लेखक :   झॅक पुननं श्रेणी :   मंदिर शिष्य
WFTW Body: 

येशूने ज्या पहिल्या चुकीच्या वृत्तीबद्दल बोलले ते म्हणजे राग. आपण आपल्या जीवनातून राग काढून टाकला पाहिजे. आणि दुसरी आणखी एक मोठी समस्या आहे, जी सर्व ख्रिस्ती लोकांमध्ये (अगदी सर्व मानवांमध्ये) आहे, ती म्हणजे लैंगिक वासनायुक्त विचारसरणी - जसे की जेव्हा एखादा पुरुष एखाद्या स्त्रीकडे वासनेसाठी पाहतो. मत्तय ५:२७-२८ म्हणते की जुन्या कराराचे मानक होते की," व्यभिचार करू नका." जोपर्यंत तुम्ही एखाद्या स्त्रीला जी तुमची पत्नी नाही तिला तुम्ही स्पर्श करत नाही आणि तुम्ही तिच्याशी व्यभिचार करत नाही तोपर्यंत सर्व ठीक आहे. ते जुन्या कराराचे मानक होते.

पण येशूने हे मानक उंचावले. ज्याप्रमाणे मोशे डोंगरावर गेला आणि दहा आज्ञा घेऊन खाली आला, त्याचप्रमाणे येशू डोंगरावर गेला आणि डोंगरावरील प्रवचन दिले. त्याने त्या दहा आज्ञांचा स्तर त्या आज्ञांच्या आत्म्यापर्यंत वाढवला . त्याने दाखवून दिले की क्रोध करणे हे खून करण्यासामान आहे आणि व्यभिचार हा तुमच्या डोळ्यांनी वासना करण्यासारखाच आहे - दुसऱ्या शब्दांत सांगायचे म्हणजे , तुम्ही तुमच्या मनात त्या स्त्रीशी व्यभिचार करत आहात. येशूने म्हटले की देवाच्या दृष्टीने तो व्यभिचार होतो कारण तुमचे अंतर्गत जीवन अशुद्ध होते.

परूश्यांची खूण अशी होती की ते त्यांचे बाह्य जीवन शुद्ध ठेवत असत – प्याल्याचा बाहेरील भाग शुद्ध ठेवत असत. जो ख्रिस्ती आपले बाह्य जीवन स्वच्छ ठेवतो पण त्याचे अंतर्गत विचार अशुद्ध असतात तो परूशी आहे आणि त्याला ते माहित असो वा नसो पण तो नरकाच्या मार्गाने जात आहे. आपल्यापैकी बरेच जणांना याचे गांभीर्य समजत नाही.

गेल्या (३५) वर्षांत मी काही पापांविरुद्ध सर्वात जास्त प्रचार केला आहे, विशेषतः दोन पापांविरुद्ध - क्रोध आणि लैंगिकदृष्ट्या पापी, वासनापूर्ण विचार. लोकांनी मला विचारले की मी या विषयांवर इतके का बोलतो. मी त्यांना सांगतो, कारण येशूने या दोन पापांचा उल्लेख तेव्हा केला होता जेव्हा त्याने पहिल्यांदा म्हटले होते की आपली धार्मिकता शास्त्री आणि परुश्यांच्या धार्मिकतेपेक्षा जास्त असली पाहिजे. तुमची धार्मिकता तुमच्या सभोवतालच्या सर्व परुश्यांच्या (जे खूप धार्मिक लोक आहेत) धार्मिकतेपेक्षा जास्त असली पाहिजे असे म्हटल्यानंतर लगेचच, येशूने उल्लेख केलेली पहिली दोन पाप क्रोधाच्या बाबतीत आणि लैंगिकदृष्ट्या वासनापूर्ण विचारांच्या बाबतीत होती. मी त्यांच्याविरुद्ध सर्वात जास्त प्रचार करण्याचे हेच पहिले कारण आहे.

