्ताचा सुगंध माझ्याकडून येऊ शकेल जेणेकरून इतरांना आशीर्वाद मिळेल.हे खरे ख्रिस्ती सेवाकार्य आहे. कलस्सै १:२९ मध्ये पौल पुढे म्हणतो, "ह्याकरता त्याची जी शक्ती माझ्या ठायी जोराने कार्य चालवत आहे तिच्या मानाने मी झटून श्रम करत आहे." तो कसा प्रयत्न करतो? "पवित्र आत्म्याच्या पराक्रमी शक्तीने - जो देव माझ्यात सर्वप्रथम चपखलपणे काम करतो." देवाला नेहमीच त्याच्या पवित्र आत्म्याने आपल्या आत काम करावे लागते आणि तरच तो इतरांना आशीर्वाद देण्यासाठी आपल्याद्वारे काम करू शकतो. तुमच्यापैकी जे मंडळीमध्ये सेवा करतात, त्यांनी या दोन वचनांना तुमचे ध्येय बनवा, प्रत्येक माणसाला ख्रिस्तात परिपूर्ण सादर करणे (कलस्सै १:२८) आणि पवित्र आत्म्याची परिपूर्णता असणे ज्याद्वारे तुम्ही त्या ध्येयापर्यंत पोहोचाल . (कलस्सै १:२९)
इफिस ४:१३ मध्ये प्रेषित पौलाने म्हटले आहे की, आपण हळूहळू "प्रौढ माणसापर्यंत, ख्रिस्ताच्या पूर्णतेपर्यंत" मोठे होणार आहोत. आपले उद्दीष्ट स्वत:ला वाढविणे आणि इतरांना या परिपूर्णतेपर्यंत वाढण्यास मदत करणे हे असले पाहिजे. आपण "माणसांच्या धूर्तपणाने, भ्रांतीच्या मार्गास नेणार्या युक्तीने, प्रत्येक शिकवणरूपी वार्याने हेलकावणारे व फिरणारे अशी बाळे राहू नयेत.(इफिस ४:१४)
इफिस ४:१५ मध्ये आपल्याला "वाढण्यासाठी प्रीतित सत्य बोलण्यासाठी" विनंती केली आहे. सत्य आणि प्रीती यांच्यातील समतोल येथे लक्षात घ्या. आपण सत्य बोलले पाहिजे का? हो. नेहमी. पण आम्हाला ते वाटेल त्या प्रकारे बोलण्याची परवानगी आहे का? नाही. आपण सत्य प्रीतिने बोलले पाहिजे. जर तुम्ही प्रीतित सत्य बोलू शकत नसाल, तर लोकांशी सत्य बोलण्यासाठी पुरेशी प्रीती वाढेपर्यंत तुम्ही वाट पाहिली पाहिजे. प्रीति हा असा फळा आहे ज्यावर आपण सत्याचा खडू वापरू शकता. जर तुम्ही या फळ्याशिवाय सत्य लिहिण्याचा प्रयत्न केला, तर तुम्ही विरळ हवेत लिहीत असाल. तुम्ही काय लिहित आहात हे कोणालाही समजू शकणार नाही.नेहमी प्रीतित - सत्य बोलूनच -व्यासपीठावर आणि खाजगी संभाषणात आपण " मस्तक असा जो ख्रिस्त त्याच्याप्रत सर्व प्रकारे वाढावे."(इफिस ४:१५)
इब्री ६:१ मध्ये परिपक्वतेकडे नेटाने जाण्यासाठी एक बोध आहे. इब्री ५ मध्ये दूध पिणे आणि मांस खाणे हे उदाहरण आहे. आणखी दोन उदाहरणे आहेत. प्रथम, प्राथमिक अध्यापन आणि प्रगत अध्यापनाचे उदाहरण; आणि मग एखाद्या इमारतीचा पाया आणि त्याच्या डोलाऱ्याचे उदाहरण. ही सर्व शब्दचित्रे प्रौढ ख्रिस्ती लोकांचा , बाळांशी विरोधाभास करण्यासाठी आहेत. परिक्षेच्या वेळी या दोघांमधील फरक दिसतो . प्रौढ पवित्रजन परिक्षेला ख्रिस्तासारखा प्रतिसाद देतात , तर बाळे मानवी प्रतिसाद देतात. आणखी एक उदाहरण सांगायचे झाले तर : पर्वत चढण्यासारखे परिपक्वतेकडे नेटाने जाण्याचा विचार करा (समजा, १०,००० मीटर). येशू आधीच शिखरावर पोहोचला आहे. जेव्हा आपला नवीन जन्म होतो तेव्हा आपण या पर्वताच्या पायथ्याशी सुरुवात करतो. येशूचे अनुसरण करणे आणि कितीही वेळ लागला तरी वरच्या दिशेने नेटाने चढणे हे आपले ध्येय आहे. मग आपण आपल्या धाकट्या भावांना आणि बहिणींना म्हणू शकतो, "मी ख्रिस्ताच्या मागे जाताना माझे अनुकरण करा" (१ करिंथ ११:१), जरी आपण फक्त १०० मीटर चढलो असलो तरी.