लेखक :   झॅक पुननं
WFTW Body: 

सर्व विश्वासणारे संदेष्टे होण्यासाठी बोलावलेले नाहीत. परंतु सर्व विश्वासणाऱ्यांना संदेश देण्याची उत्कट इच्छा धरण्याची आज्ञा देण्यात आली आहे (१ करिंथ १४: १). नवीन कराराच्या युगात पवित्र आत्म्याच्या वर्षावाचा हा एक परिणाम आहे (प्रेषितांची कृत्ये २:१७, १८). संदेश देणे (नव्या कराराच्या अर्थाने) म्हणजे लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी, त्यांना आव्हान देण्यासाठी आणि त्यांना उत्तेजन देण्यासाठी बोलणे होय (१ करिंथ १४:३). सर्व आत्म्याने भरलेले विश्वासणारे मंडळीच्या सभांमध्ये थोडक्यात संदेश देऊ शकतात (१ करिंथ १४:३१). इतर विश्वासणाऱ्यांनी ते काय बोलले आहेत याचा न्याय करणे आवश्यक आहे आणि हे समजून घ्यावे की ते देवाकडून किती आहे आणि ते किती मानवी आहे - सर्व गोष्टी पवित्र शास्त्राद्वारे पारखल्या जाव्यात (१ करिंथ १४: २९).

मंडळीमध्येही काहींना देवाने संदेष्टे म्हणून नियुक्त केले आहे. ख्रिस्ताचे शरीर उभारण्यासाठी देवाने या लोकांना देणगी म्हणून मंडळीला दिले आहे. विश्वासणाऱ्यांना आव्हान देण्यासाठी आणि त्यांना बळकट करण्यासाठी संदेष्टे दीर्घ संदेश सांगतील. आम्ही वाचले की “यहूदा व सीला हे स्वत: संदेष्टे होते, म्हणून त्यांनी पुष्कळ बोलून बंधुजनांना बोध केला व स्थिरावले.” (प्रेषितांची कृत्ये १५: ३२). परंतु मंडळीमध्ये फारच थोड्या विश्वासणाऱ्यांना संदेष्टे म्हणून पाचारले जाते (१ करिंथ १२: २८; इफिस ४: ११) - आणि प्रत्येकाने हे लक्षात ठेवले पाहिजे.

मंडळीच्या सभेत संदेश देणाऱ्या एखाद्याचे ऐकणे म्हणजे एखादे केळे खाण्यासारखे आहे. आपण साल फेकून द्यावे (जे मानवी आहे) आणि सालीच्या आत आहे फक्त तेच खावे (जे देवापासून आहे). एखाद्या तरुण विश्वासणाऱ्यात साल खूप जाड असेल आणि त्यामध्ये आत फारच थोडेसे असेल जे देवाचे आहे. ते कमी असले तरीही ते घेण्यात आम्हाला आनंद आहे. अधिक परिपक्व विश्वासणाऱ्यात साल पातळ असेल आणि आत बरेच काही असेल जे देवापासून आहे. बहिणीही संदेश सांगू शकतात (प्रेषितांची कृत्ये २:१७,१८) पेन्टेकॉस्टच्या दिवशी नवीन कराराची सुरुवात झाल्यानंतर आम्हाला कोणतीही संदेष्ट्री दिसत नाही. तेथे महिला प्रेषितसुद्धा नाहीत.

जो कोणी संदेश देतो त्याने केवळ त्याच्या विश्वासाच्या प्रमाणात दिला पाहिजे (रोम १२: ६). म्हणूनच,संदेश देताना पौलाला “प्रभू असे म्हणतो” हे शब्द वापरण्याची भीती वाटत होती. तो त्याऐवजी असे म्हणतो की, "मलाही देवाचा आत्मा आहे असे मला वाटते." (१ करिंथ ७: ४०). आपण संदेश देताना “प्रभू असे म्हणतो”हे शब्द कधीही वापरु नये, जोपर्यंत आपण पवित्र शास्त्रातील एखादे वचन उद्धृत करीत नाही. यिर्मयाने आपल्याला असे शब्द वापरण्याबद्दल चेतावणी दिली आहे (यिर्मया २३: २१) तसेच, जेव्हा जेव्हा आम्ही संदेश देतो तेव्हा आपण इतर विश्वासणाऱ्यांना समजून घेण्याची परवानगी दिली पाहिजे की आपला संदेश परमेश्वराकडून आला आहे की नाही.

