WFTW Body: 

आपण वाचतो की येशू त्याच्या बालपणापासूनच ज्ञानात पूर्ण होत गेला (लूक २:४०,५२). तरुणांनी ते तरुण आहेत म्हणून मूर्खपणाच्या गोष्टी कराव्यात अशी आपली अपेक्षा असली तरीसुद्धा, येशूने तरुण असताना कधीही मूर्खपणाचे काही केले नाही. म्हणून त्याचे उदाहरण तुमच्यासमोर ठेवा म्हणजे तुमच्या तारुण्यात अनेक मूर्खपणाच्या गोष्टी करण्यापासून तुम्ही वाचाल.

परमेश्वराचे भय हे ज्ञानाचा प्रारंभ आहे. येशूने आध्यात्मिक मृत्यूपासून वाचावे म्हणून मदतीसाठी प्रार्थना केली - आणि "त्याच्या परमेश्वराप्रति असलेल्या भयामुळे त्याची प्रार्थना ऐकली गेली " (इब्री ५:७- न्यू केजेव्ही). त्याने येशूवर जशी प्रीती केली तशीच प्रीती देव आपल्यावर करतो. त्यामुळे येशूप्रमाणे जर तुम्हीही देवाचे भय बाळगत असाल, तर तुमच्याही प्रार्थना ऐकल्या जातील.

देवाने अब्राहामाला (उत्पत्ति २२:१२ मध्ये) एक प्रमाणपत्र दिले, ज्यात म्हटले होते,"तू देवाला भिऊन चालणारा आहेस हे मला कळले”, जेव्हा तो आपल्या एकुलत्या एका मुलाचे अर्पण देण्यास तयार झाला. त्या दिवशी अब्राहामाने त्या डोंगरमाथ्यावर एकट्याने देवाची आज्ञा पाळली. केवळ देवानेच त्याची आज्ञाधारकता पाहावी अशी त्याची इच्छा होती. देव एका रात्री अब्राहामाशी बोलला होता, जेव्हा तो एकटा होता (उत्पत्ती २२:१). देवाने त्याला जे सांगितले होते ते इतर कोणालाही माहीत नव्हते. आणि अब्राहामाने गुप्तपणे देवाची आज्ञा मानली. तुम्ही गुप्तपणे करत असलेल्या गोष्टींमध्येच (जिथे तुम्ही काय करता हे इतर कोणालाही माहीत नसते ) तुम्ही देवाचे भय बाळगता की नाही हे तुम्हाला कळेल.

ईयोबाने देवाचे भय बाळगल्याचे प्रमाणपत्र देवाने सैतानापुढे ईयोबाला दिले. (ईयोब १:८) जर देव तुमच्याबद्दलही सैतानाला अशा प्रकारे बढाई मारू शकत असेल तर ते चांगले आहे - कारण सैतान आजही जगभर फिरतो आणि प्रत्येकाच्या खाजगी जीवनाबद्दल सर्व काही जाणतो. ईयोबाने आपल्या डोळ्यांशी असा करार केला की, एखाद्या स्त्रीकडे वासनेने कधीही पाहू नये (ईयोब ३१:१). नियमशास्त्र देण्याआधीच आणि नव्या कराराच्या कित्येक शतकांआधीच जगणारी एखादी व्यक्ती, पवित्र शास्त्राशिवाय, पवित्र आत्म्याशिवाय आणि त्याला उत्तेजन देणाऱ्या किंवा त्याला आव्हान देणाऱ्या इतर बांधवांशिवाय असा निर्णय घेऊ शकली, ही गोष्ट आश्चर्यकारक आहे! ईयोब न्यायाच्या दिवशी उठेल आणि या पिढीच्या वासना व पापाबद्दल त्याची निंदा करील.

योसेफ, हे तुम्ही अनुकरण करावे असे आणखी एक उत्तम उदाहरण आहे. तो आई-वडिलांपासून दूर जागी राहणारा तरुण होता. आणि तरीही जेव्हा त्याला प्रत्येक दिवशी एक पापी स्त्री मोह घालत असे, तेव्हा तो सतत तिचा प्रतिकार करत असे आणि तिच्यापासून दूर पळत असे, कारण त्याला देवाचे भय होते (उत्पत्ती 39:9).

ईयोब व योसेफ यांच्या उदाहरणांवरून आपल्याला दिसून येते, की लैंगिक वासना व व्यभिचार या भयंकर पापापासून आपल्याला परावृत्त करण्यासाठी केवळ देवाचे भय बाळगणे पुरेसे आहे. परमेश्वराचे भय म्हणजे ज्ञानाची वर्णमाला (ABC) होय.

जर तुम्ही 'हयांत गढून गेलात ', तर "तुमची प्रगती सर्वांना दिसून येईल" (१ तीमथ्य ४:१५,१६).