इफिसकरास पत्र अध्याय ४ मध्ये आपल्याला एक आज्ञा दिलेली आहे ती म्हणजे, " तुम्ही रागावा, पण पाप करू नका" (इफिसकरास पत्र ४:२६). याचा अर्थ असा आहे की, ज्या रागात पाप नाही अश्या प्रकारचा राग तुमच्या जीवनात असावा. म्हणून जेव्हा येशूने जुन्या कराराच्या "खून करू नका" या मानकापासून "रागावू नका" पर्यंतची मर्यादा वाढवली, तेव्हा आपल्याला योग्य प्रकारचा राग कोणता आहे आणि चुकीचा राग कोणता आहे हे समजून घेणे आवश्यक आहे.
जेव्हा आपल्याला एखादे वचन योग्यरित्या समजत नाही तेव्हा आपण आपल्या आध्यात्मिक शब्दकोशात पाहिले पाहिजे: शब्दाने देह निर्माण केला - येशू ख्रिस्ताचे जीवन. येशूने स्वतःला जगाचा प्रकाश म्हटले आणि ते त्याच्याबद्दल म्हणते, "त्याच्याठायी जीवन होते, व ते जीवन मनुष्य मात्राचा प्रकाश होते" (योहान १:४). आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताचे जीवन हा प्रकाश आहे जो शास्त्रातील प्रत्येक वचनाचे स्पष्टीकरण देतो. म्हणून जेव्हा आपण वाचतो, "रागावा, पण पाप करू नका" आणी आपण ज्या रागात पाप आहे असा राग आणि ज्यात पाप नाही असा राग यात फरक करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आपल्याला येशूच्या जीवनातील प्रकाशाकडे पाहावे लागेल .
येशू कधी रागावला होता आणि तो कधी रागावला नव्हता ? आपण मार्क ३:१-५ मध्ये वाचतो की जेव्हा येशू एका सभास्थानात होता तेव्हा त्याने वाळलेल्या हाताच्या माणसाला बरे होण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांकडे रागाने पाहिले. जेव्हा परूशी पक्षाघात झालेल्या माणसाला बरे करण्यापेक्षा शब्बाथाच्या विधी पाळण्याची अधिक काळजी घेत होते तेव्हा तो रागावला. धार्मिक नेते आणि धार्मिक लोकांबद्दलचा राग ज्यांना लोकांपेक्षा विधींमध्ये अधिक रस आहे आणि पक्षाघात झालेल्या लोकांना बरे करण्यापेक्षा विशिष्ट विधी पाळण्यात अधिक रस आहे - हा योग्य प्रकारचा राग आहे
आज पापाने पराभूत झालेल्या ख्रिस्ती लोकांमध्ये पक्षाघात आढळतो आणि जेव्हा आपल्याकडे असे धार्मिक लोक असतात ज्यांना , लोक पापापासून मुक्त आहेत यापेक्षा ते त्यांचा दशमांश देतात याची खात्री करण्यात अधिक रस आहे तेव्हा ते परुशी लोकांसारखेच आहेत जे वाळलेल्या हाताच्या माणसाला बरे होऊ देत नव्हते आणि लोकांनी त्यांचा दशमांश द्यावा आणि शब्बाथ पाळावा यात त्यांना अधिक रस होता. आज असे बरेच प्रचारक आणि पाळक आहेत, ज्यांना त्यांच्या कळपाला त्यांच्या जीवनात पापाच्या अधिपत्यापासून वाचवण्यात रस नाही, पण ते त्यांचा दशमांश देतील याची खात्री करण्यात अधिक रस आहे. येशू आज अश्या लोकांकडे रागाने पाहत असेल कारण लोकांनी त्यांचा दशमांश द्यावा ह्यासाठी तो पृथ्वीवर आला नव्हता; तर तो लोकांना त्यांच्या पापांपासून वाचवण्यासाठी आला होता. लोकांनी त्यांचा दशमांश द्यावा यासाठी तो वधस्तंभावर मरण पावला नाही; तर तो आपल्याला आपल्या पापांपासून वाचवण्यासाठी वधस्तंभावर मरण पावला.