आपण हे देखील लक्षात ठेवले पाहिजे की नवीन कराराच्या कोणत्याही संदेष्ट्याने इतरांना विशिष्ट परिस्थितीत काय करावे याविषयी कधीही मार्गदर्शन केले नव्हते (जुन्या कराराच्या संदेष्ट्यांप्रमाणे). प्रेषितांची कृत्ये ११:२८ मध्ये आपण पाहतो की अगब नावाच्या मनुष्याने येणाऱ्या दुष्काळाची भविष्यवाणी केली होती, परंतु याबद्दल कुणी काय करावे याविषयी त्याने कधीही एक शब्द सांगितला नाही. त्याच प्रकारे, प्रेषितांची कृत्ये २१:११ मध्ये त्याने पौलाला सांगितले की तो यरुशलेमाला गेला तर त्याला पकडून नेले जाईल, परंतु त्याने पौलाला जायचे की नाही हे सांगितले नाही. यामागचे कारण असे आहे की आता प्रत्येक विश्वासणाऱ्याला पवित्र आत्मा आहे - आणि आत्मा असा आहे की जो प्रत्येक विश्वासणाऱ्याला त्याने काय करावे हे सांगतो. जुन्या करारात, लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी त्यांच्यात राहणारा आत्मा नव्हता. आणि म्हणून असा संदेष्टा ज्याच्याकडे आत्मा असायचा, त्याला इतरांना प्रभुची इच्छा काय आहे हे सांगणे भाग होते.

परंतु असे इशारे असूनही, बरेच अपरिपक्व विश्वासणारे आहेत जे जुन्या कराराच्या संदेष्ट्यांप्रमाणे वागतात आणि विश्वासणाऱ्यांना आजही काय करायचे ते सांगतात. सोरमध्ये असे काही अहंकारी व अपरिपक्व विश्वासणारे होते ज्यांनी प्रेषित पौलालादेखील “स्वतःच्या आत्म्याने” “यरुशलेमला जाऊ नको” असे सांगितले (प्रेषितांची कृत्ये २१:४). पण पौलाने त्यांच्या सूचनांकडे सपशेल दुर्लक्ष केले आणि तो गेला (प्रेषितांची कृत्ये २१:१३). नंतर, प्रभुने पौलाची खात्री करून दिली की ही खरोखर त्याचीच इच्छा होती की त्याने यरुशलेमाला जावे (प्रेषितांची कृत्ये २३:११). तर सोर येथील विश्वासणारे त्यांच्या तथाकथित “संदेश देण्या” मध्ये पूर्णपणे चुकीचे होते. तो परमेश्वराकडून आलेला नव्हता. आपण आपल्या मंडळी मधील विश्वासणाऱ्यांना चेतावणी दिली पाहिजे की (तथाकथित)"संदेश " कधीही ऐकू नये जो त्याला सांगेल की काय करावे किंवा काय करू नये - यासाठी की त्यांची फसवणूक होऊ नये.

नवीन कराराच्या संदेशाचा मुख्य उद्देश म्हणजे (१) देवाच्या लोकांच्या पापांपासून त्यांचे बचाव करणे आणि (२) मंडळी उभारणे. आपल्या मंडळींच्या सर्व सभांमध्ये आपण हेच घोषित केले पाहिजे - कारण येशू या दोन हेतूंसाठी आला होता: (१) आपल्या लोकांना सर्व पापांपासून तारण्यासाठी (नवीन करारातील पहिले अभिवचन - मत्तय १: २१); आणि (२) त्याची मंडळी तयार करण्यासाठी (मत्तय १६: १८).

दुसरीकडे, जर तुम्ही पापांपासून मुक्त होण्याऐवजी व ख्रिस्ताच्या शरीरात नातेसंबंध निर्माण करण्याऐवजी आत्म्याच्या दानांचा उपयोग करण्याविषयी अधिक प्रचार करत असाल तर तुमची मंडळी लवकरच करिंथमधील मंडळीसारखी होईल - आत्म्याच्या सर्व दानांचा वापर करणारी (१ करिंथ १: ७), परंतु दैहिक आणि अपरिपक्व आणि भांडणांनी भरलेली. आणि आपली मंडळी अगदी लावदिकीया येथील मंडळीसारखीच संपू शकते - कष्टी, दीन, दरिद्री, अंध आणि नग्न, आणि तिला ते कळतही नाही (प्रकटीकरण ३: १७) ती एक आपत्तीच असेल.

आपल्याला नवीन-कराराची मंडळी तयार करायची असल्यास आपल्या संदेशातील भर नेहमी येशू व प्रेषितांच्या शिकवणीत होता तोच असला पाहिजे - आणि तो नव्हे जे आज आपण बहुतेक ख्रिस्ती मंडळ्यांमध्ये ऐकतो.