मी या दोन पापांविरुद्ध प्रचार का करतो याचे दुसरे कारण म्हणजे, डोंगरावरील प्रवचनात येशू या दोनच पापांबद्दल बोलला आणी त्याने सांगितले की या पापांमध्ये रमणे नरकात नेणार आहे. बहुतेक लोक यावर विश्वास ठेवत नाहीत. डोंगरावरील प्रवचनात येशूने नरकाबद्दल जे दोन वेळा बोलले ते या दोन पापांशी संबंधित होते (मत्तय ५:२२ब, २९-३०), त्यामुळे हे आपल्याला सांगते की ही दोन पाप खूप गंभीर असली पाहिजेत.

डोंगरावरील प्रवचनात येशूने नरकाबद्दल जे दोन वेळा बोलले ते फक्त क्रोध आणि लैंगिक वासनापूर्ण विचारांशी संबंधित होते, हे खूप महत्त्वाचे आहे. म्हणून देवाच्या दृष्टीने ही खूप गंभीर पाप असावीत आणि आज त्यांच्याविरुद्ध पुरेसा प्रचार होत नाही. रागावर मात करण्याबद्दल तुम्ही शेवटचा संदेश कधी ऐकला होता ते तुम्हाला आठवते का? मला वाटत नाही की मी माझ्या संपूर्ण आयुष्यात याबद्दल संदेश ऐकला आहे. ५० वर्षांपेक्षा अधिक काळापासून मी ख्रिस्ती धर्मजगतात फिरत आहे, मी टेलिव्हिजन, टेप्स, सीडी आणि अनेक मंडळी मध्ये बरेच प्रचारकांचे संदेश ऐकले आहेत. तरीही मी लैंगिक वासनेच्या विचारसरणीवर मात करण्याबद्दल फारसे ऐकले नाही. का सैतानाने प्रचार करणाऱ्यांना या दोन क्षेत्रांवर प्रचार करण्यापासून रोखले आहे?

पहिले कारण म्हणजे प्रचारकांना स्वतःला त्यावर विजय मिळालेला नाही. जर ते अजूनही स्वतःच त्याच्या गुलामगिरीत असतील तर ते त्याबद्दल कसे बोलू शकतात ? दुसरे म्हणजे, प्रचारकांना त्यांच्या मंडळी मधील लोक बाहेरून चांगले दिसण्यात आणि त्यांचे पैसे गोळा करण्यात जास्त रस असतो. म्हणून या दोन गोष्टींवर, ज्याबद्दल येशूने खूप बोलले आहे त्यावर जोर देण्याची खूप जास्त गरज आहे. ही दोन पाप आहेत ज्याबद्दल येशूने म्हटले की, ते एखाद्या व्यक्तीला शेवटी नरकात नेतील आणि ती खूप गंभीर गोष्ट आहे.

येशूने दहा आज्ञा घेतल्या आणि लोकांना त्या आज्ञांमागे काय आहे हे दाखवले.