आपल्या तारणकर्त्याचे नाव येशू आहे आणि तो आपल्याला आपल्या पापांपासून वाचवण्यासाठी आला होता (मत्तय १:२१). जेव्हा लोक इतरांना त्यांच्या पापांपासून वाचवण्यापासून रोखतात आणि म्हणतात, "त्या व्यक्तीकडे जाऊ नका आणी त्याचे ऐकू नका कारण तो पापावर विजय मिळवण्याचा उपदेश करत आहे, तर माझे ऐकत राहा कारण मी तुम्हाला तुमचा दशमांश कसा द्यायचा हे सांगतो," तेव्हा आपल्याला खात्री असली पाहिजे की येशू अश्या लोकांवर रागावला असता. आणि जर तुमची एक देवाचा सेवक म्हणून येशू ख्रिस्ता बरोबर सहभागीता असेल तर तुम्हीही जे इतरांना सुटकेपासून रोखतात अश्या लोकांवर रागावले पाहिजे,.
येशूला जेव्हा राग आला त्याचे आणखी एक उदाहरण योहान २ मध्ये आहे जेव्हा येशू मंदिरात गेला आणि त्याने पैसे घेणाऱ्यांना मंदिरातून हाकलून लावले. त्यात म्हटले आहे की त्याने दोऱ्यांचा एक कोरडा करून मेंढरे व गुरे ह्या सर्वांस मंदिरातून घालवून दिले . सराफानचा खुर्दा हि ओतून टाकला व चौरंग पालथे केले आणि म्हणाला” ही येथून काढून घ्या !" तो खरोखर रागावला, "तुझ्या मंदिराविषयीचा आवेश मला ग्रासून टाकेल " असा शास्त्रलेख असल्याचे त्याच्या शिष्यांना आठवले (योहान २:१५-१७). जेव्हा आपण लोकांना धर्माच्या नावाखाली किंवा ख्रिस्ताच्या नावाने पैसे कमवताना आणी गरीब लोकांचे शोषण करताना पाहतो , जसे कबुतरे आणि मेंढ्या विकणारे गरीब लोकांना म्हणतात की , "आम्ही तुम्हाला तुमच्या बलिदानासाठी हे मेंढरे आणि कबुतरे विकू पण अर्थातच ते तुम्हाला बाजारात मिळणाऱ्या किमतीपेक्षा थोडे जास्त महाग मिळतील कारण आम्हाला आमचे कमिशन मिळवायचे आहे." अश्या प्रकारे ते लोकांचे शोषण करताना पाहतो तेव्हा देवाच्या घराच्या शुद्धतेबद्दलच्या आवेशाने आपल्याला राग आला पाहिजे
येशू कधी रागावला नव्हता? त्याचे एक उदाहरण म्हणजे जेव्हा त्याला बालजबूल (भूतांचा राजकुमार) असे म्हटले गेले (मत्तय १२:२२-२४). येशूने एका बहिऱ्या आणि मुक्या माणसातून भूत काढल्यावर हे घडले. लोकसमुदाय हे पाहून उत्साहित झाला आणि म्हणू लागला, “हा दाविदाचा पुत्र आहे. पाहा, त्याने किती अद्भुत चमत्कार केला आहे आणि या माणसाला मुक्त केले आहे!” पण परूशी त्याचा हेवा करू लागले आणि त्यांनी लगेच म्हटले, “हा मनुष्य भूतांच्या अधिपतीच्या सहायाने भुते काढत आहे” (मत्तय १२:२४). ते येशूला सैतान म्हणत होते. कल्पना करा की तुम्ही प्रभूची सेवा करत असताना कोणी तुम्हाला सैतान म्हटले तर. पण येशूने उत्तर दिले, “मी फक्त मनुष्याचा पुत्र आहे, मी फक्त एक सामान्य मनुष्य आहे. जर तुम्ही माझ्याविरुद्ध बोललात तर तुम्हाला क्षमा झाली आहे; परंतु तुम्ही याची काळजी घ्या की तुम्ही पवित्र आत्म्याविरुद्ध बोलणार नाही ” (मत्तय १२:३२).
जेव्हा लोक त्याला सैतान म्हणत असत तेव्हा तो रागावला नाही. तो म्हणाला, "तुम्ही माझ्याविरुद्ध बोललात तरी चालेल, मी फक्त एक मनुष्याचा पुत्र आहे. तुम्हाला क्षमा केली आहे." जेव्हा त्यांनी त्याला सैतान म्हटले तेव्हा तो सर्वशक्तिमान देव होता आणि तो नाराज झाला नव्हता. त्याने त्यांना क्षमा केली. एक खरा ख्रिस्ती कधीही त्याला वाईट नावे ठेवल्याने नाराज होणार नाही , त्याला सैतान, डुक्कर, कुत्रा किंवा काहीही म्हंटल्याने तो नाराज होणार नाही. त्याला त्याने काही फरक पडत नाही. जर तो ख्रिस्तासारखा असेल तर तो त्यांना क्षमा करेल आणि रागावणार नाही. ज्यांनी त्याला ही नावे दिली त्यांच्याबद्दल तो कोणत्याही प्रकारची कटुता किंवा रागही ठेवणार नाही.
खूप कमी ख्रिस्ती लोकाना येशू ख्रिस्तासारखे व्हायचे आहे, परंतु ते सर्वजण मेल्यानंतर स्वर्गात जाऊ इच्छितात. प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीला त्याच्या मृत्यूनंतर स्वर्गात जायचे आहे, परंतु त्यापैकी किती जण स्वर्गात जाण्यापूर्वी या पृथ्वीवर येशू ख्रिस्तासारखे जीवन जगू इच्छितात ? खूप कमी. हीच समस्या आहे. यापैकी बरेच लोक खरोखर ख्रिस्ती नाहीत. ते नावाने ख्रिस्ती आहेत कारण त्यांचा जन्म ख्रिस्ती कुटुंबात झाला आहे, परंतु ते त्यांच्या जीवनात येशू ख्रिस्ताच्या प्रभुत्वाला शरण गेलेले नाही आणि म्हणूनच देवाच्या बाबतीत , ते ख्रिस्ती नाहीत. जेव्हा ख्रिस्त पुन्हा येईल तेव्हा त्यांना एक मोठे आश्चर्य वाटेल, आणि तेव्हा त्यांना कळेल की ते अजिबात ख्रिस्ती नव्हते,, कारण ख्रिस्ती कुटुंबात जन्म घेऊन तुम्ही ख्रिस्ती होऊ शकत नाही. तुम्हाला वैयक्तिक निवड करावी लागेल.
हे समजून घेणे आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे. इफिसकरास पत्र ४:२६ चा अर्थ हा आहे, "रागावा, पण पाप करू नका." आणि नंतर पाच वचनांनंतर इफिसकरास पत्र ४:३१ मध्ये म्हटले आहे, "सर्व राग दूर करा." हे दोन्ही वचने परस्परविरोधी वाटतात, जिथे एका ठिकाणी म्हंटले आहे , "रागावा पण पाप करू नका," आणि दुसऱ्या ठिकाणी ते म्हणते, "सर्व राग दूर करा." आपण कोणता राग दूर करावा? राग जो स्वार्थी आहे , स्वकेंद्री आणि जो पापी आहे . आपल्याला कोणता राग असावा? जो देव-केंद्रित आहे, जो देवाच्या नावाच्या गौरवाशी संबंधित आहे. आज पृथ्वीवर देवाच्या नावाचा आदर केला जात नाही याचे आपल्याला ओझे वाटले पाहिजे.