तुमची पत्नी नसलेल्या स्त्रीची वासना बाळगणे हे पाप आहे हे समजून घेण्यासाठी तुम्हाला मत्तय ५ वाचण्याची गरज नाही. येशूने म्हटले की जो कोणी ( ती व्यक्ती विश्वास ठेवणारी असो वा अविश्वासू) एखाद्या स्त्रीकडे वासनेच्या नजरेने पाहतो तेव्हा त्याने त्याच्या मनात आधीच तिच्याशी व्यभिचार केला आहे. वासना म्हणजे तीव्र इच्छा. तो म्हणाला की हे इतके गंभीर आहे की जर तुमचा उजवा डोळा तुम्हाला या क्षेत्रात अडखळवत असेल तर तुम्ही तो उपटून टाकावा ! जेव्हा तुम्हाला तुमच्या डोळ्यांनी वासना करण्याचा मोह होतो तेव्हा तुम्ही मूलगामी असले पाहिजे. तुम्ही आंधळे असल्यासारखे वागले पाहिजे. त्यावर मात करण्याचा हा एकमेव मार्ग आहे. तुम्ही ते सहजपणे घेऊ नये आणि असे म्हणू नये की, " मी देवाने निर्माण केलेल्या सौंदर्याचे फक्त कौतुक करत आहे." या पापाचे समर्थन करण्याचे अनेक मार्ग आहेत आणि बरेच लोक ते करतात. जेव्हा एखादी व्यक्ती या बाबतीत निष्काळजी असते तेव्हा कालांतराने तो शारीरिक व्यभिचारातही पडेल.
मत्तय ५ मध्ये येशूने जे शिकवले ते देवभीरू लोकांना माहित नव्हते असे काही नवीन नव्हते. मला खात्री आहे की येशूने ते बोलण्यापूर्वीच बाप्तिस्मा देणाऱ्या योहानाला ते माहित होते. ईयोबला ते माहित होते (ईयोब ३१:१, ४, ११). जो कोणी देवाचा आदर करतो, जरी त्याच्याकडे बायबल नसले, जसे ईयोबाकडे बायबल नव्हते तरी, तो असा निष्कर्ष काढेल की जर माझी पत्नी नसलेल्या एखाद्या स्त्रीकडे मी लैंगिक वासनेने पाहिले तर ते देवासमोर पाप आहे. आपल्या आत असे काहीतरी आहे जे आपल्याला सांगते की ते चुकीचे आहे. हे, देवाने तुम्हाला जे दिले नाही ते चोरण्यासारखे आहे. जरी तुमच्याकडे बायबल नसले तरी, तुमचा विवेक तुम्हाला सांगेल की जेव्हा तुम्ही अशी एखादी वस्तू चोरता जी तुमच्या मालकीची नाही, तेव्हा ते पाप आहे. तुम्हाला ते सांगण्यासाठी कोणत्याही आज्ञेची आवश्यकता नाही. देवाबद्दलचा आदर स्वतः तुम्हाला ते सांगेल. येशूने काय शिकवले ते पाहताना आपण हे लक्षात ठेवण्याची ही एक अद्भुत गोष्ट आहे.

आज इतके विश्वासणारे लैंगिक वासनेच्या या बाबीला इतके सहजपणे कसे पाहतात ? कारण देवाबद्दलच्या आदराचा मूलभूत अभाव आहे, जो ईयोबामध्ये होता. आजच्या ख्रिस्ती लोकांना बायबलचे ज्ञान आहे, पण देवाबद्दल आदर नाही. असे लोक आहेत जे बायबल शिकवणाऱ्या शाळांमध्ये जातात आणि बायबलचा अभ्यास करून धर्मशास्त्रात डॉक्टरेट मिळवतात, तरीही महिलांबद्दल वासना बाळगतात. हे आपल्याला काय शिकवते? हे आपल्याला शिकवते की शास्त्राचे बौद्धिक ज्ञान आणि बायबल सेमिनरीमधून "पदवी मिळवणे" तुम्हाला पवित्र बनवत नाही. आज भाषांतरे आणि कॉन्कॉर्डन्सची विपुलता असलेले बायबलचे ज्ञान भरपूर आहे. आपल्याकडे आपल्या मोबाईल फोनवर आणि सीडीमध्ये बायबल आहे, जे कारमध्ये गाडी चालवताना लोक ऐकू शकतात. तरीही या सर्व ज्ञानाची विपुलता असूनही, देवाबद्दल आदर फार कमी आहे.

पर्वतावरील प्रवचनात, येशूने अशा अनेक गोष्टी शिकवल्या ज्या आपल्याला डोंगरावरील प्रवचन न वाचताही कळू शकतात, जोपर्यंत आपल्याला देवाबद्दल आदर आहे. यापैकी काही गोष्टी आपल्याला अगदी स्पष्ट आहेत: क्रोध करणे पाप आहे, स्त्रियांबद्दल वासना करणे पाप आहे आणि येथे लिहिलेल्या इतर अनेक गोष्टी. म्हणून, ज्ञानाच्या अभावामुळे तुम्ही पाप करत राहता असे नाही; तर ते देवाबद्दल आदर नसल्यामुळे तुम्ही पाप करता. देवाबद्दलचा आदर ही शहाणपणाची सुरुवात आहे. हे ख्रिस्ती जीवनाची "बाराखडी" आहे आणि जर आपल्याकडे ते नसेल, तर कितीही प्रमाणात केलेला बायबल अभ्यास किंवा संदेश ऐकणे आपल्याला पवित्र बनवणार नाही.